(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News : आता शाळांमध्ये एक मिनिटही वीजपुरवठा खंडित होणार नाही, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra News : महाराष्ट्र सरकारने शाळांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली आहे.
Maharashtra News : राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शाळांना अखंडित वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारही अनुदानावर शाळांना वीज पुरवठा करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांना अनुदानावर वीज देण्याचा विचार
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, शाळांच्या थकीत वीज बिलांसाठी सरकारने 14 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सर्व शाळांमध्ये वीज पुरवठा असेल आणि त्यांना वीजपुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी शाळांना दिले आहे. शैक्षणिक संस्थांसाठी सवलतीच्या वीज दरांच्या मागणीवर सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केले की, "राज्यातील शाळांना अखंडित वीजपुरवठा मिळेल, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आम्ही शाळांना अनुदानित वीज देण्याच्या धोरणावरही काम करत आहोत."
Let there be light! The Maharashtra government has decided that schools in the state will get uninterrupted power supply. We are also working on a policy for subsidised electricity for schools. #education pic.twitter.com/Vhf8lBMaJf
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 19, 2022
2 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना सुरुवात
या कडक उन्हाळ्यात सरकारच्या या निर्णयामुळे शाळांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. शाळांमधील पंखे आणि दिवे यासाठीच नाही तर प्रयोगशाळा आणि इतर आवश्यक उपकरणे चालवण्यासाठीही वीज लागते. महाराष्ट्रातील शाळांमध्ये लवकरच उन्हाळी सुट्टी अपेक्षित आहे. शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, शाळांनी एप्रिलमध्ये परीक्षा पूर्ण करून 30 एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करायचा आहे. महाराष्ट्र एचएससी, एसएससी निकाल 2022 देखील मे मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील शाळा 2 मेपासून बंद होणार असून 13 जूनपासून नवीन सत्र सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :