एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 6 October 2022 : कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक येथील घटना , घर मालकाने लावली बाहेरून कडी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 6 October 2022 : कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक येथील घटना , घर मालकाने लावली बाहेरून कडी

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी सहभागी होणार

आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर सोनिया गांधी अशाप्रकारे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. सध्या यात्रा कर्नाटकातील म्हैसुर या ठिकाणी पोहचली आहे. 7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. 

अजित पवार बारामती दौऱ्यावर 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी अजित पवार विविध विकास कामांची पाहणी करतील. तसेच ते आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता ते दौंड तालुक्यातील पारगाव येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. 

धुळ्यात बालाजी रथोत्सव 

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धुळे शहरात बालाजीचा रथोत्सव पार पडतो. या रथोत्सवाला 200 हून अधिक वर्षांची परंपरा असून, शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येते. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीनिमित्त दरवर्षी 11 दिवस भगवान बालाजीचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते. 

22:57 PM (IST)  •  06 Oct 2022

Belgaum News: सुळेभावी गावात दोन तरुणांची हत्या

बेळगाव  - सुळेभावी गावात रात्री नऊ वाजता दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.महेश उर्फ रामचंद्र मुरारी (२६) आणि प्रकाश निंगप्पा उपरी पाटील (२४) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत.पूर्व वैमनस्यातून या तरुणांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्येची माहिती कळताच मारीहाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी यांनीही घटनस्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना केल्या.दोन तरुणांच्या हत्येमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे.

22:55 PM (IST)  •  06 Oct 2022

कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक येथील घटना , घर मालकाने लावली बाहेरून कडी

कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक येथील घटना, घर मालकाने लावली बाहेरून कडी, कुत्रा आणि बिबट्या घरात जेरबंद, सुधीर कारंडे आसे त्या घरमालकाचे नाव, वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल, बिबट्याला पिंजरा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू, अख्खा गाव कारंडेंच्या घराजवळ

22:05 PM (IST)  •  06 Oct 2022

मुंबई उच्च न्यायालयाला  लाभणार सहा नवे न्यायमूर्ती, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी

मुंबई उच्च न्यायालयाला  लाभणार सहा नवे न्यायमूर्ती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी

संजय आनंदराव देशमुख, यंशिवराज गोपीचंद खोब्रागडे, महेंद्र वाधुमल चांदवानी, अभय सोपनराव वाघवसे, रवींद्र मधुसुदन जोशी आणि वृषाली विजय जोशी यांची हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी राष्ट्रपतींची मंजुरी

22:03 PM (IST)  •  06 Oct 2022

जव्हारमधील जुना राजवाडा येथे कुस्तीचे जंगी सामने

जव्हार मधील जुना राजवाडा येथे कुस्तीचे जंगी सामने पार पडले असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील 200 पेक्षा जास्त कुस्तीपट्टूनी सहभाग घेतला होता. जव्हार मधील जुना राजवाडा येथे संस्थान काळा पासून मातीतील कुस्ती स्पर्धांच आयोजन करण्यात येतं. मात्र मागील दोन वर्ष कोरोनाच सावट असल्याने ह्या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या . या वर्षी मोठ्या थाटात या कुस्ती स्पर्धा पार पडल्या असून परिसरातील नागरिकांनी ही ह्या स्पर्धा बघण्यासाठी मोठी गर्दी केली होई . या स्पर्धेत शत्रूघ्न भोईर आणि नारायण कारभारी हे अंतिम विजेते ठरले असून त्यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी आठ आठ हजार रुपयांची रोख रक्कम, शाल, श्रीफळ  म्हणून देण्यात आली .

21:20 PM (IST)  •  06 Oct 2022

पतंग उडवताना टेरेस वरून पडुन मुलाचा मृत्यू

बेळगाव - पतंग उडवताना घराच्या टेरेस वरून पडुन मुलाचा मृत्यू झाला.अरमान दफेदार (११) असे  मुलाचे नाव आहे.तिरंगा कॉलनी येथील अरमान हा आपल्या कुटुंबियांच्या समवेत नातेवाईकांच्या घरी अशोक नगर येथे आला होता.सकाळी तो पतंग उडवण्यासाठी सकाळी तो घराच्या टेरेस वर गेला होता पतंग उडवत असताना तो खाली पडला.त्याला लगेच उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले पण तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला .

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्यMahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावाDevendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
Embed widget