एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 06 December 2022 : महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय शिंदे सरकारकडून रद्द, म्हाडाच्या एकत्रित पुनर्विकासाचा निर्णय रद्द

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 06 December 2022 : महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय शिंदे सरकारकडून रद्द, म्हाडाच्या एकत्रित पुनर्विकासाचा निर्णय रद्द

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. याबरोबरच गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. तर अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार.  त्याशिवाय अनेक महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरात घडणार आहे. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल

आज महापरिनिर्वाण दिन  
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबडवे या मूळ गावी त्यांना अभिवादन करण्यात येणार 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी दर वर्षाप्रमाणे यंदाही त्यांना अभिवादन करण्यात येणार. आंबडवे येथे दरवर्षी आंबेडकर कुटुंबीय आणि आंबेडकरी अनुन्यायी यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात येते. 

अमरावतीत पदयात्रा

काँग्रेसच्या वतीने शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नया अकोला येथे पदयात्रा काढली जाणार आहे. जवळपास 15 किलोमीटर ही पदयात्रा असून यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

आज मुंबईत जंगलचा राजा येणार
गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. ती आज बोरिवली नॅशनल पार्क मध्ये सोडली जाईल.  

भाजपचा कोकण महोत्सव 
शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपच्या कोकण महोत्सवाने उत्तर दिलं जातं आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेनेनंतर आता भाजपचा कोकणी मतांवर डोळा आहे. यामुळे गोरेगाव नेस्कोमध्ये भाजपने स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आयोजित केला आहे. याचं उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
 
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहा दिवशीय कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.  
 
मुंबईत  शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद 
राज्य उत्पादन शूल्क मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद होणार आहे. 

अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी
अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीनासाठी देशमुखांची याचिका, मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान. देशमुखांच्या याचिकेत तथ्य आढळल्यानं गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याचं हायकोर्टाने मान्य केल आहे. 

22:38 PM (IST)  •  06 Dec 2022

MHADA: महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय शिंदे सरकारकडून रद्द, म्हाडाच्या एकत्रित पुनर्विकासाचा निर्णय रद्द

महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द.

म्हाडाच्या अंतर्गत असणाऱ्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, त्यामुळे एका इमारतीचा पुनविकास करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.

एका  इमारतीचा पुनर्विकास केला तर नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक इमारती एकत्र करून त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.

हा निर्णय आता शिंदे फडणवीस सरकारने रद्द केल्याने पूर्वीप्रमाणे एका इमारतीचा देखील आता पुनर्विकास करता येणार आहे.

एकत्रित पुनर्विकास करताना मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुरर्विकास करायला वेळ लागतो, त्यामुळे घातपात होण्याची शक्यता नाकराता येत नाही.

त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच हा निर्णय कायम ठेवला आहे.

 

18:45 PM (IST)  •  06 Dec 2022

Vasai Passport Office: वसईत नवीन पासपोर्ट कार्यालय आजपासून सुरू

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून वसईत पासपोर्ट ऑफिसचा आज लोकार्पण सोहळा पार पडला आहे. परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरण यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वसई हे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय मुंबईच्या अखत्यारीतील 14 वे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहे. वसई पूर्व एव्हरशाईन सिटी पूजा टावरच्या ग्राउंड फ्लोरला हे कार्यालय नव्याने सुरू झाले आहे. आता पालघर आणि वसई-विरारकरांना 1500 रुपयात पासपोर्ट मिळणार, नव्याने या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्याने वसई विरारकरांसह पालघर जिल्ह्यातील नागरिक देखील आनंदात आहेत.

15:35 PM (IST)  •  06 Dec 2022

Sharad Pawar: सीमावादावर भूमिका घेण्याची वेळ आलीय: शरद पवार

संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यानी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाण दिवशी आज काही तोडफोडीची घटना घडली आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

15:26 PM (IST)  •  06 Dec 2022

बेळगावातील घटनेचे पुण्यात पडसाद, कर्नाटच्या बस आडवल्या

बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक केल्यानंतर आता त्याच्या नेषेधार्थ पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसना काळा आणि भगवा रंग लावला आहे. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापाट झाली.    

15:24 PM (IST)  •  06 Dec 2022

Pune: पुण्यातील स्वारगेट परिसरात कर्नाटकच्या बसेस बाहेर काढण्यात आल्या, शिवसेनेकडून आंदोलन सुरू

पुण्यातील स्वारगेट भागात खाजगी पार्किंगमधे उभ्या असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेस बाहेर काढण्यास सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget