एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 30 September 2022 :  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 30 September 2022 :   मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Todays Headline 30th September :
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर उपस्थित रहाणार आहेत.

गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार

चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतीत स्फोटके भरण्याचे काम मध्यरात्री सुरु होणार आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करणार आहेत

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज  दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज  दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार आहे. आज काँग्रेसच्या ध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.  17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे.

  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहे. 'मी वसंतराव देशपांडे' या सिनेमासाठी राहुल देशपांडेला सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आगे. तर 'अवांछित' आणि 'गोदाकाठ' साठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. जून सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. अजय देवगणला तान्हाजी सिनेमासाठी  पुरस्कार जाहीर झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
 
 पंतप्रधान मोदी अहमदाबाद दौऱ्यावर

 पंतप्रधान मोदी गांधीनगर- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे.  

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

22:52 PM (IST)  •  30 Sep 2022

 Fire News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग

 Fire News : वलसाड जिल्ह्यातील पारडी येथील मोतीवाडा गावाजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल  झाल्या आहेत. कंटेनरला आग लागल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.

21:50 PM (IST)  •  30 Sep 2022

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी यांचं आज उपचार सुरू असताना मुंबईत दुःखद निधन झाले. दैनिक लोकमत, देशदूत, नवशक्ती, लोकनामा यासह विविध दैनिकात त्यांनी वृतसंपादक, संपादक अशा अत्यंत महत्वाच्या भूमिका पार पाडत मराठी पत्रकारिता क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविला होता. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार कायमचा पडद्याआड गेला आहे. तसेच मराठी पत्रकारिता क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. 

19:04 PM (IST)  •  30 Sep 2022

Mumbai Local Update :  ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणकडे जाणारी वाहतूक ठप्प

Mumbai Local Train Update :  ठाणे रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल  मुलुंड स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत

18:53 PM (IST)  •  30 Sep 2022

Aditya Thackeray : पावसामुळे अन् वाहतूक कोंडीमुळे देवीच्या मंडळांच्या भेटीचा कार्यक्रम रद्द

Aditya Thackeray :  आदित्य ठाकरे यांनी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीच दर्शन घेतलं. यावेळी आदित्य यांच्या हस्ते देवीची आरती देखील झाली. दरम्यान आदित्य ठाकरे येरवडा तसेच कोथरूड मधील काही नवरात्रौत्सव मंडळांना भेटी देणार होते. मात्र पुण्यात झालेला पाऊस, सर्वत्र झालेली वाहतूक कोंडी यामुळे आदित्य ठाकरे यांना इतर मंडळांच्या भेटीचा कार्यक्रम रद्द करावा लागला, अशी माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनं दिली आहे.

18:52 PM (IST)  •  30 Sep 2022

एकनाथ शिंदे यांच्यानंतर आदित्य ठाकरे देखील पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले

Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले होते. पुण्यातील वाकडेवाडी परिसरातून आदित्य ठाकरे यांचा ताफा तब्बल वीस ते तीस मिनिटे अडकून पडला होता. मुंबई पाठोपाठ आता पुणे देखील थोड्या वेळाच्या पावसात जलमय होतोय हे चित्र उभे राहत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.