MAHARASHTRA NEWS LIVE UPDATES : राज्यात अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू
Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात ट्रक चालकाचा लोखंडाच्या प्लेट खाली दबून मृत्यू . डहाणू तालुक्यातील आंबोली जवळील घटना . चालकाने अचानक ब्रेक घेतल्याने अवजड ट्रकच्या मागे असलेल्या लोखंडी प्लेट ट्रकच्या केबिन वर आल्याने अपघात . अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी . स्थानिक पोलीस घटनस्थळी दाखल
Baramati : 2 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर
Baramati : येत्या 2 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहे. बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन होत असून, हा मेळावा महायुती सरकार साठी देखील महत्त्वाचा असणार आहे. बारामतीच्या मेळाव्यासोबतच बारामतीचे बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय याचे देखील उद्घाटन होणार आहे. रोजगार मेळाव्यात पुणे विभागातील पाच जिल्हे 311 स्थानिक व बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तब्बल 43 हजार 613 जागांवर नोकरीची संधी हे वैशिष्ट्य आहे.आतापर्यंत या महारोजगार मेळाव्यासाठी तब्बल 14000 जणांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागाची नोंदणी केली असून, प्रशासनाने ऑफलाइन नोंदणी देखील ठेवलेली आहे. कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने
Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी
Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी.
तुपकरांनी शेगाव तालुक्यात तलाठी, कृषी साह्ययक यांना थेट बांधावर घेवून जात शेतकऱ्यांना दिला आधार.
तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्या
रविकांत तुपकरांची सरकारकडे मागणी.
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीने प्रचंड नुकसान
हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल.
Bhiwandi : मनसे शहरप्रमुखाची हद्दपारी, टोरंट पॉवर विज पुरवठा कंपनीच्या विरोधात मोर्चा
Bhiwandi : टोरंट पॉवर विरोधात आंदोलन करण्यात पुढाकार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाल्याने पोलिस उपायुक्त यांनी मनोज गुळवी यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. त्या विरोधात नाराजीचा सूर उमटत असून टोरंट पॉवर कंपनी विरोधातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मनोज गुळवी यांची केलेली हद्दपारी तात्काळ रद्द करावी,त्याच्या निषेधार्थ टोरंट पॉवर कंपनी विरोधात कारवाई करावी अशा मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले
Pune : बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
Pune : पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र या बेठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे देखील पोहचलेत. वसंत मोरे यांचा कात्रज भागातील प्रभाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. वसंत मोरेंनी या आधीच मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच जाहीर केलय. मात्र आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतय.