Maharashtra Rain Update: राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार कोसळणार, तर पुढील दोन दिवस 17 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आलो असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सर्व आमदार मुंबईत आले आहेत. शरद पवार आणि अजित पवार गटाच्या आमदारांची एक तास बैठक सुरू होती. त्यानंतर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवारांनी या सगळ्यांचा विचार करावा, पक्ष एकसंघ राहावा असं साकडं त्यांना घातले. आज दिवसभरात अजित पवार गटाने दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे.
Mumbai News: मुंबई पोलिसांचे विशेष कृती दलाचे (SIT) पथक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल
Maharashtra News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज नांदेड जिल्हयातील हदगाव मध्ये बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने हदगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता पाटील हे याच मागणीसाठी गेल्या 14 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले. त्यांची तब्येत खालावली. उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. दरम्यान आज सकल मराठा समाजातर्फे हदगावमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Jejuri News: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. दुपारी एक वाजता खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गडावरून पालखीचे प्रस्थान झाले. भंडाऱ्याची मनसोक्त उधळण पालखी वरती केली गेली.
Nagpur Crime : केंद्रीय मंत्री गडकरी धमकी प्रकरण, 'एनआयए'च्या अर्जावर उद्या सुनावणी होणार
न्यायाधीश सुट्टीवर असल्याने उद्या सुनावणी झाली नाही.
धमकी प्रकरणाचा तपास आणि दोन्ही आरोपी सोपावण्यासाठी एनआयए चा नागपूरच्या विशेष न्यायालयात होता अर्ज
गडकरी धमकी प्रकरणात जयेश पुजारी आणि दहशतवादी अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एन आय ने तपास आणि आरोपी आमच्याकडे द्यावा अशी अर्जात मागणी केली आहे.
Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बीएमसीच्या मुख्यालयात पोहोचले.
कथित कोविड भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे तपासण्यासाठी तत्कालीन अधिकारी आणि त्यांच्या अधिकारांची माहिती गोळा करण्यासाठी ही टीम पोहोचली.
ईओडब्ल्यू टीम बीएमसी कार्यालयात आहे. कोविड काळात बीएमसीने डेड बॉडी बॅग, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, कोविड सेंटरचे काम वाढीव दराने दिलेल्या कंत्राटातील नियमांकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ईओडब्ल्यूकडे पाठविण्यात आलं आहे. ईडी या प्रकरणाचाही तपास करत आहे. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. EOW त्याच्या स्थापनेपासून कार्यरत आहे.
Jalna News: जालना जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठे प्रकल्प कोरडे पडायला लागले आहेत. भोकरदन तालुक्यातील जुई धरणाची पाणी पातळी घटली असून धरणात आता केवळ सात टक्केच पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या 25 गावांसमोर जलसंकट उभं राहण्याची शक्यता आहे. धरणक्षेत्रात आजवर केवळ 90 मिलिमीटर पाऊस झाला असून तालुक्यातील सर्वात मोठ्या धरणाची ही अवस्था असल्यानं पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
Beed News: लांब पल्ल्याचा धावफूट असलेल्या बीडच्या अविनाश साबळे ची 2024 मध्ये पॅरिस या ठिकाणी होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.. ऑलिंपियन धावपट्टीच्या वतीने पोलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सिलेस या डायमंड लीगमध्ये अविनाश साबळे यांने सहाव्या स्थानावर मजल मारली असून त्यांने आठ मिनिटात 11. 63 सेकंदांमध्ये पुरुषाच्या 3 हजार मीटर स्टीफलचेसचे अंतर गाठल आहे आणि यातून त्याला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची संधी मिळाली असून, 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात पॅरिस या ठिकाणी होणाऱ्या जागतिक अथल्यानटीक स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे.
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या कथित 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोक आयुक्तांमार्फत चौकशी व्हावी : आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंदर्भात लवकरच समिती नेमून यामधील दोशींवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले
मात्र समिती नेमण्याऐवजी या सगळ्याची लोक आयुक्तांकडून चौकशी करणे महत्त्वाचे आहे असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे
एप्रिल महिन्यात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत 263 कोटींचा स्ट्रिट फर्निचर घोटाळा झाला असल्याचं पत्रकार परिषद घेऊन आरोप केले
या संदर्भात एक जुलै रोजी मोर्चाच्या दिवशी काही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देऊन विचारले
मात्र पंधरा दिवस होऊन या संदर्भात कुठलाही अहवाल किंवा पत्राला उत्तर आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिका आयुक्तांकडून मिळालेला नाही
Pune News: जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती आमावस्याला भरते. आज सोमवती आमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज दुपारी 1 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील. दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल. सोमवती आमवास्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते. यात्रेला 2 ते 3लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे.. तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Dr. Mangala Narlikar Passes Away: डॉ. मंगला नारळीकर यांचे आज पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या मुलीच्या पुण्यातील घरी रहात होत्या. एक गणितज्ज्ञ आणि लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगणार्या लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी असूनही संशोधन आणि लेखन यामध्ये त्यांची स्वतंत्र ओळख होती. महाराष्ट्र सरकारच्या पाठ्यपुस्तक निर्मीती समितीवर देखील त्यांनी काम केले. सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -