Maharashtra News LIVE Updates : मंत्रालयातील बनावट कागदपत्र घोटाळा, उच्चपदस्थ अधिकारी सामील, मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
नाशिक - आंदोलकांच्या शिष्टमंडळाची थोड्याच वेळात पालकमंत्री दादा भुसेंसोबत बैठक
नाशिक - आंदोलकांच्या शिष्टमंडळाची थोड्याच वेळात पालकमंत्री दादा भुसेंसोबत बैठक
- नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक
- माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस
- आतापर्यंतच्या प्रशासनासोबतच्या 5 बैठका ठरल्या आहेत निष्फळ
Supriya Sule : जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत आहे, पंतप्रधान मोदी, अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
Supriya Sule : अतिथी देवो भव.. लोकशाही आहे ज्यांना निवडणूक लढायची आहे ते सर्वजण प्रचार करू शकतात... लोकसभा प्रचारासाठी माझे ही दोन राऊंड झाले आहेत.. जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत आहे..पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
Burning Train : अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसला आग, बेटावद जवळ गाडीतून निघाला धूर.
Burning Train : अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसला आग, बेटावद जवळ गाडीतून निघाला धूर....
हॉट एक्सल झाल्याने धुराचे लोट..
रेल्वे कर्मचारी व अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली...
रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना...
Prakash Ambedkar : नाना पटोले यांनी वकीलपत्र थोडी दिलं मला, प्रकाश आंबेडकर यांनी उडविली खिल्ली
Prakash Ambedkar : एकेकाळी नाना पटोले यांची भूमिका वंचितच्या बाबत कडक होती. मात्र, आता त्यांची निर्माण नरमाईची झाली. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारणा केली असता त्यांनी, हा प्रश्न नाना पटोले यानांचं विचारा...ते थोडी आम्ही सांगणार अहो. नाना पटोले यांनी जी धरसोड भूमिका जी आहे ती त्यांनी का ठेवली आहे, ते तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांनी मला वकीलपत्र थोडी दिलं आहे. त्यांनी त्यांची पिटिशन ड्रॉप करायला मला सांगितलं. हा मग मी त्यांना या धरसोडबाबत विचारतो. पिटिशन बाबत मग मी ड्रॉप मध्ये लिहितो....अशी खिल्ली प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केली.
Manoj Jarange : जसा येवल्याचा टांगा पलटी केला तसा नागपूरचा आता नंबर आहे, मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : जसा येवल्याचा टांगा पलटी केला तसा नागपूरचा आता नंबर आहे
मराठा आरक्षणाच्या आडवा जो कोणी येईल त्याला आता सोडणार नाही
मग तो यावल्याचा असून नागपूरचा असो ठाण्याचा असो किंवा बारामतीचा असो
माझ्यासाठी मराठा समाज सर्वात आधी