Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
20 फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबर सेवा राहणार बंद
Pune News : 20 फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबर सेवा राहणार बंद
पुण्यातील प्रवशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
20 फेब्रुवारी पासून पुणे आणि चिंचवड मधील कॅब चालकांचे काम बंद आंदोलन
कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने
जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप
येत्या २० फेब्रुवारी पासून RTO पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार
Ashok Chavan : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असं वाटतं अशं ते म्हणाले.
Praniti Shinde : भाजपने दबाव टाकला, ईडीची भीती दाखवली, त्यानंतरच अशोक चव्हाणांचा राजीनामा; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर, महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. 'भाजपने ईडीची (ED) भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलतांना प्रणिती शिंदे म्हणाल्यात की, "वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे. पण ही भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
Chandrashekhar Bawankule : 'काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस, आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात'; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
Chandrashekhar Bawankule : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्राशेखर बावनकुळे म्हणाले की, मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या (BJP) संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Ashok Chavan : अशोक चव्हाणांसोबत तुम्हीही भाजपमध्ये जाणार का? वडेट्टीवार म्हणाले, मी चिल्लर नेता आहे का?
Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तुम्हीही भाजपमध्ये जाणार का असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण काही चिल्लर नेता आहे का? असा प्रतिसवाल विचारला.
अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विश्वजीत कदम, अंतापुरकर जवळगावकर, अमित पटेल आणि इतर दोन-तीन मोठे नेते तात्काळ राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मी काही चिल्लर नेता आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.