(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Live Updates : अभिनेते शरद पोंक्षेंनी शरद पवार यांची भेट घेतली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली येथे दुपारी शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सभा सुरु होईल. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत. याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
बाळासाहेबांची शिवसेना गुवाहाटीत
आज सकाळी 26/11 च्या वीरांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीसाठी रवाना होतील. सकाळी 8 वाजता सगळे आमदार, खासदार विमानतळावर दाखल होतील. सकाळी 10.30 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानानं मुख्यमंत्री आमदार, खासदार, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी मुंबईहून उड्डाण करतील. 4 वाजता सगळे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाईल. संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. संविधान सभेने 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानिमित्त हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचा प्रारंभ करतील. हा प्रकल्प न्यायालयांच्या आयसीटी अर्थात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरणाद्वारे याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.
26/11 घटनेला 14 वर्षे पूर्ण, विविध कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई- पोलीस आयुक्त कार्यालयात 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी "अभिवादन संचलन कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थिती राहून आदरांजली वाहणार आहेत, सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
इस्रो आज 8 नॅनो उपग्रह आणि ओशनसॅट-3 प्रक्षेपित करणार
श्रीहरीकोटा- आज इस्रोचं थर्ड जनरेशन ओशनसॅट 3 सह 8 नॅनो सॅटलाईट लॉन्च होणार आहेत. हे सॅटेलाईट सकाळी 11.46 वाजता लॉन्च केले जातील.
शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबईत शिवसेनेकडून आयोजित रोजगार मेळाव्याला आदित्य ठाकरे, सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत. बोरिवली येथे सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
संविधान दिवस निमित्त विविध कार्यक्रम
मुंबई- काँग्रेसतर्फे संविधान दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
पुणे- संविधान दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संविधान दौड आयोजित करण्यात आलीय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होणार आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौंळकर यांच्यावर हल्लाप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वाशिम शहर महिला प्रमुख रंजना पौंळकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक...
अभिनेते शरद पोंक्षेंनी शरद पवार यांची भेट घेतली
अभिनेते शरद पोंक्षे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही भेट असून नाट्य परिषदेत सुरु असलेल्या वादाबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पोंक्षे यांच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या प्रमूख कार्यवाह पदावरून हकालपट्टी प्रश्ननी वाद सुरु असताना पोंक्षे यांनी ही भेट घेतली आहे. यावेळी निर्माता प्रसाद कांबळी उपस्थित होते.
सोलापूर विमानतळ संदर्भात सुरु असलेल्या आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची, काडादी यांनी चक्क खिशातून रिव्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवलं
सोलापूर विमानतळ संदर्भात सुरु असलेल्या आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची
धक्कादायक बाब म्हणजे संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवलं
उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी
धर्मराज काडादी आणि केतन शाह यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संध्याकाळी 6 च्या सुमारासची घटना
गुन्हा दाखल करायचा कि नाही या संदर्भात विचार सुरु - केतन शाह यांची माझाला माहिती
तर धर्मराज काडादी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
जिंतुरच्या शेवडी येथे मधमाशांचा शेतकऱ्यांवर हल्ला, 10 जण जखमी
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील शेवडी येथे शेतकरी व शेतमजूर सोयाबीन काढत असताना अचानक मधमाश्यानी हल्ला केल्याने 10 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पहिल्यांदा जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील दरम्यान तिघांची तब्यत गंभीर असल्याने त्यांना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिंतुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षित ठेवलेलं सोयाबीन काढणी शेतकरी सध्या करतोय.शेवडी येथील शेतकरी सोयाबीन मळणी यंत्रातून काढत असताना शेवडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन मळणी यंत्रातून सोयाबीनचा भुस्सा उडून बाजूला लिंबाच्या झाडांवर असलेल्या अग्या मोहळावर गेला आणि असंख्य मधमाश्यांनी काम करत असलेले शेतकरी, शेतमजूरांवर हल्ला केला या हल्ल्याने सर्वजण गोंधळून गेले होते शेवटी काही जणांनी जाळ लावून धुर निर्माण केला यामुळे मधमाश्यांनी पळ काढला मात्र या हल्ल्यात भानुदास सानप,गणेश मुंडे, उर्मिला सानप,बालाजी सानप,शोभा मुंडे, पंढरी घुगे,शंकर खाडे,रंजना नागरे, नारायण सानप,बाळू घुगे, यांना ग्रामस्थांनी तातडीने खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉ.अनिफ खान यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केले मात्र भानुदास सानप,गणेश मुंडे,उर्मिला सानप यांना उलट्या होत असल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ परभणीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे..
Uddhav Thackeray : गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : दसऱ्याला ठरवलेलं मुंबईबाहेर पहिली सभा बुलढाण्यात घेणार. गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.