एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates 31th May 2023 : कर्नाटकात शाळांना सुरुवात, आरती आणि पुष्पवृष्टी करुन विद्यार्थ्यांचे स्वागत

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates 31th May 2023 : कर्नाटकात शाळांना सुरुवात, आरती आणि पुष्पवृष्टी करुन विद्यार्थ्यांचे स्वागत

Background

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

केंद्र सरकारकडून 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालयांवर टांगती तलवार

Recognition of 40 Medical Colleges Canceled: मोदी सरकारनं (Modi Government) देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. यासोबतच केंद्र सरकारनं (Central Government) 150 वैद्यकीय महाविद्यालयं निगराणीखाली ठेवली आहेत, याचाच अर्थ असा की, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यानं सरकारनं ही पावलं उचलली आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या महाविद्यालयांची मान्यता रद्द?

केंद्र सरकारनं ज्या 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली. ती गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील आहेत. तसेच, उर्वरित दीडशे वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी अजुनही सुरूच आहे. चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांची मान्यताही रद्द करण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.  

Buldhana News : लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू, सजनपुरी परिसरात तणाव, दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा (Autorickshaw) घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. या घटनेनंतर सजनपुरी (Sajanpuri) परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. परिणामी परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

नेमकं काय घडलं?

खामगावातील सजनपुरी परिसरात मंगळवारी (30 मे) रात्रीच्या लग्न सोहळा पार पडत होता. रात्री नऊच्या सुमारास लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसली. या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रथम उपचार केले. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रुग्णालयात नेत असतानाच रामू सावरकर या इसमाचा वाटेत मृत्यू झाला. यामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता. 

परिसरात दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ऑटोरिक्षा चालक विशिष्ट समाजाचा असल्याने आणि जखमी वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

22:23 PM (IST)  •  31 May 2023

Pine News: पुणे आणि खडकवासला कॅन्टोन्मेंट बोर्डचे पुणे महापालिकेत विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु

Pune News: लष्कराच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि खडक कॅन्टोन्मेंट बोर्ड हे पुणे महापालिकेत विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विकासकामे आता महापालिकेच्यावतीने होणार आहेत. Read More
20:00 PM (IST)  •  31 May 2023

Karnataka : कर्नाटकची महाराष्ट्राकडे पाच टीएमसी पाणी सोडण्याची मागणी

Karnataka : पिण्याच्या पाण्याची उत्तर कर्नाटकात टंचाई जाणवत असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राकडे पाच टीएमसी पाणी सोडण्याची विनंती  केली आहे. बेळगाव , कलबुर्गी आणि उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने लोकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृष्णा आणि भीमा नदीत पाच टीएमसी पाणी सोडावे अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

19:07 PM (IST)  •  31 May 2023

Karnataka School : कर्नाटकात नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ, आरती करुन आणि पुष्पवृष्टी

कर्नाटकात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला होता. विद्यार्थीही उत्साहाने पहिल्या दिवशी गणवेश परिधान करून शाळेत दाखल झाले होते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. शाळेत रांगोळ्या काढून वर्गाना तोरण बांधण्यात आले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरती करण्यात आली. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्याला गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आगमन होताच शिक्षकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई देखील वाटण्यात आली.

18:43 PM (IST)  •  31 May 2023

Mumbai: प्रियकराने लग्नास दिला नकार; उंदिर मारण्याचं औषध पिऊन संपवलं जीवन

Mumbai News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर उंदिर मारण्याचं औषध प्राशन करुन महिलेनं आपलं जीवन संपवलं, सायन रुग्णालयात 21 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर बीकेसी पोलिसांनी प्रियकर अमान अन्सारी (वय 21) आणि त्याची बहीण तरन्नुम अन्सारीला (वय 27) हिला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये दोघांच्या त्रासाला कंटाळून जीव देत आल्याचं महिलेने नमूद केलं होतं. दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

17:44 PM (IST)  •  31 May 2023

आधी सासू, त्यानंतर अल्पवयीन मेहूणीसोबत अश्लील चाळे; मेहुण्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar : एवढंच नाही तर या आरोपी मेहुण्याने आपल्या सासूची आणि बायकोच्या आजीची देखील छेड काढली होती. Read More
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Lonar Lake Update : लोणार सरोवराचं नुकसान होत असल्याच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, भूस्खलन होत असलेल्या भागाची पाहणी होणारNDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : लाडक्या बहिणींचे १५०० देण्यासाठी भाऊ आणि नवऱ्यांना सरकार दारुडे करणार, राऊतांची सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
Embed widget