Maharashtra News Updates 1st May 2023 : एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 May 2023 05:10 PM
MPSC Student Suicide : एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अक्षय अप्पा पवार असं या विद्यार्थ्यांचं नाव असून तो मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून संभाजी नगर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करत होता. एमपीएससीची परीक्षा देण्याससाठी तो बीडमध्ये आला होता. परीक्षा दिल्यानंवर बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला होता. एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Nashik APMC election : मनमाड बाजार समितीच्या सात जागांचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीची सरशी 

Nashik APMC election : मनमाड बाजार समितीचा निकाल हळूहळू हाती येत असून पहिल्या निकाल हाती आला आहे. त्यानुसार महाविकास  आघाडीने सरशी घेतली असून ग्रामपंचायत गटातून भुजबळ गटाला 3 जागा आल्या असून आमदार सुहास कांदे गटाला 1 जागा मिळाली आहे. नाशिकच्या अत्यंत चुरशीच्या मनमाड बाजार समिती निवडणुकीत ७ जागांचे निकाल जाहीर झाले असून  ग्रामपंचायत गटातील ३ जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना जोरदार धक्का दिला आहे..महाविकास आघाडीच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे..शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाला ४ पैकी केवळ १ जागा मिळाली..आतापर्यंत ७ जागांचे निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडी ३, शिंदे गट १, व्यापारी विकास २ व अपक्ष १ असे बलाबल आहे..

Maharashtra News: शनिवार-रविवार सुट्टी आणि सोमवार महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Maharashtra News: शनिवार-रविवार सुट्टी आणि सोमवार महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते.


याचं एकमेव कारण सलग तीन दिवस पडलेल्या सुट्ट्यांनी मुंबईकर सुट्टीत कोकणाकडे निघालेले आहेत.


महामार्गावरील माणगाव च्या इथे वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते.


वाहनांच्या लांबच्या लांब रांगा एक ते दीड किलोमीटर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

Devendra Fadnavis at Gadchiroli: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर

Devendra Fadnavis at Gadchiroli: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. सी-60 कमांडोंनी रविवारी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. त्या जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसंच, गडचिरोलीतील विकासकामांचा आढावाही फडणवीस घेणार आहेत. आज रात्री त्यांचा गडचिरोलीतच मुक्काम असणार आहे. 

Maharashtra Pandharpur News: मोहिनी एकादशीनिमित्त विठुरायाची पंढरी गजबजली

Maharashtra Pandharpur News: सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे तसंच मोहिनी एकादशीनिमित्त हजारो भाविक आणि पर्यटक पंढरपूरमध्ये दाखल झालेत. दर्शनाची रांग थेट गोपाळपूर पत्रा शेडपर्यंत गेली आहे. शहरातील सर्व हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा हाऊसफुल्ल आहेत. 

Shirdi News: अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नवीन वाळू धोरण आखण्यास सुरुवात

Shirdi News: अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नवीन वाळू धोरण आखण्यास सुरुवात करण्यात आलीये.. त्यानुसार थोड्याच वेळात राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा आज शुभारंभ होणार आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथून या प्रकल्पाला सुरवात होईल. नवीन धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे. 

Nitesh Rane on Uddhav Thackeray: ठाकरे जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च काही गुजराती बिल्डर करतात : नितेश राणे

Nitesh Rane on Uddhav Thackeray: भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक स्वरुपाचा आरोप केला आहे. ठाकरे जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च काही गुजराती बिल्डर करतात, ठाकरे आपल्या खिशातून एक रुपयाही काढत नाहीत, असा आरोप नितेश यांनी केला. गुजराती लोकांचे पैसे तुम्हाला चालतात, पण राजकीय सभेत त्याच गुजरातींवर तुम्ही टीका करता, अशी टीकाही नितेश यांनी केली.

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha: संविधान, महाराष्ट्र रक्षणासाठी आजच्या सभेचं आयोजन : संजय राऊत

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha: आज महाराष्ट्र दिनानिमित्त  महाविकास आघाडीनं मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन केलंय. दरम्यान आजचा सभेचा दिवस हा आम्ही संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी निवडला असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. तर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संविधानावर प्रेम नाही, तर त्यांचे प्रेम मन की बात वर असल्याची टीकाही राऊतांनी केलीये.

Maharashtra Politics: थोडे दिवस थांबा, अजित पवार कुठे असतील हे लवकरच दिसेल; शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे हे येणाऱ्या चार दिवसांत कळेल असं शिरसाट म्हणालेत. तर अजित पवार शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया संदीपान भुमरेंनी दिलीये.

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha : आज मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सभेला मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत होणार मुंबईतल्या बीकेसी मैदानावर मविआची सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा  प्रयत्न आहे. 

Nagpur News: नागपूरच्या सदर परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदर्भवादी पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News: नागपूरच्या सदर परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


अहमद कादर यांच्या नेतृत्वात काही विदर्भवादी सदर परिसरातून कस्तुरचंद पार्कच्या दिशेने जायला निघाले होते.


कस्तुरचंद पार्क मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा सोहळा सकाळी पार पडला. 


त्याच ठिकाणी जाऊन विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करण्याचा नियोजन होता... मात्र, पोलिसांनी त्यांना आधीच सदर परिसरातून ताब्यात घेतले.

Barshi Crime : बार्शी पोलिसांची गुटखावर कारवाई, तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Barshi Crime : बार्शी पोलिसांनी अवैध गुटख्यावर मोठी कारवाई केलीय. यामध्ये 76 लाख रुपयांच्या गुटखासह तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर दोघा आरोपींना देखील पोलिसांनी अटक केलीय.


बार्शी शहरात गुटख्याने भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनो छापा टाकून ट्रकची पाहणी केली.. यावेळी ट्रकमधील गोण्यांची तपासणी केली असता हिरा पानमसाला नाव असलेल्या 390 गोण्या ज्याची किंमत 50 लाख 70 हजार रुपये, तर रॉयल 717 नावाच्या सुगंधी तंबाखूच्या 200 गोण्या आढळून आल्या. ज्याची किंमत 26 लाख रुपये आहे. पोलिसांनी 25 लाखांची किंमत असलेला ट्रक जप्त केला आहे.


या प्रकरणात वाहन चालक अतिकमिया खुर्शिदमिया नाईकोडी, जावेद पाशा अब्दुल सत्तार चेंगटा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर वाहन मालक सद्दाम हुसेन अब्दुल सत्तार, पुरवठादार गुलाम अली, साठा मालक अभिद नाईक, इमरान नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LPG Price : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात

LPG Price : तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. कंपन्यांनी 1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे आजपासून देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1856.50 रुपये झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1808.50. रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha : मविआची आज मुंबईत वज्रमूठ सभा, बीकेसीत सभेची जय्यती तयारी

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha : मविआची आज मुंबईत वज्रमूठ सभा, बीकेसीत सभेची जय्यती तयारी, प्रमुख नेत्यांकडून सभेच्या तयारीचा आढावा, पोलिसांकडून सुरक्षेची पाहणी

Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

Bhiwandi Building Collapse: भिवंडीतील (Bhiwandi) वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखील अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे. सध्या NDRF कडून शेवटची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी रात्री 12 वाजता सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी रात्री 12 वाजता सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौकात ठाकरे यांनी 106 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली होती. 

Farmers Protest: महाराष्ट्र दिनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुंबईत हुतात्मा चौकात निदर्शनं

Farmers Protest: महाराष्ट्र दिनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईत हुतात्मा चौकात निदर्शने केली. 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला धरणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा 5 गावं शेजारील राज्यात विलीन करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न शेतकरी करणार होते. मात्र त्या पूर्वीच पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. 

Maharashtra Politics: ठाकरेंचा मोहरा शिंदेंच्या जाळ्यात; शिवसेनेची इत्यंभूत माहिती असलेले साळुंखे शिंदेंच्या शिवसेनेत

Maharashtra Politics: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई (Anil Desai) यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे (Maruti Salunkhe) यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केलं.  

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Maharashtra Din 2023 : आज 'महाराष्ट्र दिन', यानिमित्त जाणून घ्या या दिनाचा इतिहास आणि महत्त्व


Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते.


1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.


APMC Election: आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; आटपाडीत बाजार समिती मतदान केंद्रावरील प्रकार


Maharashtra APMC Election: आटपाडीत बाजार समितीच्या मतदान केंद्रावर वादावादीचा आणि मारहाणीचा प्रकार घडला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) आणि विरोधी गटातील एका  ग्रामपंचायत सदस्यामध्ये ही वादावादी झाली. या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण बनल्यावर पोलिसांनी (Sangli Police) तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचे आवाहन केले. 


मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. तत्पूर्वी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली.  या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत शांततेचे आवाहन केले. 


आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती (Atapadi APMC Election ) निवडणुकीच्या मतदानावेळी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व काळेवाडी गावातील एका सदस्यांमध्ये वादावादी झाली. या वादावादीत आमदार पडळकर यांनी काळेवाडी  ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यास मारहाण करण्याचा प्रकार घडला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी  ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. 


Beed News: त्यामुळेच गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध केला; जलील यांनी प्रीतम मुंडेंच्या समोरच सांगितला किस्सा


Beed News: बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एमआयएमचे खासदार यांच्या इम्तियाज जलील (AIMIM Imtiaz Jaleel ) आणि भाजप नेत्या, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) एकाच मंचावर आले होते. दरम्यान यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या स्मारकाला आपण का विरोध केला याचा खुलासा जलील यांनी याच व्यासपीठावर केला. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने तयार होत असलेल्या  रुग्णालयाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची इच्छा असल्याचं देखील यावेळी जलील यांनी बोलावून दाखवलं.


बीडमध्ये 'व्हाईस ऑफ मीडिया' या पत्रकारांच्या संघटनेकडून मराठवाडा अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले होते. याच अधिवेशनाला छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची मागणी होत असताना, जलील यांनी थेट विरोध केला होता. दरम्यान तो विरोध कशासाठी केला होता, हाच किस्सा त्यांनी आज बीडमध्ये या कार्यक्रमात सांगितला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.