मुंबई : निवडणूक झाली, निकाला लागला आता तरुणांना आपल्या कामाचं बघायला हवं. उमेदवार आमदार झाले, त्यांचे निकटवर्तीय आता ठेकेदार होतील पण कार्यकर्ता म्हणून आपल्याला आपल्या नोकरी अन् उद्योगधंद्यासाठी स्वत:लाच धावपळ करावी लागेल. त्यामुळे, नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा सरकारी नोकरीचा (Job) शोध घेत असलेल्या युवकांन आठवण करुन देण्यासाठी पुन्हा एकदा ही बातमी महत्त्वाची आहे. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागात तब्बल 219 पदांचा जाहिरात निघाली असून अर्ज करण्यासाठी केवळ 15  दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे, तुम्ही जर पदवीधर असाल तर आजच जाहिरात वाचून सरकारी नोकरीसाठी अर्ज करा. कदाचित तुम्ही अभ्यास केलेला असेल तर परीक्षा देऊन तुम्ही सरकारी नोकरीची मानकरी होऊ शकाल.  


राज्य शासनाच्या समाज कल्याण विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार 'गृहपाल', वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक‘ पदाच्या ‘219’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 10 डिसेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी समाज कल्याण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. दरम्यान, उमेदवारांसाठी लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे.  


राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने 219 जागांसाठी जाहिरात काढली होती. त्यामध्ये, वरिष्ठ समाकल्याण निरीक्षक 5 पदे, समाजकल्याण निरीक्षक 39 पदे, गृहपाल 92 पदे, गृहपाल अधिक्षक 61 पदे, उच्चश्रेणी लघुलेखक 10 पदे, निम्नश्रेणी लघुलेखक 3 पदे, लघुटंकलेखक 9 पदे अशी एकूण 219 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


राज्य सरकारच्या www.cdn.digialm.com या अधिकृत वेबसाईटवरुन उमेदवारांना जाहिरीतसंदर्भातील संपूर्ण माहिती व अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेता येईल. 


गृहपाल, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक.


पदांची संख्या - 219 


शैक्षणिक अहर्ता - पदवीधर


निवडप्रक्रिया - परीक्षा


अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन


उमेदवारांचे किमान वय - 18 वर्षे, कमाल वयोमर्यादा 38 आहे. मात्र, उमेदवारांना आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट लागू करण्यात आली आहे. 


या जाहिरातीसाठी खुला प्रवर्ग - 1000 रुपये फी
मागास प्रवर्ग - 900 रुपये फी


उमेदवारांना अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10 डिसेंबर 2024 ही आहे. 


हेही वाचा


महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं