Maharashtra Breaking News Live Updates : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन -
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत. दरम्यान, सोमवारी दोन्ही गटाला पक्ष चिन्ह आणि नावाचा निर्णय होणार आहे.
कोजागरी पौर्णिमा -
आज कोजागरी पौर्णिमा आहे. त्यानिमित्त खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात 56 भोग लावण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात दिवे लावण्यात येणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते. या दिवशी कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.
ईद-ए-मिलाद -
आज देशभरा ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ ईद-ए-मिलाद साजरा केला जातो. याला मिलाद ऊन नबी असेही म्हटले जात आहे.
सात मृतदेहाची ओळख पटली -
नाशिक येथील बस दुर्घटनेतील सात मृतदेहाची ओळख पटलेली आहे. अजूनही काही मृतांची ओळख पटलेली नाही, आज काही मृतांचे नातेवाईक नाशिकमध्ये येणार आहेत. त्याशिवाय विरोधीपक्ष नेते अजित पवार नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.
अजित पवार बारामती दौऱ्यावर -
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे विविध ठिकाणी उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होईल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच हंगाम शुभारंभ निमित्ताने अजित पवार शेतकरी मेळावा घेणार आहेत.
कास महोत्सव शेवटचा दिवस -
आज कास महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. शंभूराज देसाई आणि उदयनराजे एकत्र कास महोत्सव येथे जाणार आहेत.
जगदंबा देवीचा "शांती उत्सव" -
आजपासून खामगाव शहरात आराध्य दैवत असलेल्या जगदंबा देवीचा "शांती उत्सव" सुरू होत आहे, संपूर्ण भारतात नवरात्री नंतर कोजागिरी पौर्णिमा ते पुढील दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोना नंतरच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. देवीची स्थापना झाल्यावर हा उत्सव 20 ऑक्टोबर पर्यंत सुरू असेल.. परिसरात हा उत्सव "मोठी देवी उत्सव " म्हणून प्रसिद्ध आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 66 गळीत हंगाम, अजित पवारांची उपस्थिती -
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 66 गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील 10 गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा निर्णय आवाजी मतदानाने संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयाला सभासदांनी कडाडून विरोध केला होता. मागील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक सभासदांचा ऊस कारखान्याला जायला उशीर झाला.. त्यामुळे ही नवीन 10 गावे जोडू नका असे सभासदांनी सांगितले तरी देखील आवाजी मतदानाने संचालक मंडळाने निर्णय घेऊन सभा गुंडाळली होती. वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला होता.. या 10 गावांचा फायदा कारखनायच्या निवडणुकीत करून घेण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मोळी पूजनाच्यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. विरोधी पक्ष नेत्याने लोकशाही जिवंत ठेवावी यासाठी जनमत लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा असे आवाहन मीडियाच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या उद्याच्या सभेकडे सभासदाचे लक्ष लागले आहे.
शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा..
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 शिवाय वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे पाटील, श्रीनिवास पाटील धनंजय मुंडे आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील हा कार्यक्रम गेवराई शहरातील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी 11 वाजता होईल.
अमित ठाकरे नांदेड दौऱ्यावर -
राज ठाकरे यांचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर. महासंपर्क अभियानातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. 9 ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधानांच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45वाजता देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करतील. त्यानंतर साडे सात वाजता सूर्य मंदिराला भेट देतील.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सांगितली ही तीन चिन्हं आणि पक्षाची तीन नावं
उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाची तीन नावं आणि चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत.
तीन चिन्हं
1. उगवता सूर्य
2. त्रिशूल
3. मशाल
पक्षाची तीन नावं
1. शिवसेना बाळासाहेब ठाकरे
2. शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Uddhav Thackeray : मी कुठेही डगमगलो नाही, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे; उद्धव ठाकरे
मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले.
धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.