Dasara Melava Uddhav Thackeray : आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात विरोधकांवर हल्लाबोल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Baramati News : बारामतीमधील सोमेश्वर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभास्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर यावेळी सभा स्थळावरुन कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले.
Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर कंटेनर पटली होऊन अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सध्या आहे.
Solapur News : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.
Latur News : मराठा आरक्षणाचा मुद्दा देशमुख बंधुंनी विधानसभेत मांडला नसल्याच्या रोषातून मराठा समाजाकडून लातूरमधील रेनापूर तालुक्यात निवाडा येथे त्यांचा ताफा आडवण्यात आला.
RSS Dasara : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव होत आहे. प्रमुख पाहूणे म्हणून शंकर महादेवन उपस्थित आहेत. शस्त्रपुजेनंतर मोहन भागवत संबोधन करणार आहेत.
Tuljapur Dasara : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात विजयादशमी साजरी झाली आहे. लाखो भक्तांनी दर्शन घेतले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज विजयादशमी साजरी करण्यात आली यावेळी देवीने भक्तांसोबत बाहेर येत सिमौलंघन केले.
Shinde Dasara Melava : मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बसेस मधून शिवसैनिक मुंबईतील आझाद मैदानाकडे निघाले आहेत.. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शिवसैनिक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर येणार असून ठाकरेंच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला फारसे शिवसैनिक जाणार नाहीत असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईतील दसरा मेळावा कुणाचा मोठा होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागला आहे.
Dasara Melava : : मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला अमरावती जिल्ह्यातून शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते रात्री अमरावती जिल्ह्यातून रवाना
Dasara Melava : : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आव्हानुसार दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबई येथे दाखल होत आहे. त्याच अनुषंगाने अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात सुद्धा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ट्रॅव्हल्स मध्ये शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत.

RSS Dasara : सरसंघचालक मोहन भागवत रेशीमबाग मैदानात दाखल झाले आहेत. तसेच शस्त्र पूजनाला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक यांच्या हस्ते शस्त्र पूजन नंतर स्वंयसेवकांच्या शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिक होतील. त्यानंतर प्रमुख पाहुणे शंकर महादेवन यांचे आणि अखेरीस सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे उद्बोधन होईल.
Shinde Dasara Melava : मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बसेस मधून शिवसैनिक मुंबईतील आझाद मैदानाकडे निघाले आहेत.. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शिवसैनिक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर येणार असून ठाकरेंच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला फारसे शिवसैनिक जाणार नाहीत असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईतील दसरा मेळावा कुणाचा मोठा होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागला आहे.
RSS Vijayadashami : गेले काही वर्ष संघ सातत्याने सामाजिक समरसता या विषयावर लक्ष केंद्रित करत असून त्या अनुषंगाने काही महत्वाचे कार्यक्रम सरसंघचालक सुचवू शकतात.
Shankar Mahadevan : : यंदा संघाच्या विजयादशमी उत्सवात संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वरूपाने आणि भविष्यात सुद्धा संघ आजवर संघाचा फारसं काम आणि संपर्क नसलेल्या चित्रपटसृष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे का? चित्रपट सृष्टीतले काही चेहरे समाजातील इन्फ्लुएन्सर म्हणून संघाला उपयोगी वाटत आहेत का? अशी चर्चा शंकर महादेवन यांच्या संघाच्या विजयादशमी उत्सवातील उपस्थितीमुळे सुरू झाली आहे...
Mohan Bhagwat : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरसंघचालकांचा हा अखेरच्या विजयादशमी उद्बोधन राहणार आहे. त्यामुळे शंभर टक्के मतदान असा आवाहन मतदारांना करताना सरसंघचालक संघाच्या कोट्यवधी स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकीसाठी काय सूचना आणि संकेत देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
RSS Vijayadashami : संघाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने पुढील वर्ष अत्यंत महत्वाचे असून संघ शताब्दी वर्षात कोणत्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
RSS Vijayadashami : सरसंघचालक डॉ मोहन भागवत स्वतः अशोक चौकावर उपस्थित राहून या पतसंचलनाचे अवलोकन करणार आहे.. स्वयंसेवकांची मानवंदना स्वीकार करणार आहे.
Nagpur RSS Dasara : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. आरएसएसचे कार्यकर्ते या सोहळ्यात शिस्तबद्धरित्या सहभागी होतात. संघाच्या स्वयंसेवकांकडून पथसंचालनही पार पडतं. याशिवाय सरसंघचालक यावेळी शस्त्रांची पूजाही करतात. याचं एक खास कारणही आहे. संघाची स्थापना 1925 साली विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशीच झाली होती. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला आपण घरी करतो त्याप्रमाणे संघाच्या कार्यालयातही शस्रपूजन पार पडतं. संघाचे सरसंघचालक आणि इतर सदस्य शस्रांचं पूजन करतात. 9 दिवसांच्या उपासनेनंतर 10 व्या दिवशी दशमीला विजयाच्या कामनेनं शस्रांचं पूजन केलं जातं.
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयसेवकांचे पथसंचलन नागपुरात होत आहे. सरसंघचालक डॉ मोहन भागवत अशोक चौकावर उपस्थित स्वयंसेवकांची मानवंदना स्वीकारत आहेत.
Devendra Fadnavis On RSS Dasara : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी रेशीमबागेत दाखल झाले आहेत.
RSS Dasara : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडणार आहे.. परंपरेनुसार स्वयंसेवकांचा पथसंंचलन आणि शस्त्र पूजन झाल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. संघाच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत पुढील वर्षातील कार्याची दिशा सरसंघचालकांच्या उद्बोधनातून स्पष्ट होत असते.
RSS Dasara : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडणार आहे.. परंपरेनुसार स्वयंसेवकांचा पथसंंचलन आणि शस्त्र पूजन झाल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. संघाच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत पुढील वर्षातील कार्याची दिशा सरसंघचालकांच्या उद्बोधनातून स्पष्ट होत असते.
Tuljapur Dasara : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात विजयादशमी साजरी झाली आहे. लाखो भक्तांनी दर्शन घेतले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज विजयादशमी साजरी करण्यात आली यावेळी देवीने भक्तांसोबत बाहेर येत सिमौलंघन केले.
RSS Dasara : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव होत आहे. प्रमुख पाहूणे म्हणून शंकर महादेवन उपस्थित आहेत. शस्त्रपुजेनंतर मोहन भागवत संबोधन करणार आहेत.
RSS : रेशीमबागेतील विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन यांची विशेष उपस्थिती!
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -