India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे होते.
दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. मालिकेतील दुसरा सामना पिंक बॉलचा कसोटी सामना असणार आहे. हा डे-नाईट कसोटी सामना असेल. या सामन्यापूर्वी टीम इंडिया पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध पिंक बॉलने दोन दिवसीय सराव सामना खेळला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातील कामगिरीने सर्वांना नाराज केले.
पहिल्याच सामन्यात रोहित ठरला फेल
पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला नाही. रोहित शर्मा ओपनिंग करेल आणि मधल्या फळीत केएल राहुल असेल, असं वाटत होतं. पण रोहित शर्मानं केएल राहुलला यशस्वी जैस्वालसोबत ओपनिंगसाठी पाठवलं. या सामन्यात रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 11 चेंडूत केवळ तीन धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने चाहत्यांची निराशा केली. त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती.
रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. यापूर्वी रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतही त्याच्या बॅटमधून मोठी खेळी आली नाही. आता ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याआधी रोहित शर्मानं भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला रोहित शर्माची फारशी उणीव भासली नाही. त्याच्या अनुपस्थितीत भारताने तो सामना 295 धावांनी जिंकला. रोहित शर्मा नुकताच पुन्हा बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. रोहित शर्मा आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ॲक्शन करताना दिसणार आहे. हा सामना 06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे.
हे ही वाचा -
सूर्या दादाची संघात अचानक एन्ट्री, ब्रेकनंतर पुनरागमन, केली मोठी घोषणा