Fake Medicine controversy: नागपूर, वर्धा, भिवंडी आणि आता अंबाजोगाईसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषध पुरवठ्याच्या घटना उघडकीस येत असून औषध पुरवठ्यात होणाऱ्या बोगसगिरीची भांडाफोड झाली आहे. या प्रकरणात मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता असून शासकीय रुग्णालयांमध्येच बोगस औषधांचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मागच्या पंधरा महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप प्रशासनाच्या हाती काहीच कसे लागले नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय? काय आहे औषध पुरवठ्यातील ही बोगसगिरी, वाचा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
नागपूर, वर्धा, भिवंडी आणि आता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट औषधांचं आंतरराज्यीय रॅकेट असल्याची शंका व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अंबाजोगाईतील प्रकार कसा उघडकीस आला?
अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयातील एका रुग्णाला औषधामुळे रिएक्शन आली. याबाबत रुग्णालय प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार केली. तपासादरम्यान, नागपूरमध्येही अजिथ्रोमाइसिन टॅब्लेट बनावट असल्याचे समोर आले.अन्न औषध प्रशासनाने ज्या औषधांमुळे रिएक्शन आली त्या औषधाचा वापर थांबवला मात्र याच दरम्यान नागपूर पासून सुरू झालेल्या अजिथ्रोमाइसिन टेबलेट्स च्या वापरा संदर्भात फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने चौकशी केली आणि हे औषध बनावट असल्याचे पुढे आले.
रुग्णालयामध्ये 25000 गोळ्यांचा साठा सापडला
अजिथ्रोमाइसिन टॅब्लेट पुरवण्याचं कंत्राट हे कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस या कंपनीला मिळाल होते.. विशाल एंटरप्राईजेस न पुरविलेल्या या औषधांची तपासणी फूड अँड ड्रग करून सुरुवात झाली.. याच विशाल एंटरप्राईजेसने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाला गोळ्यांचा पुरवठा केला होता.. या गोळ्याच्या तपासासाठी ज्यावेळी या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आले त्यावेळी या रुग्णालयामध्ये 25000 गोळ्यांचा साठा होता.. नागपूर मध्ये तक्रार झाल्यानंतर या गोळ्यांचा वापर थांबवण्यात आला..
नागपुरातही साठा सापडला, गुन्हा दाखल
अंबाजोगाई प्रमाणेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयास पुरवलेल्या औषधांचा साठा बनावट असल्याचे स्पष्ट होताच कोल्हापूर मधल्या विशाल एंटरप्राइजेस कंपनीसह सुरत ठाणे आणि भिवंडी येथील औषध पुरवठादार आणि वितराकावर नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.. विशेष म्हणजे यामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या विशाल एंटरप्राइजेस ने मात्र गोळ्याच्या उत्पादन करणाऱ्या कंपनीनीच दोषी असल्याचे तपासात म्हटले आहे..
बनावट औषधी पुरवण्याचा हा प्रकार मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये घडला आणि या प्रकरणी आत्ता बीडच्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने पोलिसात तक्रार केली आहे.. रुग्णांच्या जीवनाशी खेळणाऱ्या इतक्या संवेदनशील प्रकरणी सुद्धा मागच्या पंधरा महिन्यांमध्ये मनवा तसा तपास पुढे गेलेला नाही.. नागपूर वर्धा आणि भिवंडी नतर औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहीर त्रिवेदी, द्विती त्रिवेरी आणि विजय चौधरी या चौघांसह संबंधित औषध कंपन्यांवर देखील अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. - विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई पोलीस स्टेशन
संथ गतीनं तपास
शासकीय रुग्णालय असो की खाजगी रुग्णालय आपल्याकडे कुठेच खरेदी केलेल्या औषधांची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही.. औषध उत्पादक कंपनीने दिलेल्या अहवालाच्या आधारेच आपल्याकडे वितरक आणि विक्रेत्याकडून सर्रास औषधांची खरेदी अथवा विक्री होते.. तक्रारीनंतर एखाद्या गोळी संदर्भात तपास झालाच तरी तो सुद्धा किती संथ पद्धतीने होतो हेच या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.