Maharashtra News Live Updates : प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज समारोपीय कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याबरोबरच नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होणार आहे. BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये होत आहे. शिवाय अमेरीकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.
नांदेड येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा
नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होणार आहे. BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळून दौऱ्यावर आहेत. सकाळी अकरा वाजता ते लोककला महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार नगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी साडे नऊ वाजता पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे प्रादेशिक पाणी योजनेचे भूमिपुजन ते करणार आहेत. विशेष म्हणजे याच कामाचे शनिवारी भाजप खासदार सुजय विखे यांनी भूमिपूजन केले आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती.
सासवडमध्ये सत्यशोधक परिषद
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक परिषदेचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, बाबा आढाव, हरी नरके उपस्थित राहणार आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ सकाळी 10 वाजता आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील. तर प्रमुख अतिथी राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार असतील. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी शिक्षण उपमहासंचालक नरेंद्रसिंह राठौर हे मुख्य दीक्षांत भाषण करतील.
साहित्य संमेलनातील ठरावातून बोलीभाषेसह मराठी शाळांच्या अनुदानाला दिले प्राधान्य
वर्ध्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज सायंकाळी सूप वाजले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनात दहा ठराव घेण्यात आलेय. यातील बोलीभाषेच्या विकासासाठी ' बोलीभाषा विकास अकादमी' स्थापन करावी असा ठराव घेण्यात आलाय. तर बृहन महाराष्ट्र तिल मराठी माध्यमांच्या अनेक शाळा आणि हैद्राबाद मधील मराठी साहित्य परिषदेतर्फे चालविण्यात येणारे मराठी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. या शिक्षण संस्थांना अनुदान देउन सहकार्य करावे, गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचा प्रवाह प्रकल्पासाठी वळवू नये. नदी वाळविल्यास तीव्र पाणी टंचाईची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याचा ठराव देखील यात घेण्यात आला आहेय. पुस्तकाच्या किमती नितंत्रित ठेवण्यासाठी प्रकाशकांना छपाई व कागद खर्चात सबसिडी द्यावी याशिवाय जीएसटी मधूनही वगळण्यात यावे असा ठराव घेण्यात आला आहेय.
चिपळूण मध्ये वाशिष्टी दूध डेअरीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन..
वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार सात फेब्रुवारी रोजी होणार आहे.स
कोळी बांधवांकडून केला जाणार सत्कार
वरळी कोळीवाडा येथील क्लीव्हलँड बंदर भागात मच्छीमार बांधवांच्या बोटांना ये-जा करण्यासाठी १२० मीटरचा नेव्हिगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर नागरी सत्कार
वरळीत शिंदे आणि भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार