Maharashtra Breaking News Live Updates :...तर दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
...तर दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
राज्य निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व त्याच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही, दोन्ही पक्षांकडून पुरावे सादर करणे, लागणारा युक्तिवाद या गोष्टीना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले. या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते, दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला दोन्ही गट आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो ,साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून निकालाने अपेक्षित असतं , निवडणूक आयोगा पुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो या दोन्ही गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत भवितव्य हे ठरेल असेही यावेळी उज्वल निकम यांनी सांगितले.
शिवसेना नावच वापरता येणार नाही का याबाबत यापूर्वीच अशा प्रकारांमध्ये दिलेले निकाल अभ्यासाव लागतील तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं असं मतही यावेळी उज्वल निकम यांनी व्यक्त केलं. सोमवारपर्यंत दोन्ही गटांना त्यांची मान्यता चिन्ह कोणती आहेत याची निवड करावी लागेल असेही यावेळी उज्वल निकम म्हणाले.
मुंबई शपथपत्र घोटाळा, स्टॅम्प पेपरचा वापर करून ठाकरे गटाने बनवली शपथपत्रे, नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप, निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई शपथपत्र घोटाळा, स्टॅम्प पेपरचा वापर करून बनवली शपथपत्रे
नोटरी करणाऱ्यांनीच बनवली शपथपत्रे
4682 शपथपत्रे पोलिसांनी केली जप्त
निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
'ठाकरे गटाने बनवली शपथपत्रे'
नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप
शिंदे साहेब आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा: आमदार रवी राणा
आमदार रवी राणा यांचं ट्वीट, शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझा पक्ष माझ्या पक्षाचे चिन्ह spanner (पाना) आपल्या सोबत उभा राहील.. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा ...
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.- आदित्य ठाकरे
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/EBI1GmVEkt
निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही- रोहित पवार
#शिवसेना हे नाव आणि #धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही.दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

