एक्स्प्लोर

Nanded Hospital : खासदार पाटील माफी मागा, अन्यथा... ; नांदेड रुग्णालयातील 'त्या' घटनेवर मार्ड आक्रमक

Nanded Hospital Death Case : नांदेड शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात मार्ड संघटना आक्रमक झाली आहे.

मुंबईनांदेडच्या (Nanded Hospital Death Case)  डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा आणि त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना शौचालय साफ करण्यास सांगितले. या घटनेवर नाराजी व्यक्त होत असताना आता निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने (MARD) आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार पाटील (MP Hemant Patil) यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल असे मार्डने म्हटले आहे. 

नांदेड (Nanded) येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झाली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन पुकारतील असा इशारा मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिला आहे. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. 

खासदार हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे महासचिव राहुल मुंडे यांनी दिला आहे. सोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

राज्य सरकारनं शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील औषधांच्या तुटवडा दूर करावा, डॉक्टरांवर त्याचे खापर फोडण्याऐवजी रुग्णांना मदत करावी असेही मध्यवर्ती मार्डने म्हटले आहे. 

प्रकरण काय?

डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा आणि त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे.  एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आज या रुग्णालयात येऊन पाहणी केली.  यावेळी  नांदेड- रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. हे पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांची धक्कादायक कृती समोर आली आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावलं आहे. एवढच नाही तर  हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले. 

रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत होते.अनेक  शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील नव्हते, असे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget