Maharashtra News Updates 24 November 2022 : सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे बालक दगावले, मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 252 वर 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Nov 2022 11:58 PM
सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे बालक दगावले, मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 252 वर 



सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे बालक दगावले, मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या २५२ वर


















 

*मुंबईतील गोवर आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २५२ वर, गोवंडी भागात राहणाऱ्या 8 महिन्याच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू*

 

मुंबईतील एकूण गोवर आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या ३६९५ वर 

 

नव्याने ३४ रुग्ण उपचारासाठी दाखल 

 

*आतापर्यत मुंबईत गोवरमुळे एकूण १० तर मुंबई बाहेरील ३ बालकांचा मृत्यू यातील 2 मृत्यू गोवर संशयित आहे*

 

एकूण मुंबईतील घरांची सर्वेक्षण -4603388

 

९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण ताबडतोब करुन घेण्याचे महापालिकेचे आवाहन, पालिकेकडून सर्व वाॅर्डमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन

 













वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत साडेचार हजार पदांची भरती

सामान्य प्रशासन विभागाच्या 21.11.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेली गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यास या विभागाचा शासन निर्णय दि. २४.११.२०२२ अन्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे.


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील 75 हजार रिक्त पदे भरण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणतः 4500 पदे भरण्यात येणार आहेत. 

जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे रद्द झालेल्या गाड्या पूर्ववत

प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेने जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे यापूर्वी रद्द केलेल्या खालील गाड्या पूर्ववत केल्या आहेत.  


१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस JCO ५.१२.२०२२
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस JCO 6.12.2022
12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO 4.12.2022
१२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस JCO ५.१२.२०२२


याशिवाय विशेष गाडी क्र. 01266 नागपूरहून 5.12.2022 रोजी 15.50 वाजता सुटेल आणि 6.12.2022 रोजी 10.55 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल (सेवाग्राम गाडीच्या ठिकाणी)


कुठे कुठे थांबणार? : अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळकापूर, जळकापूर, जळगाव, मुर्तिजापूर. चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर)
प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती

Bhiwandi News: भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला

भिवंडी : भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला, हल्ल्यात भाजप नगरसेवक नित्यानंद नाडार जखमी


डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा


वीस ते पंचवीस जणांच्या  टोळक्याने कार वर केला हल्ला


ऑफिस मधून बाहेर पडत असताना चढवला हल्ला


लाकडी दंडा व दगडाने गाड्यांची तोडफोड

भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला

भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला


हल्ल्यात भाजप नगरसेवक नित्यानंद नाडार जखमी


डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा


वीस ते पंचवीस जणांच्या  टोळक्याने कार वर केला हल्ला


ऑफिस मधून बाहेर पडत असताना चढवला हल्ला


लाकडी दंडा व दगडाने गाड्यांची तोडफोड

कर्मचारी उपलब्ध करा, मतदार यादी अद्ययावत करा, राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत पालिकेला सूचना 

मुंबई महापालिका अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे झालेल्या बैठकीनंतर पालिका निवडणुकीच्या हालचाली वाढल्या. 


 कर्मचारी उपलब्ध करा, मतदार यादी अद्ययावत करा, राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत पालिकेला सूचना 


 ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना अशा विविध कारणांमुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या 


 मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीपर्यंत जाहीर होतील, याबाबत ठोस निर्णय नाही... मात्र, निवडणुकीच्या कामांना सुरुवात 


 15 दिवसानंतर पुन्हा होणार निवडणूक आयोग -पालिकेची बैठक

सायंकाळी सांगली, मिरज परिसरात पावसाची हजेरी ....फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका
सांगली जिल्ह्यात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी सांगली, मिरज परिसरात पावसाने हजेरी लावली. पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ हवामान आहे. बुधवारी तर दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. जिल्ह्याचे तपमान किमान २२ तर कमाल ३२ सेल्सियस आहे. आज सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास पाऊस तुषार स्वरुपात झाला. यामुळे फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष घडाच पाणी साचून दावण्याचा धोका वाढला आहे. तर हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असली तरी शाळूला हलका पाऊस व ढगाळ हवामान लाभदायी ठरणार आहे.

 

 
समुद्रपूर तालुक्यातील खंडाळा शिवारात भीषण अपघात

 नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात झालाय. खंडाळा शिवारात ट्रक आणि बॅटरीवर चालणाऱ्या मोपेडची समोरासमोर धडक झालीये.. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाले. तर बॅटरी वरील दुचाकी जळून खाक झाली आहे.. हिंगणघाट शहरातील रहिवासी धनराज शेषराव वासाड(२७) प्रिमतम जगदीश टेभुळकर (२५) अशी मृत तरुणांची नावे आहेत..  पोलीसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक सह चालकाला ताब्यात घेतले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .

समुद्रपूर तालुक्यातील खंडाळा शिवारात भीषण अपघात

 नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात झालाय. खंडाळा शिवारात ट्रक आणि बॅटरीवर चालणाऱ्या मोपेडची समोरासमोर धडक झालीये.. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाले. तर बॅटरी वरील दुचाकी जळून खाक झाली आहे..


 हिंगणघाट शहरातील रहिवासी धनराज शेषराव वासाड(२७) प्रिमतम जगदीश टेभुळकर (२५) अशी मृत तरुणांची नावे आहेत.  पोलीसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक सह चालकाला ताब्यात घेतले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीला रवाना होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीला रवाना होणार


केंद्रीय अर्थसंकल्प संदर्भात उद्या सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांची दिल्लीत बैठक


अर्थसंकल्पाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा


उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठक होणार आहे

राज ठाकरे कोल्हापूर-कोकण दौऱ्यावर जाणार

२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ ह्या दरम्यान राज  कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.  





पाथरी विधानसभेची काँग्रेसची जागा राष्ट्रवादीला सोडा, राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पक्षाकडे मागणी 

परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस कडून राष्ट्रवादीला सोडून घ्या अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षाकडे केलीये ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असताना बाबाजानी यांनी ही मागणी केल्याने आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.


परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेते,पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहात पार पडली ज्याला जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी,पक्षाचे नेते विजय गव्हाणे,माजी माजी आमदार विजय भांबळे,राजेश विटेकर यांच्यासह सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी पाथरी विधानसभा मतदान संघात सध्या काँग्रेसचा आमदार असताना हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडवुन घेण्याची मागणी केली असुन मी स्वतः माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले तसेच पाथरीत राष्ट्रवादीची ताकद असुन राष्ट्रवादीच्याच ताकदीवर काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर निवडून आले असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची मागणी बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षाकडे केली आहे त्यामुळे आता काँग्रेस नेमकी काय भुमिका घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आम्ही याबाबत काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाहीये..

खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचा पुण्यात मेळावा 

पुण्यात 4 डिसेंबर रोजी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचा मेळावा 
पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, नाना पेठ, पुणे येथे होणार मेळावा
या मेळाव्यात पुण्यातील काही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

राष्ट्रवादीची लवकरच "शेतकरी दिंडी" निघणार

काँग्रेसकडून राज्यात किसान रॅलीच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीची लवकरच "शेतकरी दिंडी" निघणार


डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिंडीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.


विदर्भातून सुरू होणाऱ्या शेतकरी दिंडीत राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार


विदर्भात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी या मागणीसाठी दिंडीच आयोजन

Ravikant Tupkar: मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर रविकांत तुपकरांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात यासाठी रविकांत तुपकर आज मुंबईत जलसमाधी आंदोलन करणार होते. पण त्या आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. 


 

जेजुरी आजपासून श्री खंडोबाचा चंपाषष्टी षडारात्र उत्सव होणार सुरू

महाराष्ट्राचे कुलदैवत बहुजन समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा अवतार कार्य असणारा धार्मिक चंपाषष्टी उत्सवाला आजपासून गडावरील बालद्वारीत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापनाहून प्रारंभ होणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या चंपाषष्ठी उत्सव काळामध्ये राज्यभरातून नव्हे तर पररज्यातून देखील कुळाचार आणि कुलधर्म करण्यासाठी जेजुरी गडावर हजेरी लावत असतात.

Uddhav Thackeray Press Conference : उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद

Uddhav Thackeray Press Conference : उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद





कोल्हापूर : शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला समतेचा संदेश दिला ; ज्योतिरादित्य शिंदे यांचे प्रतिपादन

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला समतेचा संदेश दिल्याचे शिंदे म्हणाले. माधवराव शिंदे पहिले आणि शाहू महाराजांनी एकत्र काम केलं. संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांनाही दोघांनी प्रोत्साहन दिले. समतेच्या याच मार्गावरून आम्ही जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. 

Maharashtra News : महाविकास आघाडीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

Maharashtra News : महाविकास आघाडीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा


लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदविरोधात कोर्टात आलेल्या याचिकाकर्त्यांना तूर्तास कोणताही दिलासा नाही


बंदमुळे झालेली नुकसानभरपाई सत्तेतील पक्षांकडून वसुल करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका


माजी आयपीएस ज्यूलिओ रिबेरो यांच्यासह अन्य काही निवृत्त अधिका-यांची याचिका


याचिकेवरील सुनावणी 23 जानेवारीपर्यंत तहकूब

Maharashtra News : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानीला 75 तोळे सोन्याचे दागिने

Maharashtra News : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानीला 75 तोळे सोन्याचे दागिने अपर्ण केले आहेत. आजच्या बाजार भावाप्रमाणे 37 लाख 50 हजार किंमत होते. 

विकास आराखड्याची सल्लागार कंपन्यांसाठी निविदा निघाल्याने नागरिकात संभ्रम
पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला टोकाचा विरोध सुरु असताना शासनाकडून मात्र हा विकास आराखडा राबविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली असून 26 डिसेंबर रोजी हे टेंडर भरायचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या 1500 कोटी रुपयाच्या प्रकल्पासाठी ऑनलाईन निविदा मागविल्या आहेत. यामध्ये पंढरपूर शहर आणि परिसरात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी उभारणी , देखरेख यासाठी आर्किटेक्चर कंपन्यांना निविदा भरण्याचे आवाहन केले आहे. या निविदासाठी प्रिबिड बैठक 22 नोव्हेंबर रोजी मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात होती. तर निविदा भरण्याची तारीख 26 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. या निविदा सोलापूर येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जमा करायच्या असून या निविदा 29 डिसेंबर रोजी फोडण्यात येणार आहेत. एका बाजूला शासन आणि प्रशासन नागरिक आणि बाधितांशी चर्चा करीत असताना या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सल्लागार कंपन्यांकडून  निविदा मागविण्यात आल्याने नागरिकात संभ्रम वाढला आहे.  या निविदेसाठी टाटा सह देशभरातील जवळपास 15 कंपन्या यासाठी इच्छुक आहेत. 
देशातील सर्व संस्था दबावाखाली काम करत आहेत, निवडणूक आयोगाबाबतचे सुप्रीम कोर्टाचे ताशेरे हेच दर्शवत आहे: संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट

 देशातील सर्व संस्था दबावाखाली काम करत आहेत, निवडणूक आयोगाबाबतचे सुप्रीम कोर्टाचे ताशेरे हेच दर्शवत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबईत ठाकरे शिंदे गट पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता

Mumbai News : मुंबईत ठाकरे शिंदे गट पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता


मुंबईतील कामाच्या श्रेयवादावरुन दोन्ही गट समोरासमोर येण्याची शक्यता


तीन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी एल्फिन्स्टन परिसरातील रस्ता आणि फुटपाथ सुशोभीकरणाचे उद्घाटन केले होते


यावेळी समाधान सरवणकर यांना ठाकरे गटाने विरोध करत, घोषणाबाजी केली होती


आता ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी हे समाधान सरवणकर यांनी उद्घाटन केलेल्या कामाचे पुन्हा उद्घाटन आज करणार आहेत


याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल कर असा मजकूर बॅनरवर छापण्यात आला आहे 


त्यामुळे पुन्हा दोन्ही गट आमने सामने येऊ शकतात

Dhule News: धुळे शहरासह ग्रामीण भागात गोवरचे संक्रमित रुग्ण आढळले, 70 संशयितांची नोंद

Dhule News: धुळे शहरासह ग्रामीण भागात गोवरचे संक्रमित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात सध्या गोवर सदृश्य 70 रुग्ण आढळून आले आहेत तर शहरात सात जणांवर उपचार सुरू असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली जाणार आहे, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सत्तर गोवर सदृश्य रुग्ण असून त्यात 57 शहरातील रुग्णांचा समावेश आहे यापैकी सात जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

Ratnagiri News : 18 गावांना तीव्र पाणीटंचाईची भीती

Ratnagiri News : खेड तालुक्यातील तळवट धरणाचा दरवाजा अज्ञान व्यक्तीने उघडल्यामुळे धरणातील पाणीसाठा जवळपास निम्मा कमी झाला असून परिसरातील सुमारे 18 गावांना यावर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाचा दरवाजा नेमका कोणी उघडला याचा शोध अजूनही पोलीस घेत असून सुरक्षा रक्षक अथवा वॉचमन नसल्याने धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.

Maharashtra News : कोकणातील रिफायनरीचे समर्थन; आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रोष

Maharashtra News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतलीय. मुंबईत झालेल्या बैठकीला साळवी हजर राहिले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं. पण त्याचे पडसाद आता कोकणातल्या रिफायनरी होणाऱ्या भागांमध्ये दिसू लागले आहेत. साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर या भागातील महिला एकत्र आल्या. त्यानंतर त्यांनी राजन साळवी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले तर फोटोवर शेण फेकून मारले. यावेळी जोरदार घोषणाबाजी राजन साळवी यांच्या विरोधात केली गेली. शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. पण त्याच वेळी खासदार विनायक राऊत यांनी मात्र आम्ही जनतेसोबत असं पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांना लिहिलं. त्यावरून आता पुन्हा एकदा ठाकरे गटातील रिफायनरच्या मुद्द्यावर असलेले अंतर्गत मतभेद हळूहळू समोर येताना दिसून येत आहेत.

Meghalaya Earthquake: मेघालयात भूकंपाचे सौम्य धक्के

Meghalaya Earthquake: मेघालयमध्ये (Meghalaya News) भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake News) जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं (National Center for Seismology) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 3.46 वाजता राज्यातील तुरापासून 37 किमी पूर्व-ईशान्य दिशेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Latur Accident : लातूर उदगीर मार्गावर पेट्रोल टँकर आणि उसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात

Latur Accident : लातूर उदगीर मार्गावर पेट्रोल टँकर आणि उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत टँकरला आग लागली. भातखेडा पुलावरील या घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होतेय.

Maharashtra Politics : राम शिंदे स्वतःला श्रेय घेण्यासाठी आमची काम होऊ देत नाहीत : रोहित पवार

Maharashtra Politics : कर्जत-जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांना स्थगिती आणली जात असल्याचे म्हणत आमदार रोहित पवारांनी भाजप आमदार राम शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. आम्ही लोकांच्या हितासाठी विकास कामे मंजूर करून आणली आणि तुम्ही आता सत्तेत आल्यावर केवळ आपल्यालाच श्रेय मिळावा यासाठी या कामांना स्थगिती देता!, तुम्ही आमदार असताना तुम्हाला कामं करता आली नाहीत आम्ही कामं करतोय तर तुम्ही स्थगिती देता असं म्हणत त्यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. कुंभळी, खर्डा येथील विकास कामाला चार महिन्यापूर्वी आम्ही मंजुरी आणली पण केवळ राम शिंदेंना या कामांचा नारळ फोडायचाय त्यामुळे ते कामं होऊ देत नाहीत असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. मात्र जनता या गोष्टी विसरत नाहीत, जनता या सर्व गोष्टी पाहत आहेत असं पवार म्हणाले.

Ravikant Tupkar : हिंमत असेल तर अडवून दाखवा, जलसमाधी आंदोलन होणारचं

Swabhimani Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही. काहीही झालं तरी आज जलसमाधी आंदोलन होणारचं असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. आजच्या जलसमाधी आंदोलनासाठी एक हजार शेतकऱ्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशाराही रविकांत तुपकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Akola News Update : भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल

Akola News Update : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि आमदार नितिन देशमुखांसह ( Nitin Deshmukh) इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Bhavna Gawli ) यांच्या विरोधात 'गद्दार-गद्दार' अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर आज रात्री  उशीरा अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल  


शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि आमदार नितिन देशमुखांसह ( Nitin Deshmukh) इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Bhavna Gawli ) यांच्या विरोधात 'गद्दार-गद्दार' अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर आज रात्री  उशीरा अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.


धक्कादायक! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 80 हजार 865 कोटी रूपयांची फसवणूक  


देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहे. त्यापैकी सर्वाधिक 6 हजार 939 प्रकरणे 2020 या करोना काळातील असून सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. महत्वाचं म्हणजे स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत 2017 ते सप्टेंबर 2022 या काळात 634.41 कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली आहे.  


अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेतील देशभरातील शाखांमध्ये 2017 मध्ये 2 हजार 324.37 कोटींच्या फसवणुकींची 1 हजार 302 प्रकरणे घडली आहेत. तर 2018 मध्ये 8 हजार 764.77 कोटींच्या फसवणुकींची 2 हजार 591 प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये 34 हजार 628 कोटींच्या फसवणुकींची 5 हजार 488 प्रकरणे, 2020 मध्ये 23 हजार 773.64 कोटींची 6 हजार 939, 2021 मध्ये 6 हजार 132.30 कोटींच्या फसवणूकींची 4 हजार 109 प्रकरणे घडली आहेत. तर 1 जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत 5 हजार 241.93 कोटींच्या फसवणुकीची 2 हजार 293 प्रकरणे घडली आहे. 


Bharat Jodo Yatra: 'आम्ही जिंकलो, त्यांनी आमदार विकत घेतले', राहुल गांधींचा मध्य प्रदेशात भाजपवर हल्लाबोल


काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा प्रवास आता मध्य प्रदेशमध्ये सुरु झाला आहे. मध्य प्रदेशमधील बुरहानपूरमध्ये ही यात्रा पोहोचली असून यावेळी सभेला संबोधित करताना काँग्रेसने राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक जिंकलो, आमचे सरकार होते. पण 20-25 भ्रष्ट आमदारांना  कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतले गेले आणि त्यांनी सरकार बनवली. 


राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली कारण सर्व लोकशाही मार्ग बंद होते. लोकसभा बंद पडली, निवडणुकीचा मार्ग बंद झाला आणि माध्यमांचा मार्गही बंद झाला. ते म्हणाले, ते (भाजप) आमदारांना विकत घेतात, माध्यमही त्यांचे आहेत. अशा परिस्थितीत आवाज उठवण्यासाठी काँग्रेसला हा प्रवास सुरू करावा लागला. ते म्हणाले की, सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. आवाज उठवण्याच्या सर्व लोकशाही पद्धती बंद झाल्या. केवळ निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.