Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...मी तुम्हाला हात जोडतो....
Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सगळीकडून खलबते सुरु आहेत. अशातच या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा अशा शब्दांत त्यांनी सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून अशातच राज्यातील सत्तासंघर्षाच्या खटल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आता उद्या, गुरुवारी 11 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांना सामोरे गेल्यानंतर सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा असे ते म्हणाले आहेत.
मी तुम्हाला हात जोडतो अशी प्रतिक्रिया देत सर्वांना शुभेच्छा असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांच्या सुकन्या यांच्या विवाहासाठी जळगाव आले होते विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र एकच वाक्यात आपली प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाबाबत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल हा मेरिटवर
तर दुसरीकडे जळगावमध्ये असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) सत्ता संघर्षावर म्हणाले कि, सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्या येतो, परवा येतो हे सांगता येत नाही. तसेच कर्नाटक निवडणुकीबाबत ते म्हणाले कि, युपी, बिहारच्या बाबतीत जस झालं, तसेच कर्नाटकच्या बाबतीत होईल, कर्नाटकमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच संजय राऊतांवर ते म्हणाले कि, संजय राऊत यांनी स्वप्न पाहत राहावी, ते बिचारे ते जागेपणी स्वप्न पाहत आहेत, त्यांनी ती पहावीत.. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा मेरिटवर लागेल, त्यांनी स्वप्न पाहणे बंद करावीत.
काहीही सत्ता संघर्ष नाही....
तसेच मंत्री सुधीर मुंगटीवाल हे देखील जळगावमध्ये असताना त्यांनी देखील सत्ता संघर्षावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्या सत्याचाच विजय होईल. काहीजण हवा पसरविण्याचा प्रयत्न करतात, मायावी विचार मांडतात, गैरसमज निर्माण करतात. त्यामुळे काहीही सत्ता संघर्ष नाही, आम्ही जनतेच्या विकासासाठी काम करतोय, यापुढेही करू असे म्हणत अपात्र होतोच कुठे असे म्हणत सरकार कोसळणार नाही, असा विश्वास ही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.