Maharashtra News Updates : आंदोलनकर्त्या MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला शरद पवार दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तर, त्याच वेळी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने परीक्षा घेणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. आज सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होणार आहे. तर, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेची आज बैठक होणार आहे.
आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा परिणाम बारावीच्या परीक्षेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिल्ली
- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार आहे.
मुंबई
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
- आजपासून पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे.
पुणे
- कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांची सभा होणार आहे. तर, कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारेंची सभा होणार आहे.
- चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे.
MPSC : आंदोलक विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, हा माझा शब्द; शरद पवार
MPSC : आंदोलक विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, हा माझा शब्द आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत; शरद पवार यांचे प्रतिपादन
MPSC Student Protest : आंदोलनकर्त्या MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली
मुंबईत शिंदे गटाची कार्याकरिणी बैठक सुरू, बैठकीत पाच ठराव मांडले जाणार
मुंबईत शिंदे गटाची कार्याकरिणी बैठक सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली कार्यकारिणीची बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये होत आहे. या कार्यकारिणीत पाच राजकीय ठराव मांडले जाणार आहेत.
हे ठराव मांडरे जाणार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा अभिनंदन ठराव मांडला जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे पक्ष चालवला त्याचप्रमाणे आपल्याही पक्षाची वाटचाल सुरु ठेवण्याचा मुद्दा असणार
सहा महिन्यांतील पक्षाची कामगीरी यावर चर्चा होणार
एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या, सोलापुरातील मंगळवेढा येथील नंदेश्वरमधील घटना
सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आलीय. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील माळी वस्ती येथे ही घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
जालन्यातील 12 वीच्या परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी, 16 कॉपी बहाद्दर पकडले
आज बारावी बोर्डाच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातील सेवली येथे दोन परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन 16 कॉपीबहादरांना रंगेहात पकडलं. सेवली येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अचानक भेट दिली. यावेळी दोन वेगवेगळ्या केंद्रावर 16 विद्यार्थी कॉपी करताना पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.