त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
बॉलिवूडच्या दुनियेत असे काही चेहरे आहेत, ज्यांच्या मृत्यूचं गुढ अजूनही अनुत्तरीत आहे. आजदेखील या सेलिब्रिटींसोबत नेमकं काय घडलं होतं? याची कुणालाच कल्पना नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये पहिल्या क्रमांकावर श्रीदेवी ही अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचा मृत्यू आजही गुढ समजला जातो. श्रीदेवीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आजही कोणालाच माहिती नाही. श्रीदेवी पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये मृतावस्थेत आढळली होती. श्रीदेवाची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असे सांगितले जाते. मात्र तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सुशांतसिंह राजपूत आहे. या तुरुण अभिनेत्याने गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्याच्या मुंबईतील राहत्या फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला होता. सुशांतसिंह राजपूतने गळफास घेतला नव्हता, त्याची हत्या झालेली आहे, असा दावा त्याचे कुटुंबीय आजही करतता.
जिया खान या अभिनेत्रीचा मृत्यू चांगलाच चर्चेत आला होता. तिनेही घरातील फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. 3 जून 2013 रोजी तिने हे टोकाचं पाऊल उचलले होते. अभिनेता आणि तिचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीने तिचा खून केल्याचा आरोप करण्यात आला होता.
दिव्या भारती या आघाडीच्या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारणही तेवढेच गुढ आहे. तिने वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील राहत्या अपार्टमेंटधून खाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. मात्र नंतर हा खटला बंद करण्यात आला
दिव्या भारती