एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 10th March 2023 : छत्रपती संभाजीनगरमध्ये गोडाऊनला मोठी आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 10th March 2023 : छत्रपती संभाजीनगरमध्ये गोडाऊनला मोठी आग

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 

आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार

आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मागच्या महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरुन दोन गटाचे दोन भिन्न मत असल्यामुळे शिवजयंती दोन वेळा साजरी केली जाते. सरकारने शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल, परंतु, फाल्गुन वद्य तृतीयेला देखील तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल असे जाहीर केले. यंदा शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज म्हणजेच 10 मार्च रोजी आहे. 

कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती द्या आणि 20 लाख रुपयांचं बक्षीस कमवा, SEBI ची मोठी घोषणा

कर्जबुडव्यांपासून (Defaulters) कर्जाच्या रक्कमेची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI)नवीन घोषणा जाहीर केली आहे. कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती देणाऱ्याला सेबीकडून 20 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे. हे बक्षीस दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याची माहिती सेबीने दिली आहे.  माहिती देणाऱ्याने डिफॉल्टरच्या मालमत्तेची खरी माहिती दिली तरच तो पुरस्कारासाठी पात्र मानला जाईल असंही सेबीने स्पष्ट केलं आहे. 

भाजपने हे लक्षात ठेवावं, आज भरती आहे तर उद्या ओहोटी येणार, राज ठाकरे यांचा इशारा

''प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, 65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे... उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Thane Raj Thackeray Latest Speech) यांनी दिला आहे. गुरुवारी (9 मार्च) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन आहे. या निमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायथनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या विभागात काय काम केलं, कोणती आंदोलनं केली आणि पक्षानं केलेली कार्य यावर डिजिटल पुस्तिका देखील ज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. 

20:56 PM (IST)  •  10 Mar 2023

Chhatrapati Sambhajinagar Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोडाऊनला मोठी आग

छत्रपती संभाजी नगर मध्ये गोडाऊनला मोठी आग

पैठणच्या बिडकीन गावातील शेकटा रोडवरील

घटनास्थळी बिडकीन पोलीस दाखल 

आग विझविण्यासाठी खाजगी टँकर दाखल 

आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशमन दलाल बोलववण्यात आलं आहे. 

11:41 AM (IST)  •  10 Mar 2023

बारामतीमधील सुपे इथे चोरट्यांनी एटीएम पळवून नेले, एटीएममध्ये 7 लाख 14 हजार रुपये असल्याची प्राथमिक माहिती

 
Baramati News : बारामती तालुक्यातील सुपे येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री सुपे येथील इंडीकॅश कंपनीच्या एटीएमवर चोरट्यांनी हात साफ केला आहे. एटीएममध्ये 7 लाख 14 हजार रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी चोरीसाठी बोलेरो गाडीचा वापर केला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे गाडी शोधण्याचं काम वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत. एटीएम मशीनचा काही भाग या परिसरात सापडला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 
07:15 AM (IST)  •  10 Mar 2023

जळगावात इन्फ्लूएंझा सदृश्य व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव; ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांमध्ये वाढ

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सध्या इन्फ्लूएंझा सदृश्य H3N2 या व्हायरल इन्फेक्शनचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असून थंडी ताप, सर्दी खोकला आणि अशक्तपणा असलेली अनेक रुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातही अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असलेल्या आरोग्य सेवेवर त्याचा ताण पडत आहे. या लक्षणांनी आजारी पडलेली व्यक्ती आठ ते पंधरा दिवस बाधित राहत आहे. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जात आहेत. हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबासाठी हे इन्फेक्शन आर्थिक अडचण निर्माण करणारे ठरत आहे. मास्क वापरण्यासह कोरोनाप्रमाणेच काळजी घेऊन या आजारापासून दूर राहता येऊ शकतं असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे
07:09 AM (IST)  •  10 Mar 2023

"सदैव तत्पर, सदैव मदतीस; वृद्ध महिलेला हातावर उचलून चौथ्या मजल्यावरुन खाली आणणाऱ्या महिला पोलिसाचं कौतुक

Mumbai Police : खार पोलीस ठाणे हद्दीत वृद्ध महिला वेणूबाई वाते (72 वर्ष. रा. ठी. सप्तशृंगी निवास खार दांडा खार पश्चिम, मुंबई) यांना त्यांच्या सुनेने मारहाण केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या. खार-05 मोबाईल या वाहनास कंट्रोल रुममधून संदेश प्राप्त झाला. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक घोगरे, पो.शी घारगे, महिला पोलीस शिपाई म्हात्रे असे घटनास्थळावर गेले. परंतु  संबंधित वृद्ध महिलेस हालचाल करता येत नसल्याने महिला पो.शि. म्हात्रे यांनी तिला हातावर उचलून चौथ्या मजल्यावरुन खाली आणून 100 मीटर चालत मुख्य रस्त्यावर आणले. त्यानंतर वृद्ध महिलेला वाहनातून भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

 


07:01 AM (IST)  •  10 Mar 2023

चंद्रपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हातोडीने हल्ला, आरोपीला बेड्या

Chandrapur News : चंद्रपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हातोडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ब्रह्मपुरी शहरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बुधवारी (8 मार्च) दुपारी ही घटना घडली. पीडित तरुणी आपल्या आईसोबत बोंडेगाव या आपल्या गावी जाण्यासाठी निघाली असताना तिच्यावर हल्ला झाला. आरोपी लवेश देऊळकरने पीडित तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र मुलगी नकार देत असल्याने आरोपीने तिच्यावर हल्ला केला. आरोपी हा मिस्त्री कामगार असून त्याला ब्रह्मपुरी पोलिसांनी तात्काळ अटक केली. तर जखमी तरुणीला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget