Maharashtra News Updates 3rd April 2023: मुंबई उच्च न्यायालयातील एक लिफ्ट अचानक बंद, लिफ्टमधील सातजणांची अग्निशमन दलाकडून सुटका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेस नेते राहुल गांधी वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत. तर ज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहे. आज संसदेच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस असणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,
सुरत न्यायालयाच्या निकालाविरोधात राहुल गांधी याचिका दाखल करणार
सुरत कोर्टाने राहुल गांधीच्या 2019 च्या वक्तव्यासंदर्भात दिलेल्या निकाला विरोधात राहुल गांधी आज याचिका दाखल करणार आहेत. सुरत न्यायालयाने 23 मार्चला राहुल गांधींना दोषी ठरवलं होतं. आज याचिका करताना राहुल गांधी उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधींना आयपीसी कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (एखाद्या व्यक्तीची मानहानी फौसदारी खटला) नुसार दोषी ठरवलं होतं. त्याच दिवशी राहुल गांधींना जामीन मिळाला होता आणि शिक्षेच्या अमलबजावणीसाठी 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णया विरोधात वरच्या कोर्टात जाता यावं यासाठी हा वेळ दिला जातो.
तहसिलदार आणि नायब तहसिलदार आजपासून संपावर
आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहे. राजपत्रित वर्ग – 2 नायब तहसिलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मूळे पदाच्या अस्तित्वाच्या न्याय मागणीसाठी रुपये 4300 वरुन 4800 रुपये करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतोय. राहुल गांधी आणि आदानी मुद्यावरून संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज होऊ शकले नाही. 13 मार्चापासून सुरू झालेला हा टप्प्याचं कामकाज 6 मार्च पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातून जनतेला काय मिळालं? (सकाळी 9.30 वाजता प्रशांत कदम लाईव्ह)
कोर्टातल्या महत्वाच्या सुनावणी
मंत्रालयातील प्रशासकीय अधिकार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील आजच्या सुनावणीत बच्चू यांच्यावर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडण्याची शक्याता आहे.
अभिनेता नवाझउद्दीन सिद्दिकी कौटुंबिक कलह प्रकरणी हायकोर्टात विशेष सुनावणी. नवाझउद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना आज हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश. नवाझ त्याची पत्नी झैनब, दोन्ही मुलं आणि भाऊ शमशुद्दीनला कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या न्यायदालनात दुपारा 4:30 वाजता सुनावणी.
पंतप्रधान मोदी आज CBI च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि CBI च्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांसाठी सुवर्णपदक प्राप्तकर्त्यांसाठी एक अन्वेषण समारंभ आयोजित केला जाईल. या समारंभात पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांना पदके प्रदान करतील. शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सीबीआयच्या हीरक महोत्सवी वर्षात ते टपाल तिकीट आणि स्मरणार्थी नाणे जारी करतील. ते सीबीआयचे ट्विटर हँडलही लॉन्च करणार आहेत. CBI ची स्थापना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या 1 एप्रिल 1963 च्या ठरावाद्वारे करण्यात आली.
Pune News : 'जवाब दो मोदीजी' म्हणत काँग्रेस लिहीणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र प्रदेश युवक काँग्रेसची मोहीम
'जवाब दो मोदीजी' म्हणत काँग्रेस लिहीणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
प्रदेश युवक काँग्रेस लिहीणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
राज्यभरातून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोदींना लिहीणार १ लाख पत्र
पुण्यातून होत आहे या मोहिमेची प्राथमिक सुरूवात
देशातील विविध प्रश्नांवर युवक काँग्रेस लिहीत आहे मोदींना पत्र
राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास साधणार संवाद
Thane News : ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यातील रिक्षा चालक झाले आक्रमक
Thane News : ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यातील रिक्षा चालक झाले आक्रमक
ठाण्यातील कामगार नाका या ठिकाणी शिवसेना पक्ष, रिक्षा चालक-मालक आणि संघटनेच्या वतीने अरविंद सावंत यांचा पुतळा जाळत निषेध करण्यात आला
अरविंद सावंत जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत असाच रोष रिक्षावाल्यांचा राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयातील एक लिफ्ट अचानक बंद, लिफ्टमधील सातजणांची अग्निशमन दलाकडून सुटका
Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयातील एक लिफ्ट अचानक बंद
तिस-या मजल्यावर अडकलेल्या लिफ्टमध्ये होते 7 प्रवासी
यात 6 पुरुष आणी एका महिलेचा समावेश
तातडीनं दाखल मुंबई अग्निशमन विभागानं राबविलं रेस्क्यू ऑपरेशन
लिफ्टमधील सर्व लोकं सुखरूप बाहेर, कोणालाही त्रास कींवा इजा नाही
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे. राहुल गांधी आज गुजरातच्या सूरत कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर
आतापर्यंत 33 साक्षीदार फितूर झाले आहेत
आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात साक्षीदाराने सांगितले की, एटीएसला दिलेल्या जबाबातील गोष्टी आठवत नाहीत