Maharashtra News Live Updates : बेळगावातील पाचव्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 06 Nov 2022 10:00 PM
धारावी जंक्शनसमोरील नाल्यात मृतदेह आढळला

धारावी जंक्शनसमोरील नाल्यात पुरुषाचा मृतदेह आढळला आहे.  शाहुनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप प्रयत्न करूनही नाल्यातून मृतदेह काढता आला नाही. कठीण परिस्थितीत सायन तलावाचे कार्यकर्ते विजय यादव आणि त्यांच्या धाडसी कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला.  पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर साहेब यांनी विजय यादव व त्यांच्या टीमचे त्यांच्या या धाडसाबद्दल अभिनंदन केले.

बेळगावात आयोजित करण्यात पाचव्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद





गोल्फ कोर्स येथून हाफ मॅरेथॉन स्पर्धला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. 21 किलोमीटर,दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन गटात धावपटूंनी भाग घेतला होता.स्पर्धेत पस्तीस टक्क्यांनी हून अधिक महिलांचा सहभाग होता.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे माहेश्वरी अंध शाळेचे पंचवीस विद्यार्थी देखील मॅरेथॉन मध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. साठ वर्षांच्या बंगलोरच्या जनार्दन यांनी एकवीस किलोमीटर अंतर धावून आपला उत्साह आणि तंदुरुस्तीचे दर्शन घडवले. पुरुष गटातील आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.


 

 



 


आदित्य ठाकरे यांचा अकोला दौरा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा उद्या  अकोला जिल्हा दौरा आहे. सकाळी 9 वाजता त्यांचं अकोला विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर शिवर, नेहरूपार्क चौक, अशोकवाटीका चौक, गांधीचौक, जयहिंद चौक अशा ठिकठिकाणी त्याचं स्वागत होईल. त्यानंतर अकोल्याचं ग्रामदैवत राजराजेश्वराचं ते दर्शन घेणारायेत. यानंतर त्यांची  बाळापूर येथे सभा होणारेय. सकाळी 11 वाजता बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर ही सभा होणारेय.  बाळापूर हा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा मतदारसंघ आहेय. नितीन देशमुखांनी ही स्पर्धेची नितीन देशमुखांनी जोरदार तयारी केलीये. उद्याच्या सभेत आदित्य ठाकरे आणि नितीन देशमुख काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

राजेश टोपेंच्या मुखड्यामुळं तीन लाख लोकांचा मृत्यू? भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कोरोना काळात राजेश टोपेंच्या मुखड्यामुळं महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा  आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय.. जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये सेवा समर्पण सप्ताह निमित्त धन्यवाद मोदीजी या अभियानाची माहिती देताना केलेल्या भाषणात लोणीकर यांनी हा आरोप केलाय  आघाडी सरकारनं ग्लोबल टेंडर नावाचा इंग्रजी शब्द आणला.. आणि सहा हजार कोटींची लस विकत घेतली.. तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे हा मुखडा रोज टीव्हीवर यायचा.. नुसता बोलाचा भात आण् बोलाचाच कडी.. त्यामुळं तीन लाख लोकांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आघाडी सरकारनं जनतेची फसवून केली.. आणि एकही लस विकत घेतली नाही.. त्यामुळं लबाड लांडगं ढोंग करतं लस आणण्याचं सोंग करतं असं म्हणत लोणीकर यांनी टीका केलीये..

Nagpur Crime : बँक कर्मचाऱ्यांनीच ठेवीदारांच्या नावाने काढलं बोगस कर्ज

नागपूरच्या संत जगनाडे क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये शाखाप्रमुख आणि बँक कर्मचाऱ्यांनीच ठेवीदारांच्या नावाने बोगस कर्ज काढल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बँकेचे शाखाप्रमुख विनोद फटिंग क्लर्क दुर्गा भवाळकर आणि दीपक तेलमासारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 2001 ते 2021 या काळात आरोपींनी बँकेतील 70 ठेवीदारांच्या कागदपत्राचा गैरवापर करत बोगस साक्षऱ्या करून तीन कोटी 36 लाखाच्या कर्ज उचलल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या  फसवणुकीची रक्कमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीडमध्ये आजपासून रंगणार तीन दिवसीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

बीडमध्ये 26 व्या तीन दिवसीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच  आयोजन करण्यात आल असून आज पासून दोन दिवस हे साहित्य संमेलन बीड मधल्या एसजी चर्चमध्ये रंगणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पोलस वाघमारे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला बीड शहरातील सेन्टेन्स शाळेपासून ते एस जी चर्च पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीमध्ये लहान मुलांचे बँड पथक तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले अनेक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता यावेळी पवित्र बायबल ग्रंथाची देखील मिरवणूक काढण्यात आली.

जळगाव : सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक

राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना नटी म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांचा 'नटी' असा उल्लेख करत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून मंत्र्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे निषेधार्य बाब आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे जळगावात मोर्चा काढण्यात आला. 

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates : रुतुजा लटके 53,471 मतांनी विजयी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri Bypolls Results 2022) रुतुजा लटके 53,471 मतांनी विजयी झाल्या आहेत.


अधिक अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.


 

कामगार नोंदणी केवळ 1 रुपयात, नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार; शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय

Labor Department News : राज्यातील कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी दिली आहे. यासाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात यामध्ये कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कामगार विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत केली. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Kolhapur News : सांगोला अपघातातील गंभीर जखमी वारकरी महिलेचा मृत्यू; दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या 8 वर

Kolhapur News : जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जात असताना दिंडीमध्ये भरधाव कार घुसून गंभीर जखमी झालेल्या सरिता अरुण शियेकर (वय 45, रा. जठारवाडी, ता करवीर) यांचा पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. पंढरपूरहून त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आज जठारवाडीत आणण्यात आला. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबिर नुकतेच शिर्डी येथे पार पडले. या शिबिर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मिशन 100 चा नारा दिला आहे. त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केलीये.मला वाटतं त्यांची बेरीज कुठंतरी चुकली असली पाहिजे.प्रत्येक पक्षाने आपलं मिशन सांगितल आहे. परंतु मागच्या तीन चार निवडणुकांमध्ये त्यांचं मिशन चाळीस पर्यंत थांबले आहे..ते चाळीस कमी होऊ नये एवढी काळजी त्यांनी घेण्याची गरज असल्याचा टोला विखे यांनी लगावलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघाचे 61 वे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक अधिवेशन अहमदनगरच्या सहकार सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमानंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलत होते.
Kolhapur Breaking : आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते दीपक पाटील यांना मारहाण

आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते दीपक पाटील यांना मारहाण


दत्त कारखान्याच्या गणपतराव पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप


ऊस दर आंदोलनात कारखाना समर्थक दादागिरी करून दडपशाही 


2950 रुपये दर जाहीर झाला असून हा दर परवडणारा नाही 


त्यामुळे आम्ही वाहने रोखून आंदोलन सुरु आहे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे आज पुन्हा एकत्र येणार, राज्यात युतीची चाहूल?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackray) यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. कधी एकमेकांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कातील दीपोत्सव, तर कधी एखाद्या एका उद्योजकाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी अशा मिळून त्यांच्या तीन भेटी झाल्या होत्या. त्यापाठोपाठ आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली ती महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. 




सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Jejuri : जेजुरीचा खंडेरायाचे मंदिरात मोठी गर्दी




सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे.  याला जेजुरीचा खंडेरायाचे मंदिर देखील अपवाद नाहीये. मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. रांगेत दर्शन घेण्यासाठी भाविकांना तीन तास रांगेत उभा राहावे लागत आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणता 60 ते 70 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे. तसेच मागच्या रविवारपासून काल रात्रीपर्यंत 5 ते 6 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे.

 



 


Solapur Protest for Airport : नागरी विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी उपोषण
सोलापुरातल्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोलापूर विकास मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर या उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. उडान योजनेअंतर्गत सोलापूर विमानतळाचे नाव देखील समाविष्ट होते. मात्र विमानतळाच्या परिसरात असलेल्या एका चिमणीमुळे सोलापुरात नागरी विमान सेवा सुरू होऊ शकत नाही, असा अहवाल डीजीसीएने दिला आहे. त्यामुळे सोलापुरात अद्यापही नागरी विमान वाहतूक सेवा सुरू होऊ शकलेले नाही. सोलापूर विमानतळाच्या आसपास असलेले अडथळे दूर करून तात्काळ विमानसेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
Everest : आठ वर्षाच्या ठाण्याच्या गृहीताने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प
ठाण्याच्या सरस्वती विद्यालयात तिसरी इयत्तेत शिकत असलेल्या गृहीता विचारे या आठ वर्षाच्या मुलीने माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत सर्वात उंच ट्रेक यशस्वी रितीने पूर्ण केला आहे. आतापर्यंत दहा वर्षाच्या मुलीने हा बेस कॅम्प ट्रेकयशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा विक्रम केला होता, आता तिच्यापेक्षा दोन वर्ष लहान गृहीताने ही कामगिरी केली आहे.
Twitter Blue Tick : भारतात 'या' दिवशी सुरु होणार पेड सर्व्हिस, एलॉन मस्क यांनी स्पष्टच सांगितलं

Twitter Blue Tick Paid in India : ट्विटरची ( Twitter ) मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडे आल्यावर त्यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठी ( Twitter Blue Tick ) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंटना ( Verifued User Account ) मिळणाऱ्या ब्लू टिकसाठी युजर्सला पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी दरमहा आठ डॉलर्स शुल्क आकारलं जाणार असल्याचं माहिती मस्क यांनी दिली होती. त्यामुळे आता ट्विटरवर सबस्क्रिप्शन मॉडेल ( Twitter Subscripton ) राबवण्यात येणार आहे. भारतातही लवकरच ट्विटरची पेड सर्व्हिस सुरु होणार आहे. भारतात ब्लू टिकची पेड सर्व्हिस कधीपासून सुरु होणार याबाबत मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


ट्विटरवर एक वेरिफाइड भारतीय यूजर @Cricprabhu याने एलॉन मस्क यांना प्रश्न विचारत पोस्ट केलं की, 'भारतात ट्विटर अकाऊंटवर ब्लू टिकसाठी पेड सर्व्हिस कधी सुरू होईल?' यावर मस्क यांनी यावर उत्तर देत म्हटलं आहे की, 'एका महिन्याच्या आत'. भारतात या महिन्याच्या शेवटपर्यंत ट्विटरची पेड सर्व्हिस सुरु होण्याची शक्यता आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Police Bharti : परभणी पोलीस दलातील 75 जागांसाठी भरती

मागील अनेक वर्षांपासून रखडलेली पोलीस दलातील शिपाई भरती आता मार्गी लागली आहे. परभणी जिल्ह्यातील 75 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून सर्व उमेदवारांना 9 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पोलीस दलाच्या Policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा शारीरिक क्षमता चाचणी आणि नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या  जाहिरातीमध्ये याबाबत सर्व नियम अटी देण्यात आले आहेत त्यामुळे एकदाची भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे.

Dhule Onion : उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मोठी मागणी

धुळे जिल्ह्यात बाजारात कांद्याची आवक वाढली असून उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्रातील उत्पादित कांद्याला अधिक मागणी असल्याने गेल्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात क्विंटल मागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Buldhana Swabimani Protest : आजचा मोर्चा हा सरकारला हादरवणारा असणार रविकांत तुपकर यांचा एल्गार

बुलढाणा : आज बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केला आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात हा मोर्चा आहे यावर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाली असून दिवाळी संपली तरीही सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला वाजवी दर नाही उत्पादन खर्च पेक्षाही कमी भाव कापूस आणि सोयाबीनला मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्यावर वर्षानुवर्षे कर्जबाजारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानीने मोठा मोर्चा काढला आहे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी एक दिवस अन्नदात्यासाठी असा आवाहन बुद्धीजीवी वर्गालाही केला आहे त्यामुळे अनेक बुद्धीजीवी आणि नाट्य कलाकार या मोर्चाला व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात हजारोंच्या संख्येने दाखल झालेले आहेत.

Coronavirus : कोरोना संसर्गात किंचित वाढ, देशात 1132 नवीन कोरोनाबाधित, 14 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात आज किंचित वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1132 नवीन रुग्ण आढळले असून 14 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्ते सातत्याने घट पाहायला मिळत होती. पण आज मात्र कोरोना रुग्णसंख्या 50 ने वाढली आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.


 

Beed Crime : गर्भपात करण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तरुणाविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

बीडमध्ये मेकअप आर्टिस्ट असलेल्या एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका तरुणाविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा मोराळे असं या तरुणाचं नाव असून त्याने मेकअप आर्टिस्ट असलेल्या बीडमधील एका महिलेशी जवळीक साधली तिच्यावर वारंवार अत्याचार करून बंदुकीचा धाक दाखवून तिला गर्भपात करण्याच्या धमक्या दिल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून कृष्णा मोराळे या तरुणाच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसोबत गुवाहाटीला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला


सर्व आमदारांसोबत पुन्हा गुवाहाटी येथे जाणार 


दौऱ्याची तारीख निश्चित नसली तरी पुढचा आठवड्यात दौरा होण्याची शक्यता 


या दौऱ्याची तयारी करण्यासाठी काही पदाधिकारी देखील गुवाहातीला रवाना 


या दौऱ्यात एकनाथ शिंदे तिथले मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर, अश्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार, ज्यांनी सत्तंतराच्या काळात शिंदे यांना केली होती मदत 


या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजेचे नियोजन देखील करण्यात आल्याची माहिती






 

Dhoni in Court : महेंद्र सिंग धोनीची मद्रास उच्च न्यायालयात धाव, आयपीएस अधिकाऱ्यावर खटला दाखल

क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीची मद्रास उच्च न्यायालयात धाव... आयपीएस अधिकाऱ्यावर खटला दाखल...





BKC Car Fire : चालत्या गाडीनं अचानक घेतला पेट

मुंबईतील बीकेसी येथे चालत्या गाडीनं अचानक पेट घेतला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.





Happy Street : कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा वर्धापन दिन, 'हॅप्पी स्ट्रीट' कार्यक्रमाचं आयोजन

कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त मामाच्या गावाचे "हॅपी स्ट्रीट" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाच्या धमाल, मौज-मस्ती, स्वादिष्ट व्यंजन आणि बालपणीच्या आठवणी जागृत करणे आणि नवीन पिडीला त्याची माहिती देणे, हा या 'हॅप्पी स्ट्रीट' आयोजनाच्या मागचा उद्देश होता. या महोत्सवात झाडावर बांधलेले झोक्यापासून टिक्कर बिल्ला, रगोळी, रिंग,साफसिडी, टायर राईड, उंट राईड अशा वेगवेगळ्या खेळापासून तर पारंपारिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होती. यात नागपूरकरांनी धमाल मस्ती करत मामाच्या गावच्या असलेल्या आठवनींना उजळणी दिली. 

Beed Jalyukt Shiwar : बीडच्या जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा करणारे 138 कंत्राटदार काळ्या यादीत

राज्यभर गाजलेल्या बीडच्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील 138 ठेकेदारांना काळ्या यादीतच ठेवण्याचे निर्देश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर कृषी आयुक्तालयामार्फत जलयुक्तच्या कामाची चौकशी सुरू झाली होती. या चौकशीत अनेक कंत्राटदारांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच समोर आलं त्यामुळे या कंत्राटदाराना दिलासा न देता 138 कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

BKC Fire : बीकेसी येथे चालत्या गाडीने घेतला पेट

बीकेसी येथे चालत्या गाडीने पेट घेतला. या गाडीत चालक आणि प्रवासी होते, सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. ही गाडी एअरपोर्टच्या दिशेना जात होती, स्फोट झालेल्या गाडीचे मॉडेल ह्युंदाई एसेंट होते.

Nandurbar : वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ...
नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या वातावरण बदलाचा फटका सर्वसामान्यांचे आरोग्यावर होताना दिसतोय रात्री तापमानाचा पारा खाली जातो तर दिवसा कडाक्याचे ऊन असल्याने या वातावरण बदलाचा फटका लहान मुलांनी वयस्कर नागरिकांना बसत असून जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली जात असल्याचे चित्र आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा आसल्याने शहरी आणि ग्रामीण भागात सर्दी खोकला या संसर्गजन्य रोगांचे रुग्णसंख्येत वाढ झाली असून नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
Nandurbar : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या शक्यता वाढल्या
नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस तोडणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनातून होणारी धोकादायक वाहतूक अपघातांना कारणीभूत ठरणार असे चित्र दिसून येत आहे. नंदुरबार शहादा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली असून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टर मधून उसाच्या मोड्या रस्त्यावर पडतात. तसेच रात्रीच्या वेळेस रिफ्लेक्टर नसल्याने अनेक वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता असून परिवहन विभाग आणि साखर कारखानदार यांनी ऊस वाहतूकदारांसंदर्भात सुरक्षिततेचे उपाययोजना करावेत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
Ahmednagar Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला पाठींबा दर्शविण्यासाठी अहमदनगरमध्ये रॅली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेचे स्वागत आणि त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी अहमदनगर येथे नागरिकांच्या वतीने सकाळी नऊ वाजता स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. 

गुरांचे बाजार बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयाची उलाढाल थांबली
लम्पी आजाराचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका नंदुरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींना बसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा अक्कलकुवा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरत असतात त्यातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते. मात्र लम्पीच्या प्रादुर्भावानंतर बाजार समितीमधील जनावरांचे बाजार बंद असल्याने रब्बी हंगामासाठी बैल खरेदी करणाऱ्या तसेच ऊस तोडणीसाठी बैल जोडी खरेदी करणाऱ्या ऊस तोड कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून बैल बाजार कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आता सर्वांना लागून आहे.
T20 World Cup 2022 : नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर 13 धावांनी विजय, टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक

टी-20 विश्वचषक स्पर्धेत ( ICC T20 World Cup 2022 ) मोठा उलटफेर झाला आहे. नेदरलँड्सच्या ( Netherlands ) संघाने दक्षिण आफ्रिकेवर ( South Africa ) दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. नेदरलँडच्या विजयानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ( T20 World Cup 2022 ) समीकरणं बदलली आहेत. इतकंच नाही तर नेदरलँडच्या टीमने पुढील विश्चचषकात आपला प्रवेश निश्चित केला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

T20 World Cup 2022 : नेदरलँडचा आफ्रिकेवर 13 धावांनी दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर... नेदरलँडचा आफ्रिकेवर 13 धावांनी दणदणीत विजय... सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला संधी मिळण्याची शक्यता...





Nana Patole : एकनाथ शिंदे हे गुजरातचे मुख्यमंत्री - नाना पटोले

भाजपचे महाराष्ट्रतील आणि देशातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे याला वेगळे प्रमाणपत्र देण्याचे गरज नाही. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून गुजरातचे मुख्यमंत्री आहे. म्हणून राज्यातील प्रकल्प हे गुजरातला पाठवले जात आहे. शेतकरी, युवक, बेरोजगार, या सर्वांसाठी हे सरकार संकट आहे. शेतकऱ्यांनि आत्महत्या करू नये काँग्रेस नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने होति आणि राहणार आहे. 

सांगली : युवा सेनेकडून विधानसभानिहाय मुलाखती संपन्न

युवासेनप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनंतर राज्यात पुन्हा एकदा युवा सेनेची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात युवासेनेच्या विधानसभानिहाय मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. पलूस मध्ये पार पडलेल्या या मुलाखतीसाठी जिल्ह्यातील तरुण-तरूणीनी मोठी गर्दी केली होती. या मुलाखतीतुन युवासेनेची  तालुका आणि जिल्हास्तरावरील पदांचं वाटप करण्यात येणार आहेत. या मुलाखतीत सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव, खानापूर-आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस या विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी हजेरी लावली. 

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळासाठी काम, ब्लास्टिंगमुळे 100 घरांना तडे

नवी मुंबईमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना वेग आला आहे. सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर बोअर ब्लास्टिंग केलं जात आहे. यामुळे भूकंपासारखे हादरे बसत असून वहाळ गावातील सुमारे 100 घरांना तडे गेले आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असूनबोअर ब्लास्टिंग बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

Bypoll Election Result 2022 : 6 राज्यांतील 7 विधानसभांच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल 

Bypoll Election Result : आज सहा राज्यांतील विधानसभेच्या सात रिक्त जागांचा निकाल लागणार आहे. सहा राज्यांतील विधानसभेच्या रिक्त जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि इतर अनेक राजकीय पक्षांचं लक्ष या निकालावर आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व (Andheri East), उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ (Gola Gokaran Nath), हरियाणातील आदमपूर (Adampur), बिहारमधील मोकाम (Mokama) आणि गोपाळगंज (Gopalganj), तेलंगाणातील मुनुगोडे (Munugode) आणि ओदिशातील धामनगर (Dhamnagar) मधील या पोटनिवडणुकीच्या निकालाचा समावेश आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.


 

उल्हासनगर : गुरुनानक जयंतीनिमित्त प्रभात फेरी

उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. थायरासिंह दरबारचे धर्मगुरू त्रैलोचनसिंह यांचा सहभाग पाहायला मिळाला. शीख समुदायाचे लाखो भाविक या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले. पहाटे 6 वाजता थायरासिंह दरबार पवई चौकातून प्रभात फेरी निघाली. उल्हासनगर शहरातील प्रमुख मार्गावरून ही फेरी निघाली. 8 नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्प वर्षा करण्यात येणार आहे. या प्रभात फेरीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

Mumbai Accident : किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात

Mumbai Accident : मुंबईच्या (Mumbai) सायन किंग्ज सर्कलच्या पुलाला धडकून आज सकाळी एका ट्रकचा मोठा अपघात (Truck Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 






सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल

Andheri Bypoll Result 2022 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' या मतदार संघाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेचा भाग असणाऱ्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज असून आज 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यानुसार व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

Mumbai Traffic : किंग्ज सर्कल रेल्वे पुलाजवळ वाहतूक मंदावली

किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली आहे.





पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल असणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं.  भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जागर मुंबईचा अंतर्गत पहिली जाहीर सभा वांद्र्यात होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल
ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे.  सकाळी 8 वाजता टपाल मतमोजणीला सुरुवात होईल. 


सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.  
 
मातोश्रीच्या अंगणापासून भाजपचं मिशन मुंबई, आजपासून जागर मुंबईचा
भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जागर मुंबईचा अंतर्गत पहिली जाहीर सभा वांद्र्यात होणार आहे. आशिष शेलार, पूनम महाजन सभेला संबोधित करतील. वांद्रे पूर्व येथे संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. 
 
बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन, कापूस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या मोर्चात जवळपास 30 हजार शेतकरी राज्यभरातून सामील होणार आहेत.  
 
मुख्यमंत्री ठाण्यातील काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार


मुख्यमंत्री ठाण्यातील काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. ठाण्यातील पहिल्या 5 स्टार हॉटेलचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते केले जाणार. तर मुख्यमंत्री यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट, टोल नाका परिसरात देखील कोकण महोत्सव आणि मेळाव्यांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार.  
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.