Devendra Fadnavis : शिवसेना, राष्ट्रवादीसोबत असले तरी राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस : देवेंद्र फडणवीस
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Beed News : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर याच निर्णयाला विरोध करण्यासाठी बीडमध्ये इन्फंट इंडिया या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं बीड जिल्ह्यामध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 650 शाळा बंद होणार असून यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा शैक्षणिक नुकसान होईल त्यामुळे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुराची मुलं ही वाडी वस्ती तांड्यावर याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात त्यामुळे त्यांच्या देखील शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत या मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आहे.
Maharashtra News: गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे रस्त्यावरच भर पावसात अंत्यविधी करण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बाभुळगाव खालसा येथे घडलीये. बाभुळगाव खालसा येथील कांताबाई साबळे यांचा रविवारी मृत्यू झाला, मात्र गावात स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात कांताबाई यांच्यावर रस्त्याच्याकडेला अंत्यसंस्कार करावे लागले. अनेक वेळेस मागणी करूनही गावाला स्मशानभूमी मिळत नाही, स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतकडे नियोजित जागा नाही, गावातील कोणी जागा द्यायलाही तयार नसल्यामुळे गावातील मयत ग्रामस्थांची मृत्यूनंतरही उपेक्षा होत आहे या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Maharashtra News: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी राहुरी तालुक्यातील तांभेरे गावातील राम मंदिरात निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केलंय. या उपोषणास स्वाभिमानी शेतकरी संरचना तसेच परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांनी पाठींबा दिलाय.
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सेक्युलर नेते आहेत ते अल्पसंख्याकांसाठी काम करताहेत असा दावा करत मला एकनाथ शिंदे हे मानसपुत्र समजतात असे वक्तव्य शिवसेना अल्पसंख्याक आघडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरीत केले आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सेक्युलर नेते आहेत ते अल्पसंख्याकांसाठी काम करताहेत असा दावा करत मला एकनाथ शिंदे हे मानसपुत्र समजतात असे वक्तव्य शिवसेना अल्पसंख्याक आघडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरीत केले आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Pune News: जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न राज्य सरकारने सोडवले नाहीत तर पुण्यातील तळेगाव एमआयडीसी अकरा ऑक्टोबर दिवशी ठप्प करू. भले एमआयडीसी मधून कंपन्या स्थलांतरित झाल्या तरी आम्ही परवा करणार नाही. असा इशारा सत्ताधारी आमदार सुनील शेळकेंनी दिलाय. यासाठी शेळकेंनी स्वतःच्याच सरकारला 10 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. 2020 साली बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांनी आज बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. जनरल मोटर्स कंपनीच्या ठिकाणी येणाऱ्या ह्युंदाई कंपनीत आम्हालाच नोकरी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी कामगार कुटुंबियांसह रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मावळमधील सत्ताधारी आमदार सुनील शेळकेंनी उपोषणस्थळी भेट दिली. जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न सरकार गांभीर्यानं घेतला नाही. अशी कबुली शेळकेंनी जाहीरपणे दिली. पण मी सत्तेत असलो तरी सरकारची बाजू घेणार नाही. सरकारने वस्तुस्थिती स्विकारायला हवी. आमचा ह्युंदाई कंपनीला विरोध नाही, पण स्थानिक भूमिपुत्र आणि कामगारांचे प्रश्न जो पर्यंत मिटत नाहीत, तोपर्यंत कंपनीत कोणतंही काम करू देणार नाही. आज दोन ऑक्टोबरला तुम्ही मुलांना-पत्नीच्या सोबतीने मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरला आहेत. हे पाहून सरकारला ही घाम फुटला असेल. म्हणूनच मी सरकारला दहा ऑक्टोबर पर्यंतचा अल्टीमेटम देतोय. त्यांनी निर्णय न घेतल्यास अकरा ऑक्टोबरला तळेगाव एमआयडीसी ठप्प करू, भले कंपन्या स्थलांतरित झाल्या तरी आम्हीच परवा करणार नाही. असा इशारा आपल्याच सरकारला आमदार शेळेकेंनी जाहीरपणे दिला.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -