Nashik Neo Metro : नाशिकच्या बहुचर्चित निओ मेट्रो प्रकल्पाला महिनाभरात 'किक', मनपा आयुक्तांचे संकेत
Nashik Neo Metro : नाशिकमधील (Nashik) निओ मेट्रो प्रकल्पाला (Neo Metro Project) येत्या महिनाभरात मंजुरी मिळणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी (Nashik NMC commissioner) दिली आहे.
Nashik Neo Metro : नाशिकमधील (Nashik) बहुचर्चित असलेला निओ मेट्रो प्रकल्पाला (Neo Metro Project) येत्या महिनाभरात मंजुरी मिळणार असल्याची माहिती नाशिक मनपाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC commissioner) यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अडकून अडकून पडलेला हा प्रकल्प पुन्हा एकदा ट्रॅक वर येणार आहे.
एकीकडे राज्यातून अनेक प्रकल्प इतर राज्यात जात असल्याने तरही अनेक प्रकल्पाबाबत सांशकता निर्माण झाली आहे. त्यातच नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पास ब्रेक लागल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाऐवजी 'रेल कम रोड' हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. विशेष म्हणजे म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला निओ मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा फ्रंटफूट वर आला आहे. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आयोजिलेल्या बैठकीत मनपा आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिकला दत्तक घेतले. त्यावेळी त्यांनी नाशिक शहरात निओ मेट्रोचा प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. त्यानुसार कार्यवाही झाली, मात्र पुढे हा प्रकल्प बारगळला. जवळपास दीड वर्षांपासून केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित राहिला. मात्र आता पुन्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. याबाबतचे संकेत मनपा आयुक्त पुलकुंडवार यांनी दिले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलाविलेल्या बैठकीत निओ मेट्रो प्रकल्प महिनाभरात मंजूर होणार असल्याचे पुलकुंडवार यांनी सांगितले. तसेच अमृत दोन योजनेतून 350 कोटींचा पाणीपुरवठा आराखडा तसेच 400 कोटींच्या मल्लनिसरण आराखड्याला निधी मिळणार असून सद्यस्थितीत इलेक्ट्रिक बसेस साठी निधी करता केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे. नमामि गोदावरी या प्रकल्पाचा सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यानंतर डीपीआर तयार केला जाईल अशी माहिती चंद्रकांत फुलकुंडवार यांनी दिली आहे.
नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्प?
नाशिक मेट्रो किंवा नाशिक मेट्रो निओ ही नाशिक महानगर क्षेत्रात प्रस्तावित जलद वाहतूक प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाशिक शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच नाशिक शहराला उपनगरांपासून थेट जोडण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यानुसार नाशिक निओ मेट्रो देवळाली, नाशिक रोड, उपनगर, नाशिक, ओझर विमानतळ, सिन्नर, इगतपुरी, गंगापूर, त्रंबकेश्वर, दिंडोरी, भगूर, निफाड, आडगाव, घोटी आणि गिरणारे या नाशिक परिसरातील उपनगरांना जोडण्यात येणार आहे. दीड वर्षांपासून या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी असल्याचे समजते.