(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर..
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Dombivali : डोंबिवलीत नागरीकांच्या घरावर डल्ला मारुन उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला
Dombivali : डोंबिवलीत नागरीकांच्या घरावर डल्ला मारुन उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला
पोलिसांनी केली दोन चोरट्यांना अटक
२३ लाखाचा ऐवज हस्तगत
२४ गुन्हयांची उकल
Kalyan : दिल्लीत रॅपिडो चालविणारा कल्याणमध्ये चालवित होता नकली नोटा, तरुणाला अटक ,
Kalyan : दिल्लीत रॅपिडो चालविणारा कल्याणमध्ये चालवित होता नकली नोटा, तरुणाला अटक ,
कल्याण पोलिस आणि एनआयएने सुरु केला तपास
किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
अंकुश सिंह या नावाच्या तरुणाकडून 13 हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
त्यात १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे.
अंकुश सिंह हा दिल्लीचा राहणारा आहे.
तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवितो. त्याला या नकली नोटा बाजारात चालविण्यात दिल्या होत्या. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
Kolahpur : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू
Kolahpur : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू
सुळे गावातील तिघांचा गजरगाव बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू
धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य आले होते नदीकाठी
उदय बचाराम कटाळे
अरुण बचाराम कटाळे
प्रकाश अरुण कटाळे यांचा बुडून मृत्यू
Ratnagiri : रत्नागिरीत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत
Ratnagiri : रत्नागिरी - उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल
सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत
सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल
कार्यकर्त्यांचा किरण सामंत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी
Rohit Pawar : अनेक तक्रारी या बारामती विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. - रोहित पवार
Rohit Pawar : रोहित पवार पत्रकार परिषद
बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात 155 संवेदनशील बूथ आहेत - रोहित पवार
250 तक्रारी आल्या आहेत.- रोहित पवार
18 तक्रारी पैसे वाटल्याचे आले आहेत..- रोहित पवार
बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न वेल्हे येथे झाला आहे- रोहित पवार
अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी आहेत...- रोहित पवार
लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे...- रोहित पवार
जे लोक भेटतात ते सांगतात आम्ही गुंडा गर्दी दडपशाही आणि आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जायचं नाही...- रोहित पवार
आम्ही प्रामाणिक विचाराच्या बाजूने आहोत - रोहित पवार
गोड बातमी चार जून ला आहेत- रोहित पवार
अनेक तक्रारी या बारामती विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. - रोहित पवार
अजित दादांनी पूर्ण लक्ष फक्त बारामती विधानसभा मतदारसंघावर ठेवला आहे.- रोहित पवार