Maharashtra News LIVE Updates : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खाजगी रुग्णालयात वळसे पाटलांना केले दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Kolhapur : कोल्हापूर लोकसभा लढवण्यावर चेतन नरके ठाम, काही पक्षांकडून अजूनही ऑफर आल्याचा नरकेंचा दावा
Kolhapur : कोल्हापूर लोकसभा लढवण्यावर चेतन नरके ठाम
काही पक्षांकडून अजूनही ऑफर आल्याचा नरके यांचा दावा
शिवसेनेकडून तिकीट लढवण्यासाठी नरकेंनी केली होती तयारी
कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाल्याने नरकेंना उमेदवारी मिळाली नाही
जनता हाच माझा पक्ष असल्याने विजयासाठीच मैदानात उतरणार
उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघातून दिली होती लढण्याची ऑफर
चेतन नरके यांच्याकडून हातकणंगलेतून लढण्यास नकार
30 दिवसात मतदार संघात पोहोचणे शक्य नसल्याने नम्रपणे दिला नकार
Politics : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, मुख्य निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार
Politics : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, तात्काळ कारवाई करावी
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार
खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंकडून न्यायालयाचा अवमान आणि जनतेची दिशाभूल
नवनीत राणांचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा.























