Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra LIVE Updates : आज दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर...

Background
Maharashtra News LIVE Updates : मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तर, अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांनी या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतली आहे. तसेच, रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
Pune News : पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला
Pune News : निखील वागळे यांना पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजप कार्यकर्त्यांकडून गाडीवर हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली आहे.
Nashik : पावसाळ्यापूर्वी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण करावे - छगन भुजबळ
यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.आज दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.























