Maharashtra Breaking News Live Updates :...तर दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 08 Oct 2022 11:43 PM
...तर दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

राज्य निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व त्याच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही, दोन्ही पक्षांकडून पुरावे सादर करणे, लागणारा युक्तिवाद या गोष्टीना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे  अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले  असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले. या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते, दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला दोन्ही गट आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो ,साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून निकालाने अपेक्षित असतं , निवडणूक आयोगा पुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो या दोन्ही गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत भवितव्य हे ठरेल असेही यावेळी उज्वल निकम यांनी सांगितले.


शिवसेना नावच वापरता येणार नाही का याबाबत यापूर्वीच अशा प्रकारांमध्ये दिलेले निकाल अभ्यासाव लागतील तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं असं मतही यावेळी उज्वल निकम यांनी व्यक्त केलं. सोमवारपर्यंत दोन्ही गटांना त्यांची मान्यता चिन्ह कोणती आहेत याची निवड करावी लागेल असेही यावेळी उज्वल निकम म्हणाले.

मुंबई शपथपत्र घोटाळा, स्टॅम्प पेपरचा वापर करून ठाकरे गटाने बनवली शपथपत्रे, नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप, निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

मुंबई शपथपत्र घोटाळा, स्टॅम्प पेपरचा वापर करून बनवली शपथपत्रे 


नोटरी करणाऱ्यांनीच बनवली शपथपत्रे


4682 शपथपत्रे पोलिसांनी केली जप्त


निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


'ठाकरे गटाने बनवली शपथपत्रे'


नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप

शिंदे साहेब आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा: आमदार रवी राणा

आमदार रवी राणा यांचं ट्वीट, शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझा पक्ष माझ्या पक्षाचे चिन्ह spanner (पाना) आपल्या सोबत उभा राहील.. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा ...

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.- आदित्य ठाकरे

निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही- रोहित पवार

#शिवसेना हे नाव आणि #धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही.दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल.

निवडणूक आयोग ही संस्था वेठबिगार झाली आहे. छाननी न करता हा निर्णय घेतला. महाशक्ती त्यांच्या पाठीशी आहे, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

निवडणूक आयोग ही संस्था वेठबिगार झाली आहे. छाननी न करता हा निर्णय घेतला. महाशक्ती त्यांच्या पाठीशी आहे, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

उद्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदार, खासदारांची संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक

उद्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदार, खासदारांची संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक

शिवसेना कोर्टात जाणार का?

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर आज दुपारी बैठक पार पडली होती. निवडणूक आयोग चिन्ह गोठवल जाऊ शकतं याची पुसटशी कल्पना आल्याने वेगवेगळ्या चिन्हांची चाचपणी केली. मात्र शिवसेना नाव गोठवल जाईल याची थोडीही कल्पना नसल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. नाव गोठवल्याने पुन्हा कोर्टात किंवा निवडणूक आयोगाकडे जायचं का यासंदर्भात चर्चा होणार आहे. आतापर्यंत आरपीआय आणि ईतर पक्ष फुटले मात्र त्याचं नाव गोठवण्यात आलं नव्हतं त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गट पुढील रणनिती आखणार आहे. 

शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही.  पण...

फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. पण, शिवसेनेशी संबंधित काहीही नाव घेता येईल. उदा. लोक जनशक्ती पक्षाच्या बाबतीत


राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष
आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)


ही नावे दोन गटांना घ्यावी लागली होती

मातोश्रीवर बैठक होणार

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मातोश्रीवर बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढची रणनिती काय असावी यासंदर्भात चर्चा करणार होणार आहे. 

उद्धव ठाकरे दुसरे बाजीराव - अतुल भातखळकर

तूर्तास आयोगाने धनुष्यबाण गोठवला आहे... जनाब पक्षप्रमुख सर्वस्व बुडवणारे आणि स्वतःही बुडालेले दुसरे बाजीराव ठरले आहेत...

शिवसेना हे नावही दोन्ही गटाला वापरता येणार नाही: निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. आता ठाकरे आणि शिंदे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही आहे.   

निवडणूक आयागोनं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

 निवडणूक आयागोचा शिवसेवनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Eknath Shinde vs uddhav thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली

केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली आहे.  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बाजूकडून दावे सादर झाल्यानंतर आयोगाची मॅरेथॉन बैठक झाली. आता बैठकीनंतर आयोगाचं पुढचं पाऊल काय असणार याची उत्सुकता लागली आहे. सोमवारी सुनावणीसाठी दोन्ही बाजूंना बोलावलं जाणार की त्याआधी काही महत्त्वपूर्ण आदेश देणार याची चर्चा सुरु आहे. आज रात्रीपर्यंत निवडणूक आयोगाची पुढची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

अखेर अमरावती - जबलपूर एक्सप्रेस रेल्वे आजपासून सुरू

अखेर अमरावती - जबलपूर एक्सप्रेस रेल्वे आजपासून सुरू, आज 4.45 वाजता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि खासदार डॉ अनिल बोंडे देणार हिरवी झेंडी, अमरावती - जबलपूर एक्सप्रेस कोरोना काळापासून बंद होती. काही दिवसांपूर्वी ही रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता पण नवनीत राणा आणि डॉ अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करून रेल्वे परत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि आजपासून ही रेल्वे सुरू होतेय.. तर ही रेल्वे सुरू होण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवर काँग्रेसने हनुमान चालीसा पठण करून आंदोलन केले होते..

कल्याणमध्ये मित्राकडून मित्राची हत्या 

कल्याण पूर्वेतील तिसगावनाका येथे मित्रानेच मित्राची हत्या केलीय. पैशांच्या व्यवहारातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून विपिन दुबे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर  राजेश्वर पांडे असे संशयिताचे नावा आहे. पांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

पक्षप्रमुखांच्या परवानगीविना चिन्हाबाबतचा कुठलाही दावा होऊ शकत नाही - ठाकरे गटाचा आयोगापढे दावा

राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथपत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. 
जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर दावा. 


उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही आव्हान दिले गेलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद. त्यामुळे चिन्हाबाबतचा कुठलाही दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही. मुख्य नेता या पदावर शिंदेंनी स्वतःला नेमलं आहे, पण अशा पद्धतीचे कुठलेही पद शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही, असा दावा ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आलाय. 

Mumbai Fire: मुंबईतील कुर्ला परिसरातील इमारतीला आग; कारण अद्याप अस्पष्ट,

Mumbai Fire: मुंबईतील कुर्ला परिसरातील इमारतीत आग लागली आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.काही नागरिक अडकल्याची भीती

Mumbai Cocaine Seized : मुंबई DRIकडून 502 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले

दक्षिण आफ्रिकेतून फळांची खेप येत असून त्यामध्ये ड्रग्ज असू शकतात, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मिळाली होती. त्यानंतर याची तपासणी केली असता. पिअर आणि हिरवे सफरचंद आढळून आले आणि त्याच बॉक्समध्ये एक दगडासारखी वस्तू दिसली ज्याचे वजन जास्त होते. त्याची तपासणी केली असता ही वस्तू उच्च दर्जाचे कोकेन असल्याचं समोर आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे 502 कोटी रुपये आहे.

बारामती विकासाचे मॉडेल अभ्यासण्यासाठी 38 खासदारांचे सहाय्यक बारामतीच्या दौऱ्यावर

बारामती विकासाचे मॉडेल अभ्यासण्यासाठी 38 खासदारांचे सहाय्यक बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे 38 खासदारांचे संसदीय सहायक ( लँप- लेजिस्लेटीव्ह असिस्टंट टू मेंबर ऑफ पार्लमेंट) दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. काल या सहायकांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र, डेअरी, इनक्युबेशन सेंटर, बारामती नगरपालिकेला भेट दिली. हे सहायक आज बारामतीतील हायटेक टेक्स्टाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान या संस्थांना ते भेट देणार आहेत. खासदारांना त्यांच्या कामकाजात विविध प्रकारची मदत करण्याच्या उद्देशाने पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेच्या वतीने नियुक्ती केली जाते. परिक्षा व मुलाखतींद्वारे वेगळे कौशल्य असलेल्या 21 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांना थेट खासदारांसमवेत दिल्लीत वर्षभर काम करण्याची संधी देण्यात येते. संसदेचे पावसाळी अधिवेशन ते बजेट अधिवेशनापर्यंत हे युवक खासदारांच्या कामात त्यांना थेटपणे मदत करतात. संसदेत उपस्थित करायचे प्रश्न, त्यांची भाषणे लिहून देणे, त्यांना इतर कामकाजात मदत करणे अशा स्वरुपाची कामे या युवकांकडून केली जातात. 

Palghar Crop Loss : पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पालघर जिल्ह्यात काल अधूनमधून पाऊस झाल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे तर आजही पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर असून जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून येत आहे काही भागात ढगाळ वातावरण असून जिल्ह्यातील  मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हार सारख्या भागात आपल्याला दाट धूक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते.
भंडारा : शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ, 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ
शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ करून 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ आढळून आल्याच्या धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघड़ झाला आहे. एका जागृत शिक्षकामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान भोजन दिल्या जातो. यासाठी लागणारे साहित्य कंत्राटदाराच्या माध्यमातून शाळांना पुरवठा केला जातो. मात्र, आता यामध्ये घोळ होत असल्याची घटना लाखनी तालुक्यात समोर आली आहे. श्रीहरी राईस अँड अग्रो ली गोंदिया यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवनाळा येथे तांदूळ पाठविण्यात आले होते. त्यावेळी येथील सहाय्यक शिक्षक जयसिंग राठोड यांना तांदळाच्या गोणीत तांदूळ कमी असल्याचा संशय आला, त्यामुळे त्यांनी वजनकाटा लावून मोजण्याची सक्ती केली असता त्यात प्रती कट्टा पाच ते सहा किलो तांदूळ कमी आढळून आले. 
सांगली : शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या वसुलीसाठी अपहरण, पोलिसांकडून सहा जणांना अटक

शेअर मार्केटमधील एक कोटीच्या वसुलीसाठी गुंतवणूक करून घेणाऱ्याच्या भावाचे सहा जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना कुपवाड भागात घडलीय. पत्ता विचारण्याचा बहाणा करत  कुपवाडमधील  तरुणाचे अपहरण करण्यात आले होते मात्र कुपवाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अनवेशन शाखेने  काही तासातच अपहरणाचा डाव उधळून लावत सहा जणांना अटक करत गुन्ह्यात वापरलेली कार, हत्यारं, मोबाईल असा 4 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. प्रणव नामदेव पाटील (वय 23) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे.  

नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्ग 161 ची दुरावस्था, गेल्या चार वर्षापासून कामाची सुरुवात
नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्ग 161 ची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून अतिशय संथगतीने सुरू आहे. तर राष्ट्रीय महामार्ग असूनही या महामार्गावर असणाऱ्या मोठमोठया खड्यामुळे आणि चिखलामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. हिमायतनगरपासून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. असे असताना आद्यपही कंत्राटदराने हे काम पूर्ण केले नाहीय. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर चिखल झाला असून त्यामुळे दररोज अपघात होत आहेत. दरम्यान या दररोजच्या त्रासाने नागरिक संतप्त झाले असून तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून अडचण सोडवावी अशी मागणी होत आहे, तर ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट ठेवले आणि रुंदी कमी केली आणि उड्डाणपूल गायब  केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवा कोंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण यांनी केला आहे. तर या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही तक्रार दिली आहे.
Hingoli Soyabin Fire : पाच एकर शेतात सोयाबीनच्या गांजीला आग 
हिंगोली जिल्ह्यातील गारखेडा येथील शेतकरी रामेश्वर वाघमारे यांच्या शेतातील पाच एकर सोयाबीन कापून ठेवलेल्या गंजीला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने संपूर्ण सोयाबीनची गंजी जळून खाक झाली आहे. यात शेतकरी रामेश्वर वाघमारे यांचे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गोरेगाव पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तर यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर : सुर्यांश साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरुवात
चंद्रपुरात आजपासून 2 दिवसीय सुर्यांश साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी ने करण्यात आली. आझाद बगीचा ते संमेलन स्थळ असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या सभागृहापर्यंत ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासणे या ग्रंथदिंडी ला उपस्थित होते. या ग्रंथदिंडीत चंद्रपूरकर साहित्य प्रेमी आवर्जून उपस्थित होते. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात राज्यभरातील 200 साहित्यिक सामील होणार आहेत.
Palghar News: चक्क विहीर चोरीला गेली! 'पेसा'तून निधी खर्च, पण विहीर गेली कुठं, स्थानिकांचा सवाल

भ्रष्टाचाराविरोधात कायदा असला तरी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येताना दिसतात. भ्रष्टाचारासाठी अनेकदा विविध मार्ग वापरले जातात. पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील एका गावात असाच एक प्रकार समोर आला आहे. विहिरीचे काम न करताच 82 हजाराच्या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात येत  आहे. डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेमध्ये 'पेसा' निधीमधून एक विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र, विहीर जागेवर नसल्याचे म्हटले जात आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Nabdurbar Crop Loss : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, मिरची व्यापाऱ्यांनाही फटका

गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाका दिला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून काढणीसाठी तयार असलेला कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भात शेतीलाही याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात अगोदरच कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यात आता कापसाला परतीचा पावसाचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. वेचणीला आलेला कापूस ओला होऊन खराब होत आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरचीला पावसाच्या पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडते. यातून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परतीच्या पावसाने शेतकरी आणि व्यापारी दोघांना मोठा फटका दिला असल्याचे चित्रं दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

 

 

 

Nandurbar Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा, दुर्गम भागात मतदारांपर्यंत पोहोण्यात उमेदवारांची दमछाक

नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात 206 ग्रामपंचायत साठी निवडणूक होत असून त्यापैकी आठ ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 198 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार रंगला असून ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहण्यास मिळत आहे. अक्कलकुवा तळोदा आणि धडगाव या दुर्गम भागातही ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने लहान-लहान वाड्या-पाड्यांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे नवापूर तालुक्यात सर्वाधिक 81 ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने नवापूर तालुक्यातही प्रचाराचा धुराळा पाहण्यास मिळत आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने मतदार राजाला उमेदवार आणि त्याचे समर्थक साकडे घालताना दिसत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्रतिष्ठित राजकारणाची प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी प्रणाला लागले आहे ग्रामीण भागातील निवडणुका असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. 16 तारखेला होणाऱ्या मतदानात मतदार राजा आपल्या गावाचे कारभारी कोण ठरवता हे 17 तारखेला कळेल.

बाजार समितीत धान्यांची आवक घटली, सततच्या पावसाचा परिणाम

 

Marathwada Sahitya Sammelan : मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

जालना जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आलं. जेष्ठ कवी दासू वैद्य आणि संमलेलानाचे स्वागताध्यक्ष शिवाजीराव चोथे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. घनसावंगी येथे साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आल असून नियोजनानुसार 10 आणि 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनात राज्यातील नामवंत साहित्यिकांचा मेळावा भरणार आहे.

Purandar Railway Bridge : भोरवाडी येथील रेल्वे पूलाचे सुप्रिया सुळे यांच्या आधी भाजपच्यावतीने उद्घाटन

पुरंदर तालुक्यातील पुणे-मिरज लोहमार्गावर भोरवाडी येथे रेल्वेच्या वतीने बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे उद्घाटन पुरंदर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले. येत्या 20 तारखेला या पुलाचे उद्घाटन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार होतं. तत्पूर्वीच भाजपच्या वतीने हे उद्घाटन करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन पुणे जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस अॅड धर्मेंद्र खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे मिरज मार्गावरील या रखडलेल्या पुलाचे काम तातडीने व्हावे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पुरंदरमधील नेते सोमनाथ खोमणे यांनी उपोषण केले होते. यानंतर या पुलाच्या कामाला गती मिळाली होती. या पुलाचे काम पूर्ण झाले असून 20 ऑक्टोबरपर्यंत या पुलावरून वाहने नेता येणार नाहीत असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने येथे 20 ऑक्टोबरला या पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच पुरंदर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी या पुलाचे उद्घाटन केले. 

WASHIM : भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 20 कोटी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी 10 आरोपी अटकेत

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्था असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड आणि जनशिक्षण संस्था वाशिम या मध्ये 20 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फरार सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर काही आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. जून 2019 मध्ये या अपहार प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

Yavatmal : परिवहन अधिकाऱ्यांकडून ट्रॅव्हल्सची पाहणी
नाशिकजवळ झालेल्या अपघातात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर परिवहन अधिकारी खडबडून जागे झाले असून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्लीपर एसी ट्रॅव्हल्सची पाहणी केली. या बसेस प्रवास योग्य आहेत का? बसची उंची, लांबी रुंदीची पाहणी करण्यात आली. यात दोन बर्थमधील अंतर किती असले पाहिजे, इमर्जन्सी डोर आहे का? याची तपासणी करण्यात करण्यात आली.
लंडन येथील ब्रिटिश पार्लियामेंट मधील हाउस ऑफ कॉमन्स मध्ये डॉ. बी. के. दीपक हरके यांचा गौरव
लंडन येथील ब्रिटिश पार्लियामेंट मधील हाउस ऑफ कॉमन्स मध्ये लंडन येथील खासदार श्री वीरेन्द्र शर्मा यांच्या हस्ते डॉ बी के दीपक हरके यांचा सर्टिफिकेट ऑफ एक्ससिल्लेन्स देऊन गौरव करण्यात आला. लंडन येथील ब्रिटिश पार्लियामेंट मधील हाउस ऑफ कॉमन्स मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनच्या वतीने आयोजित इंडो यूके लीडरशिप समिटमध्ये  विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील 52 व्यक्तींना सर्टिफिकेट ऑफ एक्ससिलेन्स देऊन गौरविण्यात आले. यामध्ये भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी लंडन येथील खासदार श्री वीरेन्द्र शर्मा यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ.  दीपक हरके यांचा सर्टिफिकेट ऑफ एक्ससिल्लेन्स देऊन गौरव करण्यात आला. 
दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू

यंदाच्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेला करी रोडमधील गोविंदा प्रथमेश सावंत याचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. मागील महिन्यापेक्षा अधिक काळापासून प्रथमेश केईएम रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारादरम्यान प्रथमेशला निमोनिया झाला होता आणि आज आज सकाळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्याच्या मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

Gadchiroli Two Naxal Arrested : गडचिरोली पोलीसांनी केले दोन नक्षलवाद्यांना अटक

उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोमके सावरगाव परिसरात 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दोन संशयित व्यक्ती मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षलवादी असल्याचे समजले त्यावरून ताब्यात घेवून त्यांना पोमके सावरगाव येथे अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये १) सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे (वय 24 वर्ष) रा. मोरचूल ता. धानोरा 2) समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे (वय 22 वर्ष) रा. मोरचूल ता. धानोरा जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

बीड : शिरूर कासार मधील सिंदफणा प्रकल्प ओव्हर फ्लो

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. शिरूर कासार सह 20 गावांना वरदान असणारा सिंदफणा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शिरूर कासारच्या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे

Flower Prike Hike : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांचा 'सुगंध' महागणार, अतिवृष्टीचा उत्पादनावर परिणाम, बाजारात आवक कमी

सध्या देशात परतीच्या पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार झालं आहे. काही ठिकाणी तर मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरु झाला आहे. दरम्यान, यावर्षी देशाच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. तर काही राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. फुल शेतीवर देखील या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि पश्चिम बंगालच्या (West Bengal)फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं सध्या बाजारात फुलांची आवक कमी होत आहे. त्यामुळं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Jayant Patil : मोदी आणि शाह हे राजकारणी, त्यांची आई-वडिलांशी तुलना करणं चुकीचं : जयंत पाटील

मोदी, शाह हे राजकारणी आहेत. त्यांची आई-वडिलांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केलं. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी शाह यांना शिव्या दिल्या तर सहन करु शकत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चुकीचं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मराठी माणसं असं कधीही करत नसल्याचे पाटील म्हणाले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Nashik Bus Fire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिक बस दुर्घटनास्थळाची पाहणी, बसमध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू

Mumbai: जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Mumbai:  दहिहंडी फोडताना गंभीर जखमी गोविंदा झालेला प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. केईएम रुग्णालयात प्रथमेशचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

Mumbai: जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Mumbai:  दहिहंडी फोडताना गंभीर जखमी गोविंदा झालेला प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. केईएम रुग्णालयात प्रथमेशचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

सप्तश्रृंगी गडावर बसला लागली आग, सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

सप्तश्रृंगी गडावर बसला आग लागली. दरम्यान, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. स्थानिक नागरिक, रोप वे कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य केल्यानं प्रवासी सुखरूप बचावले. प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने प्रवासी सुखरूप असून बस जुळून खाक झाली आहे. कोजागिरीपर्यंत गडावर यात्रा सुरू असते, यासाठी यात्रेसाठी भाविक सप्तश्रृंगी गडावर आले होते.

अमरावती : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

आयुष्यभर आपल्या भजनातून, ग्रामगितेतून अखिल विश्वाला मानवतेची आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 54 व्या  पुण्यतिथी महोत्सवाला अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर सकाळी चार वाजता तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने प्रारंभ झाला. पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने तुकडोजी महाराज यांची महासमाधी ही आकर्षक अशा रंगेबीरंगी फुलांनी सजवण्यात आली होती. महाद्वार आणि गुरुकुंज आश्रम हे आकर्षण रोषणाई फुलून गेले होते. आज सकाळी तीर्थ स्थापना आणि सामुदायिक ध्यानाने या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज सामुदायिक ध्यानानंतर महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा ही गावातून काढण्यात आली.

बुलढाणा : समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर - गोवा महामार्ग सरकारच्या विचाराधीन, DPR साठी सल्लागार नेमणूक प्रक्रिया सुरू

राज्यातील समृद्धी महामार्ग पूर्णत्वास जात असताना आता नागपूर गोवा महामार्ग करण्याचा सरकार विचार करत असून , समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा महामार्ग 760 किमीचा असून राज्यातील 13 जिल्ह्यातून हा जाणार आहे , हा महामार्ग पूर्ण झाल्यास नागपूर हुन गोवा अवघ्या 8 तासात गाठता येणार आहे. शिवाय अनेक धार्मिक पर्यटनस्थळे या महामार्गामुळे जोडण्यात येणार आहे. मात्र या महामार्गाला किती खर्च येणार, जमीन अधिग्रहण कधी, कशी करणार याबद्दल अजूनही काही स्पष्टता माहीत नासल्याच MSRDC च्या अधिकाऱयांनी सांगितलं आहे.

Nashik Bus Fire Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, दादा भुसे, नाशिकच्या ओझर विमानतळावरून, अपघातस्थळी रवाना

Nashik Bus Fire Updates : नाशिक बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकधे दाखल झाले असून अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्तासह आरसीपी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱयामुळे सिव्हिल हॉस्पिटलला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, दादा भुसे, नाशिकच्या ओझर विमानतळावरून अपघातस्थळी रवाना झाले आहेत. 


 

बुलढाणा : नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये मेहकर येथील तीन प्रवासी

आज सकाळी नाशिक जवळ चिंतामणी ट्रॅव्हल्स ला झालेल्या अपघात प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मेहकर येथून मुंबईला जाणारे तीन प्रवासी बसले होते. यात रेयाजा पठाण, भागवत भिसे आणि विशाल पतंगे यांचा समावेश आहे. यातील विशाल पतंगे यांचा आपल्या परिवाराशी संपर्क झाला असून ते नाशिकच्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत , यातील तिन्ही प्रवाशांचे मोबाईल जाळून खाक झाले असल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क होत नाहीये. विशाल पतंगे यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून आपल्या परिवारातील सदस्यांशी संपर्क केला असून त्यांचे परिवारातील सदस्य नाशिकसाठी निघाले आहेत. तर इतर दोघे रेयाजा पठाण आणि भागवत भिसे यांच्या बद्दल अध्याप माहिती मिळत नसल्याच चिंतामणी ट्रॅव्हल्स मेहकर कडून सांगण्यात आलं आहे.

वाशिम : 500 क्विंटल कांद्याला आग

वाशिमच्या वारा जाहागीर येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांच्या शेतातील कांदा चाळीला रात्री अचानक आग लागली. कांदा चाळीतील 500 क्विंटल कांद्यासह शेतीसाहित्य आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी रात्री दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून आग कशाने लागली हे कळू शकले नाही. मात्र या आगीत शेतकऱ्याचे जवळपास 12 लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामा करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

जुजारपूर येथील ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना पाण्यातून करावा लागतोय धोकादायक प्रवास 

राज्यातील शिंदे गटाचे स्टार आमदार म्हणून राज्यात प्रसिद्ध झालेले सांगोला येथील शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न सातत्याने पुढे येऊ लागल्याने बोलघेवड्या शहाजीबापूंनी भाषणबाजी करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रश्नात लक्ष घालावे अशी टीका आता विरोधक करू लागले आहेत. सांगोला तालुक्यात दक्षिण भागात असलेल्या जुजारपूर येथील ओढ्याला दर पावसाळ्यात भरपूर पाणी वाहत असल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी याना या पाण्यातूनच धोकादायक रीतीने प्रवास करण्याची वेळ येत असते. या ओढ्यावर सध्याचा असणारा पूल जमीन पातळीलाच असल्याने पावसाळ्यात कायम या पुलावरून पाणी वाहत असते. यामुळे जुजारपूर जुनोनी या रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागते. याशिवाय दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पाटील वस्ती येथे जाणाऱ्या मार्गावर पुलंचं नसल्याने येथील प्रवास तर जीवघेणा ठरत आहे. या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पावसाळ्याच्या चार महिन्यात या ग्रामस्थांची होणारी अडचण कायमची दूर होणार आहे. मात्र याबाबत शहाजीबापूना पाहायला वेळ नसल्याची टीका शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी केली आहे . विशेष म्हणजे जुजारपूर हे गाव शहाजीबापू पाटील यांच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहिल्याचे दरवेळी मतदानातून दिसत असते. मात्र आपल्याच मतदारांच्या प्रश्नाबाबत बापू लक्ष देण्यास तयार नसल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सध्याही शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना या पाण्यातून जीवघेणा प्रवास करायला लागत आहे . 

बुलढाणा : अकोट-शेगाव मार्गावरील पुलावर ट्रक नादुरुस्त झाल्याने 6 तासांपासून वाहतूक ठप्प ! 

बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेगाव - अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर आज पहाटे या ठिकाणी मालवाहू ट्रक नादुरुस्त झाल्याने अडकला आहे. यामुळे अकोट शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली असून 6 तास उलटले तरी वाहतूक सुरु झालेली नाही. शेगाव - अकोट राज्यमार्गावरील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर इंग्रज कालीन पूल बांधलेले आहे. सदर पूल नादुरुस्त असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास अकोटवरून शेगावकडे सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक हा ऐन पुलावर येऊन नादुरुस्त झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक 6 तास झाले तरी सुरळीत झालेली नाही. या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

Heroine Seized : गुजरात एटीएसकडून 350 कोटींचं हेरॉईन जप्त, पाकिस्तानी बोटीवर कारवाई, सहा जणांना अटक

गुजरात एटीएसने (Gujrat ATS) मोठी कारवाई करण्यात यश मिळवलं आहे. गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) पाकिस्तानी बोट (Pakistani Boat) पकडून 350 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. गुजरात एटीएसने आज भारतीय तटरक्षक दलासोबत मिळून संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात पाकिस्तानी बोट पकडली आहे. त्यावर 350 कोटी रुपये किमतीचं हेरॉईन सापडलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या बोटीतून 50 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं असून त्याची किंमत 350 कोटी रुपये आहे. बोटीवरील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Nashik Bus Fire Updates : नाशिक बस अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, संख्या बारावर, मदतकार्य सुरूच 

Nashik Bus Fire Updates : नाशिकच्या औरंगाबाद रोडवर झालेल्या बस अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या बारावर गेली आहे. तर प्रशासनाकडून अद्यापही मदतकार्य सुरु असून स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत. बस अपघातातील 30 जणांवर जिल्हा रुग्णालयात तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे. 

Nashik Bus Fire : नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना 2 लाखांची मदत, जखमींना 50 हजारांची मदत : पंतप्रधान मोदी 

Nashik Bus Fire : नाशिक येथील बस दुर्घटने संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. त्या सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे, अशा आशयाचे ट्विट पीएमओ कडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला PMNRF कडून 2 लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. 

Nashik Bus Fire Updates : नाशिक बस अपघातातील मृत आणि जखमींबाबत अधिक माहितीसाठी नियंत्रण कक्ष

नाशिक शहरामध्ये ट्रेलर आणि ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे जखमी आणि मृतांविषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
 
+912532572038
+912532576106
जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक

Nashik Bus Fire Updates : अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी? पालकमंत्री संजय राठोड यांचे चौकशीचे आदेश

अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास येत असून त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली. आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या.

Nashik Bus Fire Updates : DNA आणि ईतर फॉरेन्सिक टेस्ट करून मृतांची ओळख पटवणार : नाशिक जिल्हाधिकारी

 अपघात होताच ट्रकच्या इंधनाच्या टाकीत हिट झाल्याने स्फोट झाला आणि बसला आग लागली. बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मयतांची ओळख पटू शकत नाहीय, DNA आणि ईतर फॉरेन्सिक टेस्ट करू, नातेवाईकांसाठी टोल फ्री नंबरही देण्यात येतो, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिली आहे. खासगी लक्झरी बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, आरटीओसोबत चर्चा करून पुढची ऍक्शन घेऊ, असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

ताडदेवमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील स्लॅब मध्यरात्री कोसळला

मुंबई पोलीसांच्या घराला लागलेलं ग्रहण काही सुटायचं नाव घेत नाहीय. ताडदेव पोलीस कॅम्पात बिल्डिंग नंबर 4 मध्ये राहणारे देबे कुटुंबिय थोडक्यात वाचलं, मध्यरात्री 4 वाजता देबे कुटुंबियांच्या घरातला स्लॅब कोसळला त्यात त्यांचा 12 वर्षांचा मुलगा प्रथमेश हा जखमी झाला. मुंबईची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलीस कुटुंबियांची गेल्या अनेक वर्षापासून ही अवस्था आहे. याआधी देखील असे अनेक प्रकार पोलीस वसाहतीत घडले आहे. मध्यरात्री सगळे झोपेत असताना हा स्लॅब कोसळ्यानं पोलीस वसाहतीत भितीचं वातावरण तयार झालं आहे. 

गेल्या 24 तासात मुंबईत 150 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Mumbai Rain : गेल्या 24 तासात मुंबईत 150 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरात 156.79 मि.मी, पूर्व उपनगरात 99.19 मि.मी, पश्चिम उपनगरात 95.84 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. 

Nashik Bus Accident : 'ही घटना अतिशय वेदनादायी..'गृहमंत्री अमित शहांकडून दुःख व्यक्त 

Nashik Bus Accident : नाशिक नांदूर नाक्याजवळ खासगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांच्या कुटुंबीयांप्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 11 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अतिशय वेदनादायी असून कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

Breaking News : नाशिक बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Breaking News : नाशिक बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पहाटे खासगी बसला आग लागून होरपळू 11 जणांचा मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत.





Nashik Bus Fire : नाशिक बस दुर्घटनेतील जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना होरपळून मृत्यू झाला आहे.

Breaking News : खासगी बसला आग लागून दुर्घटना, आठ ते दहा जणांचा जागीच मृत्यू, नाशिक येथील भीषण अपघात

Nashik Bus Accident : महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात आठ ते दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ''या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.''


 






 

Breaking News : नाशिक येथे बसला आग लागून मोठी दुर्घटना, काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र अद्याप मृतांचा आकडा समोर आलेला नाही.

Rain Updates : मुंबईसह राज्यात येलो अलर्ट

मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे संततधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंदमातासह मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी या सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईसह राज्यात दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

 ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


वायुसेना दिवस -
आज भारतीय वायुसेनेचा आज 90 वर्धापन दिवस आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारतात वायुसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वायुसेना दिवस दिल्लीबाहेर साजरा करण्यात येणार आहे. वायुसेनाच्या मैदानावर परेड होणार आहे. चंदीगढमध्ये वायुसेना कसरती करणार आहे. 


भारतीय वायुसेना ही जगातील सर्वात शक्तीशाली वायुसेनाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारतीय वायु सेना दलाच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहून शकत नाही.   अमेरिका, रशिया आणि चीनक पाठोपाठ भारते मोठे हवाई दल जगात सर्वात मोठे आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमाना आहे. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय वायुसेना म्हणून केली होती.  स्वातंत्र्यानंतर त्याची ओळख भारतीय वायुसेना दल म्हणून झाली. परंतु,  1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘वायुसेना दिवस’ म्हणून साजरा होतो.


मुंबईला यलो अलर्ट - 
राज्यभरात परतीच्या पावसाचा सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. 









एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 100 दिवसांच्या कालावधीत या सरकारने महाविकास आघाडी सरकरचे अनेक निर्णय बदलले.  या शंभर दिवसांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. अनेक राजकीय घडामोडी सुद्धा घडताना  पाहायला मिळाल्या. 


निवडणूक आयोगापुढे शिवसेना भूमिका मांडणार -
निवडणूक आयोगानं शनिवारी उद्धव ठाकरे गटाला आपली भूमिका मांडण्यासाठी दुपारी दोन वाजताची वेळ दिली आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगापुढे होणार आहे. त्या कारवाईला सुरुवात झाली आहे. आज उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगापुढे शिंदे गटाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये पक्षाचे प्राथमिक सदस्यच उरले नाहीत तर मग निवडणूक चिन्हावर दावा कसा? एकनाथ शिंदे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा करू शकत नाहीत. त्यांचं बंड म्हणजे स्वेच्छेने पक्ष सोडल्याची कृती असल्याचं निवडणूक आयोगापुढे शिवसेनेनं म्हटलेय. 


भटक्या विमुक्त जमाती संघटनांचं सुवर्ण महोत्सवी अधिवेशन, शरद पवार प्रमुख पाहुणे -
भटक्या विमुक्त जमाती संघटनांचं सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आज नागपुरात होणार आहे. रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. या अधिवेशनात शरद पवार यांना "लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा" अशी उपाधी दिली जाणार आहे. आयोजकांच्या मते या कार्यक्रमात शाहू शहाजी छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर हेही उपस्थित राहणार आहेत... तसेच बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम हे ही या कार्यक्रमात निमंत्रित आहे.


चंद्रपुरात 2 दिवसीय सुर्यांश साहित्य -
आजपासून चंद्रपुरात 2 दिवसीय सुर्यांश साहित्य संमेलन होत आहे, या संमेलनाची सुरुवात सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी ने होणार आहे. आझाद बगीचा ते संमेलन स्थळ असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या सभागृहापर्यंत ही ग्रंथदिंडी निघेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासणे या ग्रंथदिंडी ला उपस्थित राहणार आहेत. 


काँग्रेसची सभा -
भारत जोडो अंतर्गत आज कोल्हापुरात काँग्रेसची भव्य सभा आहे. दिग्विजय सिंग, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे या सभेला उपस्थित राहणार आहेत.


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस -
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवढणुकीतून अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांनी अर्ज केला आहे.  केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद ठरला आहे. 
 
राहुल गांधींची पत्रकार परिषद - 
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमवर राहुल गांधी पत्रकार परिषद घेमार आहे. दुपारी एक वाजता कर्नाटकमधील तुरुवेकेरे येथे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.