Maharashtra News Updates : हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका, 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. उद्धव गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्धव गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून आज मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
ऋतुजा लटकेंना आज राजीनाम्याचं पत्र मिळणार
शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यानी महापालिकेतील आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा आज सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार ऋतुजा लटके यांना आज त्यांच्या राजीनाम्याचं पत्र मिळण्याची शक्यता आहे.
सेनेच्या फायरब्रॅंड नेत्यांवर गुन्हे दाखल
महाप्रबोधन यात्रेत केलेल्या भाषणांवरुन सेनेच्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिता बिर्जे या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ईडीकडून अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
ईडी आणि सीबीआय संचालकांच्या कार्यकाळाच्या याचिकेवर आज सुनावणी
ईडी आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाळ पाच वर्ष वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दोन तरुणींचा मृत्यू एक जखमी
शेतात काम करत असतानाच दोन तरुणी व एक महिलाच्या अंगावर वीज कोसळून या दुर्घटनेत 2 तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुर्देवी घटना भिवंडी तालुक्यातील पिसा - चिराड पाडा गावाच्या हद्दीत आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शितल अंकुश वाघे (वय १७) योगिता दिनेश वाघे (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणीची नावे आहेत. तर सुगंधा अंकुश वाघे (वय ४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरील ट्विटर हॅंडलने समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशाने ११ ते १४ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केलेला आहे’.
या संदर्भात माहिती देताना देताना साळी म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असण्यातच शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी’.
महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी
सायबर पोलीसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेना सचिव किरण साळी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र साळी यांनी शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे.
लातूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस ....शेतात पाणी ...रस्त्यावर पाणी ...पिके पाण्यात
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरूच आहे...या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे..काढणीला आलेली पिके .. फुल शेती ..भाजीपाला शेतीचे नुकसान भरून येणार नाही अशी स्थिती आहे ...
आज दुपार नंतर लातूर शहर आणि परिसर तसेच रेणापूर तालुक्यातील अनेक गावात तुफान पावूस झाला आहे शेतातील काढणी करून ठेवलेले सोयाबीन असेल ..किंवा काढणीला आलेले सोयाबीन या पावसात भिजून गेले आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जी. एन. साईबाबा प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
जी. एन. साईबाबाप्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलिस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे.