सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
पुणे, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि जागेची कमतरता पाहता उंचच उंच इमारतींचे इमले चढताना दिसून येतात. त्यामुळे, अगदी 100 मजली उंच इमारतही आता मुंबईत उभारत आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, ठाणे, पुणे येथील उंच इमारतींमध्ये राहताना प्रामुख्याने अनेकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीची घटना किंवा तत्सम दुर्घटना घडल्यास सुरक्षेचा उपाय काय, असा प्रश्न निर्माण होतो.
कल्याणमधील व्हरटेक्स हाउसिंग सोसायटी इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग लागली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सोसायटीच्या 13 व्या मजल्यावर ही आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने घरातील संसाराची राखरांगोळ झाली आहे
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र, उंच फ्लॅटवरील आग असल्याने अडथळा निर्माण होत आहे.
या आगीच्या घटनेमुळे सोसायटीबाहेर वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. सोसायटीबाहेर नागरिकांनी बघ्याची गर्दी केली होती, तर वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आहेत, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही