Maharashtra News Updates 16 November 2022 : सावरकरांनी स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार: देवेंद्र फडणवीस

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Nov 2022 11:12 PM
नवाब मलिक यांच्यावर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल

नवाब मलिक यांच्यावर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल. समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबईताल गोवर आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ, आकडा 164 वर 

मुंबईताल गोवर आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ, आकडा 164 वर 


मुंबई गोवर आजाराचे एकूण 1 हजार 263 संशयित रुग्ण, आज 184 संशयित गोवर रुग्णांची भर 


मुंबईतील रुग्णालयात 80 रुग्णांवर उपचार सुरु, आज रुग्णालयात 12 रुग्ण दाखल 


मुंबई गोवरमुळे आज एकही मृत्यूची नोंद नाही, आतापर्यंत गोवरमुळे 7 संशयित रुग्णांचा मृत्यू

संजय राऊत यांना ईडी कडून पुन्हा एकदा चौकशी साठी हजर राहण्याची नोटीस

संजय राऊत यांना ईडी कडून पुन्हा एकदा चौकशी साठी हजर राहण्याची नोटीस


संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टातून जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती


त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे, आणि त्याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे


18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे

Devendra Fadanvis: सावरकरांनी स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार: देवेंद्र फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल चुकीचं बोलत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याआधी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले. 

'एबीपी माझा'च्या बातमीनंतर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची उचलबांगडी

अखेर 'एबीपी माझा'च्या बातमी नंतर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची उचलबांगडी


धनराज माने यांच्यावर आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणी संबंधित कामकाजाची जबाबदारी


माने यांच्याबाबत जे जे रूग्णालयाने दिलेला अहवाल एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर उच्च शिक्षण विभागाची कारवाई


माने उजव्या डोळ्याने अंध असुन डाव्या डोळ्याने त्यांना केवळ 10 टक्के दिसत असल्याचा जे जे रुग्णालयाचा अहवाल

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएस अधिकाऱ्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं पुन्हा जारी केला जामीनपात्र वॉरंट  

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएस अधिकाऱ्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं पुन्हा जारी केला जामीनपात्र वॉरंट  


एटीएस अधिकारी दोनदा समन्स बजावूनही हजर न झाल्यानं विशेष एनआयए कोर्टाची कारवाई


कोर्टात उपस्थित राहून पाच हजारांचा दंड भरल्यानंतर वॉरंट रद्द करता येणार


संबंधित एटीएस अधिकारी याप्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएस अधिकाऱ्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं पुन्हा जारी केला जामीनपात्र वॉरंट  

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएस अधिकाऱ्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं पुन्हा जारी केला जामीनपात्र वॉरंट  


एटीएस अधिकारी दोनदा समन्स बजावूनही हजर न झाल्यानं विशेष एनआयए कोर्टाची कारवाई


कोर्टात उपस्थित राहून पाच हजारांचा दंड भरल्यानंतर वॉरंट रद्द करता येणार


संबंधित एटीएस अधिकारी याप्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत

मुरुडमधील साई रिसॉर्ट तोडण्यासाठी अखेर ठेकेदार नियुक्त- सूत्रांची माहिती

मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट तोडकाम प्रकरण


साई रिसॉर्ट तोडण्यासाठी अखेर ठेकेदार नियुक्त- सूत्रांची माहिती


विजयकुमार त्रिपाठी यश कन्स्ट्रक्शन यांना दिला तोड कामाचा ठेका


पर्यावरण विभागाने सी आर झेड चे उल्लंघन केल्याप्रकरणी साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश


राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने तोड काम करण्यासाठी मंजूर केलेत एक कोटी रुपये


एकूण बांधकाम विभागाकडे सहा निविदा आल्या


माझी पालकमंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा होता आरोप

रेणुका देवीच्या यात्रेत महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांना जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

Belgaum News:  सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा पाच ते सात डिसेंबर दरम्यान होणार असून महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो भक्तांना सगळ्या सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे केली आहे. व्हॉईस ओव्हर - बेळगाव सकल मराठा अध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने यात्रा काळातील समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात यात्रा काळात कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना डोंगरावर प्रवेश दिला जावा.पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. यात्रा काळात पिण्याचे पाणी, स्वच्छता,पथदीप,देवी दर्शन, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी या संदर्भात विशेष उपाययोजना हाती घेण्यात याव्यात.पौर्णिमा यात्रेला तीन लाखाहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर उपस्थित असतात. त्यामुळे यात्रा काळात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी. चोरट्यांच्या कारवाया आळा बसावा. यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी अशी मागणी  करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, उपाध्यक्ष गजानन विभुते, सरचिटणीस अच्युत साळोखे,उपाध्यक्ष रमेश बनसोडे,खजानिस मोहन साळोखे,सदस्य अशोकराव जाधव, दयानंद घबाडे, केशव माने, आनंदराव पाटील,तानाजी चव्हाण,चेतन पवळ, सतीश डावरे, आकाश पाटील,सरदार जाधव, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी,नहुष जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.

Pune News: पुण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रोश सभेचे आयोजन

दिल्लीत 28 वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या केल्यानंतर देशात सगळीकडे खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मात्र या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. आज पुण्यात सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने कोथरूड भागात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. हा प्रकार दिल्लीत घडला तो उद्या पुण्यात पण घडू शकतो म्हणून "आता शांत बसायचे नाही" यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले . या सभेला विविध हिंदू संघटनांनी भाग घेतला आहे.

Mumbai High Court News: उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणी 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणी 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब, गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, भिडे यांनी त्यांच्या याचिकेबद्दल असलेले आक्षेप अद्याप दूर केले नसल्याची प्रतिवाद्यांची माहिती, हायकोर्ट रजिस्ट्रारला यासंदर्भात याचिकाकर्त्यांशी बोलून अडचणी दूर करण्याचे निर्देश

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणाबाबत निर्णयासाठी स्थगिती आदेश आणखी चार आठवडे लागू राहणार

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणाबाबत निर्णयासाठी स्थगिती आदेश आणखी चार आठवडे लागू राहणार


आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होती, पण हे प्रकरण कामकाजात आलं नाही केवळ मेन्शन झालं कोर्टाने चार आठवड्यानंतरची तारीख दिली आहे. 


ठाकरे सरकारनं नोव्हेंबर 2020 मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांची नावं विधानपरिषदेवर नामनिर्देशित करण्यासाठी पाठवली होती


 मात्र, राज्यपालांनी ती मंजूर केली नव्हती


 शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यावर ती यादी परत मागवण्यात आली, याचा देखील उल्लेख सुप्रीम कोर्टात मागील सुनावणी वेळी करण्यात आला

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी


92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत उद्या सुनावणी


मागच्या चार-पाच वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर उद्याची तारीख सुनावणीसाठी निश्चित


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचे काय होणार याचे उत्तरही या सुनावणीत मिळणार आहे



सोबत बीएमसीच्या प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जायला सांगितलं होतं त्याबाबत हायकोर्टातही उद्याच सुनावणी होणार आहे

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचा सरकाराला घरचा आहेर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचा सरकाराला घरचा आहेर


ऐन अधिवेशन काळात नागपूर मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा


गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचं मुख्यमंत्र्यांना पत्र


एसटी कर्मचारी विलीनीकरण आंदोलना दरम्यान मान्य केलेल्या 16 मागण्या अद्याप मान्य न केल्यामुळे संघटनेचा उपोषण करणार असल्याचा इशारा

Aurangabad: औरंगाबादमध्ये कापसाच्या शेतात 560 किलो गांजाची लागवड, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.


कापसाच्या शेतात लावलेल्या गांजावर कारवाई.


एकूण 560 किलो गांजाची झाडे पकडली.


तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल.

Majalgaon: महावितरणाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे तीव्र आंदोलन

Majalgaon: माजलगाव तालुक्यामध्ये विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची थ्री फेज कट करण्यात येत आहे. त्यामुळे महावितरणच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडने वीज बिलाची होळी करून तीव्र आंदोलन केलं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांची अडवणूक करून त्यांची वीज कट करू नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. ज्या शेतकऱ्यांची वीज कट केली आहे ती पूर्ववत न झाल्यास संभाजी ब्रिगेड जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार असल्याचही कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : हायकोर्टाच्या निरीक्षणातील 'ही' अट स्थिगीत

Supreme Court on High Court's Order on Feeding Stray Dogs : मोकाट-भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांना दत्तक घेऊन घरी घेऊन जा आणि नंतरच खाऊ घाला, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निरीक्षणातील अट सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर ठोठावण्यात येणाऱ्या दंडालाही पुढील सुनीवणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

Prakash Ambedkar: इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली: प्रकाश आंबेडकर

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. ही भेट आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी झाली. आज झालेल्या भेटील बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या स्मारकाबाबत झाली अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

Eknath Shinde: प्रकाश आंबेडकर यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज भेट झाली. ही भेट आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी झाली. यामागे कोणतंही राजकीय समिकरण नसून ही एक सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

मुंबईतील आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन चिघळले
Mumbai News : आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन चिघळले आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर त्यांच्या शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी 15 तारखेपर्यंत तोडगा काढू, असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. दिवाळी पूर्वीपासून हे सर्व शिक्षक आजाद मैदानावर आंदोलन करत असून आज आंदोलनाचा 37 वा दिवस आहे. मात्र या शिक्षकांच्या कुठल्याही मागण्या मान्य होत नसल्याने ते आझाद मैदानावर आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी या शिक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तातडीने तुमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आझाद मैदान सोडणार नाही, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट; राजगृह निवासस्थानी झाली चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेल्या 'राजगृह'मध्ये ही भेट झाली. 

आज नागपूरचे जिल्हाधिकारी व जि.प. सिईओंचा जनतेशी 'फेसबुक लाईव्ह'वरून संवाद

Nagpur News : जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) योगेश कुंभेजकर हे आज बुधवारी, 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30. वाजता फेसबुक लाईव्हवरून नागपूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 50 वर्षावरील पुरुष आणि महिलांची डोळ्यांची तपासणी आणि शस्त्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विषयक मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे.या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अधिकृत पेजवर पाहता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संवादामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://www.facebook.com/events/809475590169567/

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत सुटाचे तीन उमेदवार विजयी 

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत सुटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. डाॅ. शशीभूषण बाबासाहेब महाडिक (संख्याशास्त्र), डाॅ. शंकर पोशट्टी हंगीरगेकर आणि डाॅ. माधुरी वसंत वाळवेकर विजयी झाले आहेत. 

खणीतील दगड फोडण्यावर बंदी घालण्याच्या एनजीटीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी 

कोल्हापूर : कोल्हापुरातील गौण खनिजांचे उत्खनन आणि खणीतील दगड फोडण्यावर बंदी घालण्याच्या एनजीटीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील टोप आणि शिरोली येथील शेतकऱ्यांनी वायू प्रदूषण होत असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. 

जॉन्सनने बेबी पावडरचं उत्पादन स्वत:च्या जोखमीवर सुरु करावं : हायकोर्ट

Johnson & Johnson : जॉन्सनने बेबी पावडरचं उत्पादन स्वत:च्या जोखमीवर सुरु करावं - हायकोर्ट


मात्र विक्री आणि वितरणावर एफडीएने घातलेली बंदी आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत कायम 


पावडरच्या नव्या नमुन्यांची तीन दिवसांत चाचणी करुन आठवड्याभरात त्याचा अहवाल सादर करा


मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश


तीन प्रयोगशाळांमध्ये बेबी पावडरची नव्याने चाचणी होणार


आरोग्यास हानिकारक असल्याच्या कारणाखाली जॉन्सन बेबी पावडरवर एफडीएकडून बंदी

Pune: पीएमपीएलचे सोमवारी एकाच दिवसात विक्रमी उत्पन्न, सोमवारी 2 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न

पीएमपीएलला सोमवारी एकाच दिवसात विक्रमी उत्पन्न मिळाले. एका दिवसात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले.  सोमवारी बारा लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी पीएमपीएलमधून प्रवास केला. सहा वर्षानंतर पीएमपीएलच्या उत्पन्नात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. एकूण 1657 पीएमपीएल बसेस धावल्या. 

Pune: पीएमपीएलचे सोमवारी एकाच दिवसात विक्रमी उत्पन्न, सोमवारी 2 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न

पीएमपीएलला सोमवारी एकाच दिवसात विक्रमी उत्पन्न मिळाले. एका दिवसात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले.  सोमवारी बारा लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी पीएमपीएलमधून प्रवास केला. सहा वर्षानंतर पीएमपीएलच्या उत्पन्नात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. एकूण 1657 पीएमपीएल बसेस धावल्या. 

Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा स्थानकात रेल्वे प्रवाशांचे रेल रोको आंदोलन; लोकल उशिराने येत असल्याने आंदोलन

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा स्थानकात रेल्वे प्रवाशांचे रेल रोको आंदोलन; लोकल उशिराने येत असल्याने आंदोलन, सकाली 8.19 लोकल अडवली. 

Pune News: पुण्यात सीएनजीचे दर वाढले, प्रतिकिलो मागे रुपयांची दरवाढ

पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी दरात प्रति किलो एक रुपयांची वाढ करण्यात आली असून 92 रुपये प्रति किलो या दराने  शहरात सीएनजी मिळणार आहे. मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. पुण्यात चार महिन्यानंतर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. 

परभणीचे तापमान 10.07 अंशावर, यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Parbhani Temperature : यंदा परभणी जिल्ह्यात थंडी पडण्यास डिसेंबरचा तिसरा आठवडा उजडलाय. जिल्ह्यात आज 10.07 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली असून सर्वत्र थंडीला सुरुवात झाली आहे. या थंडीमुळे सकाळी व्यायाम,मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली असून उबदार कपड्यांचा वापरही केला जात आहे. एकूणच यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली आहे. त्यामुळे येते काही दिवस हे तापमान असेच कमी राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे परभणीकरांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.


 



Parbhani News : परभणीचे तापमान 10.07 अंशावर

Parbhani News : यंदा परभणी जिल्ह्यात थंडी पडण्यास डिसेंबरचा तिसरा आठवडा उजडलाय. जिल्ह्यात आज 10.07 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली असुन सर्वत्र थंडीला सुरुवात झाली आहे. या थंडीमुळे सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली असून उबदार कपड्यांचा वापर ही केला जातोय एकूणच यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झालीय. त्यामुळे येते काही दिवस हे तापमान असेच कमी राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान शास्त्र विभागाने वर्तवलीय. त्यामुळे परभणी करांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. 

Mumbai News : मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली, दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा वाईट स्थितीत

Mumbai News : मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली, दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा वाईट स्थितीत


मुंबईतील एक्यूआय दिवाळीनंतर पहिल्यांदाच 250 पार 


मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत, एक्यूआय 262 वर


मालाडचा एक्यूआय 320, माझगावचा एक्यूआय 316, बोरिवलीतील एक्यूआय 303 तर चेंबूरमधील 286 वर 


मुंबईपेक्षा तुलनेनं दिल्लीची हवा चांगल्या स्थितीत, दिल्लीचा एक्यूआय 176 वर


मुंबईतील इतर स्टेशन्सवर देखील वाईट स्थिती हवा निर्देशांक, तर 3 स्टेशन्सवर हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट स्थितीत 


दिल्लीतील इतर भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक 
पुसा - 145
लोधी रोड - 128
दिल्ली विद्यापीठ - 303
विमानतळ (टी-3) - 190
नोएडा - 204
मथुरा रोड - 193
आयानगर - 176
गुरुग्राम - 204
धीरपूर - 218


सूक्ष्म कण (PM2.5) हे वायु प्रदूषक आहे जे हवेतील पातळी जास्त असताना लोकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक, मुंबईतील वातावरणात पीएम 2.5 प्रदूषक अधिक 


PM2.5 हे हवेतील लहान कण आहेत जे दृश्यमानता कमी करतात आणि हवा गुणवत्ता पातळी वाढल्यावर हवा धुंद दिसू लागते 


पीएम 2.5 ची पातळी वाऱ्याचा वेग कमी असेल किंवा हवा खेळती नसल्यास अधिक वाढते 


हवेच्या गुणवत्ता वाईट स्थितीत जाण्यास मुंबईत सुरु असलेले बांधकाम, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळीचे सूक्ष्म कण हवेत येतात, आणि मुंबईतील संथ गतीने होणारी वाहतूक ही दोन प्रमुख कारणे

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात लम्पीचा विळखा हा वाढताना दिसतोय. सध्या जिल्ह्यात  7751 जनावरे लम्पी बाधित आहेत, त्यापैकी 837 जनावरांची प्रकृती गंभीर आहे. तर लम्पीमुळे आत्तापर्यंत 1790 जनावरांचा मृत्यू नगर जिल्ह्यात झालाय. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सध्या लम्पिचा विळखा हा वाढताना दिसतोय. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Chandrapur Crime News : मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे झाला वडिलांच्या खुनाचा उलगडा, आई आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात


मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे (Crime News) एका खुनाचा तब्बल 3 महिन्यानंतर उलगडा झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरातील ही घटना आहे. मुलीने आईबद्दल असलेले सत्य जगासमोर आणले. काय घडलं नेमकं?


आईने सांगितलेली बाब मुलींनी सत्य मानली


या घटनेबाबत माहिती अशी की, श्याम रामटेके असं 66 वर्षीय मृतकाचं नाव आहे. त्यांचा 3 महिन्यांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हार्ट अटॅकने त्यांचा झोपेत मृत्यू झाल्याचं पत्नीकडून सांगण्यात आलं. रामटेके यांचं वय 66 वर्ष असल्याने सर्वांनी यावर विश्वास देखील ठेवला. आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आल्या. त्यानंतर रीतसर अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहते, यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. सर्व प्रकरण शांत झालं असतांना मात्र या प्रकरणात मोबाईल मुळे एक मोठा ट्विस्ट आला. 


Bharat Jodo: भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिममध्ये; मेधा पाटकर, तुषार गांधी सहभागी होणार, असा आहे आजचा कार्यक्रम


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा  (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील वाशिममध्ये असणार आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा 70 वा दिवस तर महाराष्ट्रातील 10 वा दिवस आहे. मंगळवारी या यात्रेने विदर्भात प्रवेश केला असून आज ती वाशिममधील मालेगाव या ठिकाणाहून सुरू होणार आहे. या यात्रेत आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी होणार आहेत.


भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला तेलंगणातून देगलूरमार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाक्यावरुन पैनगंगा नदी ओलांडत भारत जोडो यात्रा मंगळवारी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि विदर्भातील इतर प्रमुख नेते होते. पुढचे पाच दिवशी ही यात्रा विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे. 


Sushama Andhare In Kolhapur : कोणता शेतकरी आपल्या चार्टर विमानाने शेतात उतरतो? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना बोचरा सवाल 


शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुरुंदवाड महाप्रबोधन यात्रेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्ला एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला.


त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? मग एवढं कशासाठी बोलता? रिक्षाचालक सांगता, तर शेतकरी मध्येच कोठून आणला? तुम्ही जे सांगता ते, तरी लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या मुलाने जरुर मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण गरीब शेतकऱ्याच्या. एकनाथ भाऊ तुम्ही गरीब शेतकरी आहात का? मुंबईतून जाताना स्पेशल चॅर्टर विमानाने जाता. असा कोणता शेतकरी आहे दाखवा जो चॅर्टरने आपल्या शेतात जातो? एबीपी माझाने याबाबत स्टोरी केली होती. तो माझ्याकडे आता नाही, मी तुम्हाला दाखवतो. त्या पुढे म्हणाल्या एवढं मोठं घर बांधता, रिसाॅर्ट बांधता मग गरीब शेतकरी कसा काय असू शकतो? तुम्ही घराणेशाहीवर बोलता, तर तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात का आणले?


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.