(Source: Poll of Polls)
Nashik Protest : ‘राज्यपाल कोशारी थोडं जागा, भगतसिंग नावाप्रमाणे वागा‘, नाशिकमध्ये निषेध आंदोलन
Nashik Protest : नाशिकमध्ये (Nashik) देखील काँग्रेस (Congress) आणि अन्य पक्षांकडून आंदोलन करण्यात आले.
Nashik Protest : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shiwaji Maharaj) यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यभरात राज्यपालांविरुद्ध (governor Bhagatsingh Koshyari) तीव्र पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) देखील काँग्रेस (Congress) आणि अन्य पक्षांकडून आंदोलन करण्यात आले तर नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून राज्यपालांचे फोटो असलेले बँनर घंटागाडीत टाकून निषेध व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन, नाशिक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडो मारून निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी महाराष्ट्राची माफी मागून राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याची मागणी केली. जर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही तर जिल्हा बंद आंदोलनाचा (Nashik District Protest) इशारा यावेळी देण्यात आला.
छत्रपती शिवरायांबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. तसेच भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याचा निषेध ठिकठिकाणी करण्यात आला. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य प्रकरण चांगलेच तापले असून राज्यपाल भगतसिंग कोशारींचा फलक चक्क घंटागाडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकला. फलकाला झाडू मारो आंदोलन करत राज्यपाल चले जावची घोषणाबाजी नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राज्यपाल यांचा करण्यात निषेध आला. यावेळी नाशिक शिवजन्मोत्सवाच्या वतीने राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी ‘राज्यपाल कोश्यारी थोडं जागा, भगतसिंग नावाप्रमाणे वागा‘ अशा घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.
नाशिकसह राज्यभरात राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्य वक्तव्य केले. राज्यपाल आणि प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवाय राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याबाबत बोलताना म्हणाले कि, वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. एवढेच नाही तर राज्यपालांची हकालपट्टी करा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.