Maharashtra News Updates 12th May 2023 : महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांचं निधन, आंबेडकरी चळवळीवर शोककळा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Aaditya Thackeray : उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत, त्यांच्या मनाला जे पटलं ते केलं : आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray : उद्धव साहेबांनी (Uddhav thackeray) जर राजीनामा दिला नसता तर ते इतर राजकारण्यांसारखे झाले असते. त्यामुळं त्यांच्या मनाला जे पटलं ते त्यांनी केलं असं वक्तव्य युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं. उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत आणि त्यांनी पहाटेची शपथविधीही घेतली नाही असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल आपल्या देशात गरजेचे आहेत का?
सुप्रीम कोर्टात दोन्ही निकाल राज्यपाल महोदय यांच्या विरोधात आहेत. लोकशाहीत राज्यपालांचे काम काय? राज्यपाल यांच्यामार्फत आपण हुकूमशाहीकडे चाललो आहे का? राज्यपाल आपल्या देशात गरजेचे आहेत का? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे राज्यपाल यांची वागणूक चुकीची होती. ते एका पक्षाची व्यक्ती म्हणून काम करत होते राज्यपाल म्हणून नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्पीकरची निवडणूक ही देखील चुकीची होती. तसेच व्हीपची झालेली निवड ही देखील चुकीची होती असं आदित्य ठाकरे म्हणाले.
International Nurses Day 2023 : ...अशी झाली परिचारिका दिनाची सुरुवात; वाचा इतिहास आणि महत्त्व
International Nurses Day 2023 : आज (12 मे) आंतरराष्ट्रीय नर्स दिन. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो.
परिचारिका दिनाचा इतिहास
12 मे 1820 रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या 16 वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. परंतु वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते. कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं.
1854 मध्ये क्रीमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि प्रादुर्भावामुळे सैनिकांचा मृत्यू झाला. फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं. यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली.
Manoj Sansare: महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांचं निधन, आंबेडकरी चळवळीवर शोककळा
महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांचं निधन
दीर्घकाळ आजारी असल्यामुळे निधन झाल्याची प्राथमिक माहिती
दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळख
Bhiwandi News: भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, 10 हून अधिक गोदाम सहित झोपड्या जळून खाक
Bhiwandi News: भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी कंपाउंड येथील शहा वेअर हाऊस व देशमुख वेअर हाऊस या ज्वलनशील केमिकल साठविलेल्या गोदामांना शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.ही आग एवढी भयानक होती की आगीमुळे आकाशात उंच पसरलेले काळे ढग तब्बल पाच किलोमीटर अंतर वरून ही दिसत होते. आगीत 10 हून अधिक गोदामे, झोपड्या जळून खाक झाल्यात.
Beed News: बीड: लग्न समारंभाच्या कार्यक्रमातून आठ लाख 46 हजार रुपये किमतीच्या दागिन्याची चोरी
Beed News: बीड शहरामध्ये असलेल्या एका मंगल कार्यालयातून लग्न समारंभाच्या कार्यक्रमात वधू साठी खरेदी करण्यात आलेले आठ लाख 46 हजार रुपये किमतीचे दागिने चोराने लंपास केले आहेत. लग्न सोहळ्यामध्ये वधू-वरासाठी आणलेले दागिने आणि त्यांना अहेरातून मिळालेली रोख रक्कम नवरी मुलीच्या आईच्या पर्समध्ये ठेवण्यात आली होती. चोराने पाळत ठेवून त्यावर डल्ला मारला. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कस्टम अधिकारी असल्याचे दाखवून पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची 3.6 लाख रुपयांची फसवणूक
Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- महाराष्ट्रमध्ये बेबंद शाही माजविण्याचा प्रयत्न केला त्यावर न्यायालयाने परखड भाष्य केले आहे : उद्धव ठाकरे
- बाळासाहेबांनी ज्या सेनेवर प्रेम केलं, ती सेना भाजपच्या दावणीला बांधण्याचा डाव न्यायालयाने उघडा पाडला : उद्धव ठाकरे
- काही जणांनी आनंद उत्सव साजरा केला फटाके वाजवले, भाजपने आनंद व्यक्त केला मी समजू शकतो, गदारांनी फटाके वाजवले हे कळलं नाही : उद्धव ठाकरे
- विधानसभा अध्यक्ष सगळ्यांना माहीत आहे. आधी आमच्यात होते मग राष्ट्रवादी आणि मग भाजप मध्ये गेले : उद्धव ठाकरे
- महाराष्ट्रची बदनामी थांबली पाहिजे, न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवले ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी परत मुख्यमंत्री केलं असतं, माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला, मी त्या लोकांना सगळं दिलं त्या विश्वासाघातक्यांनी माझ्या वर अविश्वास दाखवला : उद्धव ठाकरे
- काल मेलेला पोपट घेऊन आजूबाजूचे मीठु मिठू करत होते : उद्धव ठाकरे
- मी आव्हान दिलाय ते कायम आहे, आपण निवडणुकीला सामोरे जाऊया, लोकशाहीमध्ये जनतेचा न्यायालय अंतिम आहे, जनतेचा कौल स्वीकारू या : उद्धव ठाकरे
- सगळ्या वकिलांचे मी आभार मानतो, लोकशाही जिवंत राहण्यासाठी मोदींनासुद्धा सांगेल जे देशात नांगा नाच चालू आहे ज्यामध्ये आपली बदनामी होत आहे : उद्धव ठाकरे
- अध्यक्षांनी काही वेडेवाकडे केले तर निवडणूक आयोगाच्या निर्णय विरोधात ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालयात गेलो तसाच आम्ही अध्यक्षच्या निर्णय विरोधात सुद्धा न्यायालयात जाऊ मग तुमची जे बदनामी होईल ते बघा, अध्यक्षांनी लवकरात लवकर परदेश दौरा झाल्यावर निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे