Maharashtra News Live Updates : विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ कामकाज एक तासासाठी तहकूब
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Gadchiroli Bus Fire : धावत्या बसने पेट घेतला
गडचिरोली : जिल्ह्यातील घोट - मुलचेरा महामार्गांवर धावत्या बसने पेट घेतला, बसमधील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस ST बसेसची अशी दुरावस्था समोर येणे सतत सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगारात भंगार बसेस असल्याचे चित्र आपण अनेकदा बघतील आहे कधी बसवरुन छप्पर निघालेली बस तर, कधी एका हातात स्टेरिंग आणि एक हातात वायपर पकडून चालक चालविताना आपण बघितलं. आता बसेस ना आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, त्याच बसा दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशांच्या जीव धोक्यात आले आहे. जिल्ह्यात नवीन 40 बसेस मंजूर झाले आहेत मात्र ते कधी जिल्ह्यात दाखल होतील याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्व बसेस लवकरात लवकर बदलून नवीन बसेस आणाव्यात अशी लोकांची मागणी आहे.
Belgaon News : चिंचली मायक्का देवीच्या यात्रेला प्रारंभ
Bhiwandi News : भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न.
भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परशुराम पाल असं आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून शहर पोलिसांनी पालिका मुख्यालया समोर त्याला आंदोलन करताना ताब्यात घेतले.
Eknath Shinde MLA fight : विधिमंडळांच्या लॉबीमध्ये Mahendra Thorve -Dada Bhuse आपसात भिडले
Mahendra Thorve vs Dada Bhuse : विधिमंडळांच्या लॉबीमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले.
Kalyan News : तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख विरोधात जोडे मार आंदोलन, भाजप महिला आघाडी आक्रमक
Kalyan BJP Protest : महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकवल्याबाबत गुन्हे दाखल असलेल्या पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख विरोधात कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीने निषेध आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान भाजप महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शाहजहान शेख विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शाहजहान शेख यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करत निषेध नोंदवला. महिलांवर अत्याचार करणाऱ्या शहाजहान शेख सारख्या आरोपीला पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी यांचे सरकार पाठीशी घालते, त्याला अटक करत नव्हते, त्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय यंत्रणांवर देखील शेळके समर्थकांनी हल्ला केला. शाहजहान शेख याचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.