(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाथ षष्ठी सोहळ्यात दहीहंडी बाहेर फोडण्यास नाथ वंशजांचा विरोध, न्यायालयात आज होणार सुनावणी
Nath Shashti Festival 2023: मंदिरात एकच दहीहंडी असावी, बाहेर दहीहंडी फोडली जाऊ नये यासाठी नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
Nath Shashti Festival 2023: राज्यात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणाऱ्या पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास (Nath Shashti Festival) सोमवारपासून (13 मार्च) सुरुवात झाली आहे. तर दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाथांच्या नाथनगरीत 424 वा नाथ षष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांसह लाखो भाविक छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून नाथ षष्ठी सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी नाथ मंदिराच्या बाहेर काल्याची दहीहंडी फोडण्याची सुरु करण्यात आलेल्या परंपरेला नाथ वंशजांचा विरोध पाहायला मिळत आहे. मंदिरात एकच दहीहंडी असावी, बाहेर दहीहंडी फोडली जाऊ नये यासाठी नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. ज्यावर आज सुनावणी होणार आहे.
यापूर्वी नाथ षष्ठीच्या शेवटच्या दिवशी नाथ मंदिरात काल्याची दहीहंडी फोडून सोहळ्याचा समारोप केला जात होता. मात्र मंदिर परिसरात जागेचा अभाव पाहता मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांना दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता येत नव्हता. त्यामुळे वारकऱ्यांची मागणी लक्षात घेत नाथ मंदिर प्रशासनाने पाच वर्षांपासून सामान्य वारकऱ्यांसाठी नाथ मंदिराच्या बाहेर काल्याची दहीहंडी फोडण्याची परंपरा सुरु केली आहे. परंतु यावर्षी नाथ वंशज यांनी याला आक्षेप घेतला आहे. मंदिरात एकच दहीहंडी असावी, बाहेर दहीहंडी फोडली जाऊ नये यासाठी नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष...
मंदिरात एकच दहीहंडी असावी, बाहेर दहीहंडी फोडली जाऊ नये यासाठी नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र आम्ही नाथ वंशजांच्या मंदिरातील दहीहंडीला विरोध करत नाहीत. सामान्य वारकऱ्यांसाठीची दहीहंडी मंदिराच्या बाहेर फोडली जाणार आहे, अशी स्पष्ट भूमिका नाथ संस्थानने घेतली आहे. त्यामुळे आज न्यायालयात आज यावर सुनावणी होणार असून, न्यायालयाचा काय निर्णय येणार याकडे सर्व नाथ भक्तांचे लक्ष लागले आहे.
लाखो वारकरी पैठणमध्ये दाखल...
राज्यात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणाऱ्या पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास सोमवारपासून (13 मार्च) सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाथांच्या नाथनगरीत 424 वा नाथ षष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांसह लाखो भाविक पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पाचशेच्यावर दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या आहे. तर पैठणनगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. नाथ षष्ठी सोहळ्याचा आज दुसरा दिवस असून, उद्या बुधवारी (15 मार्च) संध्याकाळी कालच्या दहीहंडी फोडून, नाथ षष्ठी सोहळ्याचा समारोप होईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
नाथनगरी दुमदुमली! पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास आजपासून सुरवात, वारकऱ्यांसह लाखो भाविक दाखल