Nashik Crime : नाशिकमध्ये उत्पादन शुल्कला लावला चुना, गोडावूनमधून साडे चार लाखांची दारू चोरली
Nashik Crime : राज्य उत्पादन शुल्कच्या (State Excise Duty) नाशिक (Nashik) येथील कार्यालयाच्या गोदामातून मद्याची चोरी करण्यात आली आहे.
Nashik Crime : राज्य उत्पादन शुल्कच्या (State Excise Duty) नाशिक (Nashik) येथील कार्यालयाच्या गोदामातून मद्याची चोरी करण्यात आल्याची बाब पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. यात सुमारे साडे लाख रुपयांची दारू (Liquor) चोरटयांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता चोरटयांनी थेट शासकीय कार्यालयच लक्ष केल्याने अशा शासकीय कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे.
नाशिक शहर परिसरात दिवाळीच्या (Diwali) दिवसांत मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांच्या घटना उघडकीस आले आहेत. दिवाळीनिमित्त कार्यालय, शासकीय कार्यालय बंद आहेत. तर बाहेरगावी राहणारे नागरिक गावी गेल्याने अनेक घरे देखील कुलूपबंद आहेत. याचा फायदा घेत नाशिकमध्ये चोरट्यांनी दिवाळी साजरी केली आहे अशातच नाशिकच्या पंचवटी परिसरात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला दिवाळीची शासकीय सुट्टी असल्याने कर्मचारी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राज्य उत्पादन विभागाकडून जप्त केलेला मुद्देमाल चोरून नेला आहे. उत्पादन शुल्कच्या गोडाऊनच्या खिडकीचे गज कापून गोडाऊनमधून तब्बल चार लाख 68 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
राज्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा झालेला असताना नाशिकमध्ये देखील चोरट्यांची दिवाळी ही धुमधडाक्यात साजरी झाली आहे. कारण नाशिकमध्ये दिवाळीच्या काळात चोऱ्या, घरफोड्या यांचं प्रमाण हे वाढलं असतानाच चोरांनी चक्क राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊनवरच डल्ला मारलेला आहे. या ठिकाणाहून जवळपास 65 विस्की चे बॉक्स चोरी गेले असल्याची माहिती उत्पादन शुल्ककडून देण्यात आली आहे. एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे. नाशिकमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये चोरट्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊन मधल्या दारूवरच डल्ला मारला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊन मधून चोरट्याने तब्बल चार लाख 68 हजार रुपयांची चोरटयांनी हातोहात लंपास केली आहे.
दीड वर्षांपूर्वी चोरीची घटना
दरम्यान चोरटयांनी शहरातील पंचवटी भागात असलेल्या उत्पादन शुल्कच्या विभागात ही धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये गोडाऊनमध्ये असलेल्या मालावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनि गोडाऊनच्या खिडकीचे गच कापून ही चोरी जाहिराती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी दिवाळीमुळे सुट्टीवर होते, मात्र सुट्टी होऊन परतताच त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला असून दीडच वर्षांपूर्वी याच ठिकाणाहून दारू चोरीला गेली होती आणि आता पुन्हा हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरून राज उत्पादन शुल्क विभागाकडून सुरक्षेच्या कारणास्तव पाऊले उचलली का जात नाहीत? असे प्रकार वारंवार का होत आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत.