एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 18th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 18th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

DK Shivakumar: उपमुख्यमंत्री नको... मुख्यमंत्रीपदच हवं; नाराज डीके शिवकुमार यांची भूमिका, काँग्रेससमोरील पेच वाढला

Karnataka Government Formation: कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. सिद्धारमय्या यांचे नाव अंतिम झाल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेले डीके शिवकुमार (DK Shivakumar) नाराज असल्याची चर्चा आहे. डीके शिवकुमार हे अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अडून असल्याची बातमी आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड अद्याप कोणत्याही निर्णयावर आलं नाही. 

सिद्धारय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम झालं असून डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची सहा खाती देण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाव्यतिरिक्त कोणतंही पद नको असल्याचं कळवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. 

डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसचा एक डॅशिंग नेता अशीच त्यांची ओळख असून भाजपला जशास तसं उत्तर देण्यात तरबेज आहेत. 

Maharashtra ST Bus News: एसटीचा चालताबोलता इतिहास हरपला; ST चे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

Maharashtra ST Bus News:  राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे आज  (17 मे 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. आज रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे एसटी प्रेमींमध्ये (ST Bus) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या एक जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा (ST Bus) साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्या, गुरुवारी अहमदनगर येथील अमरधाम येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये  अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. त्या काळी नगर शहर फार लहान होते. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक असे नव्हतेच. खासगी बस माळीवाडा परिसरातून बाहेरगावी जात असत. याच परिसरातून पहिली बस पुण्याकडे धावली. त्यावेळी देखील खासगी अवैध प्रवासी वाहतूक होत असे. त्यांच्याकडून ही एसटीला अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असे, जाणकार सांगतात. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले.

22:34 PM (IST)  •  18 May 2023

Pune News: पुणे: बारामती तालुका हद्दीत सापडला 48 लाखांचा गुटखा, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

Pune News: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ४८ लाखांचा हिरा पान मसाला व रॉयल गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

21:25 PM (IST)  •  18 May 2023

उस्मानाबाद: तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न; पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण

तुळजाभवानी मंदीर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न

तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी काढले जाहीर प्रकटन

तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण

तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली होती

अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना आता मंदिरात प्रवेश नाही असे लावले होते बोर्ड

20:42 PM (IST)  •  18 May 2023

Jalna News: जालना: कॉलेजची फी न भरल्यामुळे फार्मसी च्या तीन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; रावसाहेब दानवे फार्मसी महाविद्यालयातील प्रकार

Jalna News: जालना येथील रावसाहेब पाटील दानवे फॉर्मसी कॉलेज मधील फार्मसी मध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना फीस न भरल्यामुळे परिक्षेपासून वंचित राहावं लागलंय, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. 

19:26 PM (IST)  •  18 May 2023

Sangli News: आटपाडी बाजार समितीच्या सभापती पदीच्या निवडीत आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का;

Sangli News: अत्यंत संवेदनशील आणि रोमहर्षक निवडणूक झालेल्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप  आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का देत शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. आज झालेल्या सभापती निवडीमध्ये सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी  तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली.

18:50 PM (IST)  •  18 May 2023

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास बंद करणाऱ्या सीबीआयला नोटीस; कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

Dr. Dabholkar Case:  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबत सीबीआयनं घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी केली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget