Nashik Air Service : स्पाईस जेटचा पुन्हा गोंधळ, विमानाचं उड्डाण होतं शिर्डीहून, निघालं नाशिकहून!
Nashik Air Service : नाशिकच्या (Nashik) विमानसेवेचा काही दिवसांपासून बोजवारा उडाला असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
Nashik Air Service : गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) विमानसेवेच्या मनस्ताप देणाऱ्या सेवेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच शिर्डीहून (Shirdi) उड्डाण करणाऱ्या एका विमानाच्या वेळापत्रकात अचानक बदल करून ते विमान नाशिकहून उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यानंतर ऐन दिवाळीत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
नाशिक विमानसेवेचा काही दिवसांपासून ढिसाळ कारभार सुरु असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी स्पाईस जेट (Spice Jet) या विमान कंपनीचे विमान नाशिकहून दिल्लीत पोहचले मात्र प्रवाशांचे लगेज नाशिकलाच राहिल्याने गोंधळ उडाला होता. आता स्पाइस जेट कंपनीने पुन्हा प्रवाशांना धक्का दिला असून सायंकाळी साडेपाच वाजता शिर्डीहून तिरुपतीला (tirupati उड्डाण करणारे विमान हे तांत्रिक कारणामुळे नाशिकहुन टेक ऑफ करणार असल्याचे जाहीर केले. या बदलाबाबत आलेल्या सूचनेमुळे प्रवाशांची चांगली धावपळ उडाली. तसेच विमान प्रवासासाठी शिर्डी कडे जाणाऱ्या प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातून नाशिककडे फिरावे लागले.
शिर्डीहून तिरुपतीला जाण्यासाठी शुक्रवारी अनेक प्रवासी नाशिकहून शिर्डीच्या मार्गावर प्रवास करत होते. तर बरेच प्रवासी शिर्डीला पोहोचले होते. पोहोचलेल्या प्रवाशांना किमान कंपनीने नाशिकमध्ये परत आणले असले तरी नाशिकहून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना अर्ध्या प्रवासातून सिन्नर-नाशिकरोडहून पुन्हा नाशिककडे फिरवावे लागले. दोन दिवसांपूर्वी कंपनीने ओझर येथून दिल्लीला विमान पाठवताना त्यातील प्रवाशांचे लगेज हे ओझरवर ठेवले होते. त्याची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवासी उतरल्यावर गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर ओझर येथून टेम्पोने प्रवाशांचे बॅगेज हे मुंबईला नेऊन तेथून पुन्हा मध्यरात्री दिल्लीला विमानतळ पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे हाल आणि गैरसोय झाली. त्यानंतर आता पुन्हा आणखी एक धक्का स्पाइस जेट कंपनीने प्रवाशांना दिला आहे.
दरम्यान शिर्डी ते तिरुपती हे विमान साडेपाच वाजता शिर्डी विमानतळावरून उड्डाण करणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे ते नाशिकहून उडाण करणार असून विमानसेवेची वेळही बदलण्यात आली आहे. साडेपाचला शेडूल असलेले विमान आता नाशिकच्या ओझर विमानतळावरून साडेसात वाजता उड्डाण करणार आहे, अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाने दिल्यानंतर पावसाची चांगली धावपळ झाली.
दोन दिवसांपूर्वीही गोंधळ
दोन दिवसांपूर्वी ओझरहून दिलेला प्रवास करताना कंपनीने प्रवाशांचे लगेज विमानतळावर ठेवले. याबाबत प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांनी लगेजची चौकशी केली असता ते ओझरलाच असल्याचे समजले. त्यामुळे गोंधळ झाल्यानंतर ओझर येथून टेम्पो ने प्रवाशांचे लगेज हे मुंबईला नेऊन तेथून मध्यरात्रीच्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.