Maharashtra News Updates : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
11th January Headlines: राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून उमेदवार निश्चित केले जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत समन्वय दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्रितपणे सामोरे जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याशिवाय अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिझानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
मुंबई:
- मुंबईसह आसपासच्या परिसरातील उघडी मॅनहोल आणि रस्त्यावरचे खड्डे यांसदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. वारंवार निर्देश देऊनही पालिका प्रशासनाकडून याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
- जॉन्सन बेबी पावडरबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी. एफडीएनं बेबी पावडरच्या वितरणावर लावलेल्या बंदीबाबत हायकोर्ट देणार निर्देश. नव्या नियमावलीनुसार राज्य सरकार पुन्हा नव्यानं करणार का चाचणी?
- 30 जानेवारीला पार पडणाऱ्या विधान परिषद निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख 12 जानेवारी आहे. यासाठी केवळ 2 दिवस बाकी असतानाच अजुनही महाविकास आघाडीचे नागपूर शिक्षक मतदार संघाचा आणि अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार ठरलेला नाही. आज महाविकास आघाडीची याबाबत बैठक पार पडणार असून उमेदवाराची घोषणा होईल. मात्र, महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
- विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. विधान भवनात महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
पुणे:
- 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र केसरीच्या मुख्य स्पर्धेसाठी वजनी गटातील लढती ठरणार आहेत.
- येरवडा कारागृहातील कैद्यांकडून संक्रातीच्या निमित्ताने तयार केलेल्या वस्तू आणि पदार्थांचे विक्री केंद्र सुरु होणार आहे.
- 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस खेळांच्या उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
Beed News: राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार
Belgaum News : कर्नाटक काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन बेळगावातून प्रजा ध्वनी बस यात्रेला प्रारंभ
Belgaum News : बेळगावात 1924 साली काँग्रेसचे अधिवेशन झालेल्या वीरसौध येथून प्रजा ध्वनी यात्रेचा शुभारंभ केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार, विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते, लोक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. भ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजप सरकारचे रूप जनतेच्या समोर आणण्यासाठी आणि जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी प्रजा ध्वनी बस यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रजा ध्वनी बस यात्रा फिरणार असून राज्यातील जनतेशी काँग्रेस नेते संवाद साधून जनजागृती करणार आहेत अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणाही काँग्रेसने यावेळी केली. बेळगावहून प्रजा ध्वनी यात्रा चिकोडीला रवाना झाली.
यवतमाळ: कोळसा खाणीतून चोरी होणारा 21 लाखांचा कोळसा जप्त, सापळा रचून पोलिसांची कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या एसीबी इस्पात कोळसा खाणीतून कोळसा तस्करी करणारे आठ ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली. या वाहनातून 260 टन कोळसा जप्त करण्यात आला असून 20 लाख 80 हजार रुपये कोळशाची किंमत आहे.
विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर
विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुखांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुखांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण
विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर देशमुख हमीदारासह हजर
हायकोर्टानं जामीन मंजूर करताना आखून दिलेल्या अटीशर्तींचं देशमुख उल्लंघन करणार नाहीत, अशी हमी त्यांच्यावतीनं वकील इंद्रपाल सिंह यांनीच दिली
ही हमी मान्य करत न्यायाधीश रोकडे यांनी औपचारिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले