एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, फडणवीसांची प्रतिक्रिया; चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार

Devendra Fadnavis : दारुच्या नशेत खासदार संजय राऊतांना धमकी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अशा प्रकारच्या धमकी देणाऱ्यांवर कारवाई होईल असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना धमकी देणारा माणूस सापडला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारुच्या नशेत त्या व्यक्तीने संजय राऊतांना धमकी दिली असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. मात्र, हे प्राथमिक रिपोर्ट आहेत. त्यामुळं यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. कोणीही धमकी दिली असेल तर कारवाई होईल. ते आज नागपुरात (Nagpur) बोलत होते.

कोणी धमकी  देत असेल तर सरकार शांत बसणार नाही

महाराष्ट्रात कोणाही कोणाला धमकी देत असेल तर सरकार शांत बसणार नाही. त्या व्यक्तीवर कारवाई होईल असे फडणवीस म्हणाले. आलेल्या धमक्यासंदर्भात चेष्ठा करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही ते म्हणाले. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप राऊतांनी केला होता. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला आलेल्या धमक्यांची चेष्ठा करत असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिला.

मी गृहमंत्री झाल्यामुळं अनेक लोकांची अडचण  

मी गृहमंत्री झाल्यामुळं अनेक लोकांची अडचण झाली आहे. त्या लोकांना मी गृहमंत्री नाही राहिलो तर बर होईल असं वाटत आहे.  पण त्यांना मी सांगू इच्छितो की, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे. त्यामुळं जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. मागच्या काळत मी पाच वर्ष गृहमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. मी जे कायदेशीर आहे तेच करतो. मी कोणाला घाबरत नाही. कायद्यानेच वागतो हे राज्य कायद्यानेच चालेल असेही फडणवीस म्हणाले. 

लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून राऊतांना धमकी 

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज राऊतांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाली आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून (Pune) दोन जणांना ताब्यात घेतले आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते.  संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत 

महाराष्ट्रातील सगळी सुरक्षा व्यवस्था ही गद्दार गटाचे आमदार, खासदार त्यांचे पदाधिकारी यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार अशा घटना घडत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या घटनांकडे पाहायला वेळ नाही. आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या धमक्यांची माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्ठा करतात. आमचा स्टंट असल्याचे ते बोलतात. मला ठाण्यातून आलेल्या धमकीत मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे नाव आहे. ही गोष्ट तुम्ही गांभीर्यानं घेत नाही. काल रात्रीसुद्धा मला एक धमकी आल्याचे राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू , संजय राऊतांना धमकी; पुण्यातून दोन जण ताब्यात 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget