Maharashtra News LIVE Updates : नाशिकमध्ये महापालिकेची सिटी लिंक बससेवा ठप्प; दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी भाजपकडून सुरु असलेल्या पक्षप्रवेशावरून सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. एकीकडे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि दुसरीकडे 'शून्य विरोधी पक्ष' असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे. 'काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही, असे म्हणत सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला गेला आहे.
शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याचा गळा आवळल्याचा प्रकार
शिक्षण मंत्रांच्या जिल्हयात अभ्यासाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याचा गळा आवळल्याचा प्रकार घडला आहे. वर्गातील अन्य एका विद्यार्थ्याने थेट मोबाईलवर व्हिडीओ बनविल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या डोक्यात मारल्यानंतर हा शिक्षक त्याचा थेट गळाच आवळत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. ही घटना चार दिवसापूर्वीची असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार कुडाळ हायस्कूल मध्ये घडला असून या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थी मात्र घडलेल्या प्रकारामुळे नाराज आहेत.
मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही
जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीसह जागा वाटप पार पडलंय, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल, संजय राऊतांची माहिती. कोणती जागा कोणाला मिळेल यासंदर्भात वाद नाही, प्रत्येक जागेवर विजय होणं महत्त्वाचं, मविआच्या जागावाटप बैठकीनंतर संजय राऊतांचं वक्तव्य.
नाशिकमध्ये महापालिकेची सिटी लिंक बससेवा ठप्प
बस वाहकांनी आज सकाळी अचानक संप पुकारल्याने नाशिकमध्ये महापालिकेची सिटी लिंक बससेवा ठप्प झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने वाहकांनी हा निर्णय घेतला असून गेल्या दिड वर्षातील त्यांनी पुकारलेला हा सहावा संप आहे. ऐन परीक्षांच्या काळात महापालिकाची बससेवा बंद झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून बस थांब्यावर प्रवाशी बसची वाट बघत ताटकळत उभे आहेत.
प्रसादाची नारळ खाण्यासाठी अस्वल कंपनीचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश..
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगर खंडाळा ही गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत.. गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये जा करत असतात.. मात्र आता तर एक अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती.. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने या ठिकाणी ती आली असावी असा ग्रामस्थांचा अंदाज आहे.. परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते.. आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्याने सध्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे..त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.