Ajit Pawar : 'देवगिरी' बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीला नेत्यांची उपस्थिती; पण, अजितदादा आहेत कुठे? चर्चांना उधाण
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 Oct 2023 11:26 PM
Nanded Hospital : खासदार पाटील माफी मागा, अन्यथा... ; नांदेड रुग्णालयातील 'त्या' घटनेवर मार्ड आक्रमक
Nanded Hospital Death Case : नांदेड शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात मार्ड संघटना आक्रमक झाली आहे. Read More
Ajit Pawar : 'देवगिरी' बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीला नेत्यांची उपस्थिती; पण, अजितदादा आहेत कुठे? चर्चांना उधाण
Ajit Pawar : अजित पवार यांच्याच निवासस्थानावर होत असलेल्या बैठकीत ते अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. Read More
IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा; नाना पटोंलेचा हल्लाबोल
Congress On IPS Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्या होत्या. आता, त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे, Read More
Maharashtra Politics : ट्रिपल इंजिनमधील एका नाराज इंजिनाने फडणवीसांची भेट घेतली; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य
Supriya Sule : तीन महिन्यातच या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्या असून नाराज घटकाने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असल्याचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. Read More
Mumbai : नवजात शिशूंची पाच लाख रुपयांना विक्री; बाळांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टरांसह टोळीला अटक, मुंबईत कारवाई
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या मास्टरमाईंडसह आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे. Read More
हे सगळं भयानक... शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय? नांदेड, संभाजीनगरच्या घटनांनंतर आदित्य ठाकरेंचा संताप
Nanded Hospital Tragedy: शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनांवरुन संताप व्यक्त केला आहे. Read More
मुंबईत बॅनर, होर्डिंगला ऊत; गणेशोत्सवातील राजकीय बॅनर्स काढण्यात पालिका उदासीन
मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी अशाप्रकारे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स अजूनही शहरात दिसत आहेत. गणेशोत्सव संपला तरीही राजकीय पक्षांकडून अजूनही शुभेच्छा देणारे बॅनर्स उतरवण्यात आलेले नाहीत. Read More
Maharashtra: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू, राहुल गांधींनी भाजपवर साधला निशाणा, म्हणाले...
Nanded News: नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू हे औषधांच्या तुटवड्याने झाले नसल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाच्यावतीने देण्यात आले आहे. Read More
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -