Nashik News : 'दोन हजार भरा, अन् निकाल घेऊन जा', मुक्त विद्यापीठाचा अजब कारभार
Nashik News : नाशिकच्या (Nashik) मुक्त विद्यापिठाने (Open University) दोन हजार रुपयांसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल (Exam Results) रोखले आहेत.
Nashik News : नाशिक (Nashik) येथील मुक्त विद्यापिठाने (Open University) दोन हजार रुपयांच्या पुननोंदणी शुल्क वसुलीसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल (Exam Results) रोखले आहेत. या विद्यार्थ्यांना पुननोंदणी शुल्काची दोन दोन हजार रुपये भरल्याची पावती सादर केल्यानंतर निकाल वितरित करणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
नाशिक शहराजवळ महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असून याद्वारे लाखो विद्यार्थी बाह्य शिक्षण घेतात. यंदा देखील लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून मुक्त विद्यापीठाकडून अनेक अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. असे असताना मात्र मुक्त विद्या[पिठातील काही विद्यार्थ्यांचे निकालपत्र विद्यापीठाने रोखून ठेवल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असून अनेकांना नव्या प्रवेशासाठी निकालाची प्रत आवश्यक असताना मात्र विद्यापीठाकडून निकालाच मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पुनर नोंदणी प्रक्रिया अंतर्गत शुल्क भरल्याची पावती साधरण करणाऱ्या आणि प्रक्रिया पूर्ण न करणारे सुमारे 4000 विद्यार्थ्यांचे ऑगस्ट 2021 परीक्षेतील निकाल रोखण्यात आले आहेत. पुन्हा नोंदणीचे शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतरच हे निकाल विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. मात्र विद्यापीठांनी शुल्क वसुलीसाठी घेतलेल्या धोरणामुळे होणार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची पडताळणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश देण्यात आला का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम ठराविक कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असले तरी अनेक विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. त्यामुळे दोन हजार रुपये पुनर्नोनी शुल्क भरून त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी दिली जाते. अशाप्रकारे पुननोंदणी करून ऑगस्ट 2021 परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी विद्यापीठाने दिली होती. संबंधित विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी शुल्क भरले, अथवा नाही याची खातर जमा न करता त्यांचे परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने रोखले असून शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना निकाल दिल्या जाणार असल्याचे संबंधित विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश रखडले आहेत. दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांनी निकाल मिळवण्यासाठी शुल्क भरल्याची पावती ईमेल द्वारे पाठवण्याची सूचना विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
मुक्त विद्यापीठाची परीक्षा नियंत्रक डॉ. भटू पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतर परीक्षा देण्याची तरतूद आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना पुननोंदणीची सूचना देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी पुनर्न नोंदणी शुल्क भरलेले नाही, अशा चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने रोखले आहेत. त्यांनी शुल्क भरल्याची पावती सादर केल्यास निकाल वितरित केले जातील.