Maharashtra News LIVE Updates : नांदेड मुखेडात परिक्षा केंद्रांना नक्कल पुरविणाऱ्या झेरॉक्स सेंटर चालकावर गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
Solapur : सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पुन्हा दावा
Solapur : सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पुन्हा दावा"
"आघाडीचा धर्म आम्ही पाळणार मात्र सोलापूर लोकसभा लढवण्याची आमची देखील तयारी"
"शरद पवार जो निर्णय देतील ते मान्य करून आम्ही काम करणार, सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका"
एकीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदेच्या उमेदवारीची चर्चा सुरु असताना शरद पवार गटाने पुन्हा एकदा आपला दावा सांगितला
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी मागितली लोकसभेची उमेदवारी
दरम्यान 6 मार्च रोजी शरद पवार गटाची नवीन चिन्हाच्या प्रचारासाठी पदयात्रा, आमदार रोहित पवार देखील राहणार उपस्थित
सोलापुरातील कोतंम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत होणार पदयात्रा
Pune - राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर
Pune - राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर
- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान भूमी वढू तुळापूर येथे स्मारक विकास आराखड्याचे करणार भूमिपूजन
Buldhana : पोलिसाची फिर्यादीला अमानुष मारहाण, आरोपीने बनविला व्हिडिओ
Buldhana - पोलिसांनी फिर्यादीलाच पोलिस स्टेशन मध्ये केली अमानुष मारहाण.
- मारहाण करतानाचा आरोपीने बनविला व्हिडिओ.
- मारहाणीचे व्हिडिओ आरोपीनेच केले समाज माध्यमात व्हायरल.
- बुलढाणा पोलिसांची अजब कारवाई.
Nashik : राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा नाशिक पोलिसांच्या ताब्यात
Nashik : भारत जोडो यात्रेवर निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलसानी चौकशीकरत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले असता तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती नाशिक पोलसानी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलसांची नजर कायम आहे.
Pune Breaking : ड्रग्स प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ
Pune Breaking : पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
शेळके अस अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच आडनाव आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत.
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा याला अटक केली होती.
या तपासात या ड्रग्स प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेचं नाव समोर आलंय.
अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडालीय.
पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे.