एक्स्प्लोर

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; पहिल्या पसंतीचा कल किती वाजेपर्यंत येणार?

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधरची मतमोजणी 28 टेबलवर चालणार असून, पहिल्या पसंतीचा कल पुढे येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणूकीच्या मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.28 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी (Sayyad Pimpri) येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

राज्यातील पाच शिक्षक पदवीधर मतदारसंघात आज मतमोजणी होत आहे. मात्र या सर्वात नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यातील 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्यानंतर आज सर्व मतपेट्या उघडण्यात आल्या असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जवळपास 28 टेबलवर मतमोजणी चालणार असून, पहिल्या पसंतीचा कल पुढे येण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. 

दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून 28 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली असून एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल. या एका टेबलवर तीन अधिकारी उपस्थित राहतील. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश असेल. तसेच सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते एकमेकांत मिसळले जातील, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. यातून वैध मते काढून मतमोजणाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला सुमारे चार तास लागतील. तर नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीचं ठिकाण हे सय्यद पिंपरी असून मतमोजणीच्या वेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मात्र मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

नेमकी मतमोजणी कशी होणार? 

सुरुवातीला मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा काढण्यात येईल. वैध मताला दोनने भागून त्यात एक आकडा मिळविला की कोटा प्राप्त होतो. ज्या उमेदवाराने पहिल्या पसंतीची मते मिळवून कोटा पूर्ण केला त्याला विजयी घोषित करण्यात येईल. कोटा पूर्णच झाला नसेल तर पहिल्या पसंतीची मते ज्याला सर्वांत कमी मिळाली त्या उमेदवाराला बाद ठरवून त्याच्या मतपत्रिकेत मतदाराने दुसरा पसंतीक्रम कुणाला दिला त्यानुसार मतमोजणी केली जाते. मतपत्रिकेत पसंतीक्रम शब्दांत नोंदविणे, एकाच उमेदवारांच्या समोर 1, 2, 3 असा क्रम लिहिणे असे आढळल्यास ही मते अवैध ठरविण्यात येईल. केंद्रात असलेल्या जांभळ्या शाईच्या पेनाऐवजी इतर पेन वापरला तरीही मत अवैध ठरते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरच मतदारांचे स्वत:चे पेन जमा करण्यात आले होते. मतदारांना जांभळ्या रंगाचा विशिष्ट पेन निवडणूक आयोगाकडूनच देण्यात आला आहे. प्रथम पसंती दर्शवली नसल्यास मत अवैध ठरते. कोणाची मते अवैध ठरली, हे मतमोजणी करताना निदर्शनास येईल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane on Uddhav Thackeray : उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, यांनी महाराष्ट्राची लाज घालवली, नारायण राणेंची टीका
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, यांनी महाराष्ट्राची लाज घालवली, नारायण राणेंची टीका
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Narayan Rane : माझ्या एवढं मातोश्री कुणाला माहित नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणाShahajibapu Patil : धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर पाणी मागायला यायचं नाही :शाहाजीबापू पाटिलUddhav Thackeray On Narayan Rane : लघु किंवा सूक्ष्म प्रकल्प आणला का ? राणेंना ठाकरेंचा खोचक सवालUddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane on Uddhav Thackeray : उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, यांनी महाराष्ट्राची लाज घालवली, नारायण राणेंची टीका
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, यांनी महाराष्ट्राची लाज घालवली, नारायण राणेंची टीका
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण
Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Aaditya Thackeray In Kolhapur : शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
CSK vs SRH : पथिरानाचं भन्नाट प्लॅनिंग, भेदक यॉर्करवर मार्क्रमच्या दांड्या गुल, मॅच थांबवण्याची वेळ, थेट स्टम्प बदलावा लागला,पाहा व्हिडीओ
पथिरानाच्या भेदक यॉर्करवर मार्क्रमच्या दांड्या गुल, पंचांवर मॅच थांबवण्याची वेळ, नेमकं काय घडलं?
Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार; कदमबांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचे पत्रकातून उत्तर
राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा, विचारांचा खरा वारसदार : शाहू महाराजांचे कदमबांडेंना उत्तर
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम
मराठमोळ्या तुषार देशपांडेचा धमाका, हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम
Embed widget