एक्स्प्लोर

मुंबईत बॅनर, होर्डिंगला ऊत; गणेशोत्सवातील राजकीय बॅनर्स काढण्यात पालिका उदासीन

 मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी अशाप्रकारे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स अजूनही शहरात दिसत आहेत. गणेशोत्सव संपला तरीही राजकीय पक्षांकडून अजूनही शुभेच्छा देणारे बॅनर्स उतरवण्यात आलेले नाहीत.

मुंबई :  वाढदिवस असो किंवा सणवार शुभेच्छांचे बॅनर झळकतात आणि याच बॅनरमुळे शहरं घुसमटत आबे. आता  गणेशोत्सव संपला तरी बॅनर काही निघाले नाहीत. त्यामुळे राजकीय बॅनरकडे पालिका दुर्लक्ष करतेय का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.   जी 20 साठी शहरे एवढी चांगली सजवली मग उत्सवांच्या काळात होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

 मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी अशाप्रकारे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स अजूनही शहरात दिसत आहेत. गणेशोत्सव संपला तरीही राजकीय पक्षांकडून अजूनही शुभेच्छा देणारे बॅनर्स उतरवण्यात आलेले नाहीत. गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून अशाप्रकारचे बॅनर्स लावण्यात आलेले होते. मात्र, अद्यापही हे पोस्टर्स सर्वच मुंबईभर दिसत आहेत.

गणेशोत्सव संपला, मग बॅनर कधी उतरणार?

जी 20 च्या निमित्ताने पाण्यासारखा पैस खर्च करुन मुंबई सजवली होती पण राजकारण्यांच्या बॅनरमागे मुंबईची सुंदरता लपली गेली. गणेशोत्सव संपून चार- पाच दिवस उलटून गेले आहेत.  तरीही शहरातल्या होर्डिंग्जबाबत मुंबई महापालिका काय करते आहे? असा प्रश्न निर्माण होतो. इतरवेळी होर्डिंग्जबाबत जागृक असलेली मुंबई महापालिका राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर्स काढण्याबाबत इतकी उदासीन का? असा प्रश्न देखील निर्माण होतोय. मुंबई उच्च न्यायालयाकडून यासंदर्भात ताशेरे ओढल्यानंतरही पालिका गंभीर नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतल्याचं दिसतं. होर्डिंग्स संस्कृती संपवण्यासाठी सर्व पक्षीय एकत्रित येत ठोस भूमिका घ्यायला हवी अशी भूमिका देखील ट्विट करताना केली आहे. मुंबईतील अनधिकृत/विनापरवानगी असलेले बॅनर हटवण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. वेळोवेळी महापालिका अधिकृत बॅनरवर कारवाई करत असते.

राज ठाकरेंची कठोर भूमिका 

शहरातील होर्डिंग्स याने शहर विद्रुप होतात असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे.मी या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असणार आहे.  

 लालबाग परिसर, वरळी, भायखळा, परळ, भांडूप परिसरात काही ठिकाणी अजूनही असे पोस्टर्स दिसत आहे. उत्सवांच्या काळात होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण का? असा प्रश्न उपस्थित होते. यासंदर्भात सर्वपक्षीयांनी एकत्रित येत होर्डिंग्ज संस्कृतीच्या आहारी न जाता ती बंद करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बॅनर म्हणजे राजकारण्यांच्या प्रचाराचं माध्यम आहे. याच बॅनरमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न  राजकीय मंडळींकडून केला जातो. पण आता या बॅनरमुळे शहरंच गुदमरत आहे. बॅनरमुळे गुदमरलेल्या मुंबईची सुटका पालिका करणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav on Eknath Shinde : शिंदेंचा सवाल, भास्कर जाधव म्हणाले... नक्कल करायला अक्कल लागतेABP Majha Headlines : 11 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Embed widget